Friday, January 22, 2010

श्लोक ४

II श्रीराम समर्थ II
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥
जय जय रघुवीर समर्थ !

8 comments:

Dr.Madhavi Mahajan said...

// श्रीराम समर्थ //
मना वासना दुष्ट कामा नये रे ....
बा मना! भक्तीमार्गाने जायचे असेल तर मनामध्ये दुष्ट वासना बाळगू नकोस, पापबुद्धी धरू नकोस ... त्यासाठी संतसंगात सतत राहा...मनामध्ये सतत चांगल्या विचारांचे चिंतन हा देखील एक सत्संगच आहे... सततचे चांगले विचार, सकारात्मक विचार यामध्ये मन रमले तर आपोआपच पापबुद्धी नाहीशी होते ...
स्वत: चे हित साधण्यासाठी मनुष्य कोणत्याही पातळीवर उतरू शकतो ...अनेक पातके करतो आणि या दुष्कृत्याचे फळ म्हणजे दु:ख .. या सगळ्या दुष्कृत्यातून सुटायचे असेल तर , बा मना! दुष्ट वासना सोडून दे !
जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

// श्रीराम समर्थ //

मनाच्या श्लोकामधून समर्थ सदाचाराबरोबर अंतरंग शुद्ध असावे या दृष्टीने मार्गदर्शन करतात. मनामध्ये देहाविषयी असणारी आसक्ती हीच वासानांमध्ये वाढ करणारी आहे ....
देह सुखात राहावा म्हणून धडपडणारा माणूस सतत सुख दु: खानच्या लाटांवर स्वर होताना दिसतो ..
मनामधील विषय-वासना दु:ख निर्माण करतात तर शुद्ध वासना या आनन्दाला कारण होतात, ही शुद्ध वासना भगवंताकडे वळवली तर मनुष्याला आनंद प्राप्त होतो ..
विषयवासना या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवतात "जन्म घेणे लागे वासनेच्या संगे " !
म्हणून दुष्ट वासना , वाईट वासनांचा त्याग समर्थ सांगतात ...

जय जय रघुवीर समर्थ !

Gandhali said...

बामना ! दुष्ट वासना किंवा पापबुध्दी मुळीच धरू नकोस .देहसाक्तीमुळे स्वाहिता साठी मनुष्या दुसर्यचा नाश ,दुसर्याला नुकसान करण्यास जातो व नानाविध पातके करतो पण पापाचे फळ दुख: ठरलेले आहे. वाईट वासना दुसर्‍याचा नाश करण्या आधी स्वत: चा नाश करतात.
त्यामुळे पापामारगा सोडावा. स्वधर्मा व सदाचार या प्रमाणे चलावे. सारासार विचारणे असार (संसार) याचा मनातून त्याग करून सार(श्रीराम) मनात साठवावा .

Dr.Madhavi Mahajan said...

// श्रीराम समर्थ //
संत साहित्यामध्ये सद्गुणांना म्हणजेच दैवी संपत्तीला विशेष महत्व दिले गेले आहे.... या गुणांशिवाय ईश्वर प्राप्ती नाही. असे सर्व संत सांगतात. सर्वसाधारण पणे मानवी मन ईश्वर चिंतनापेक्षा विषयांचे अधिक चिंतन करत असते या चिंतनातून मन काढण्यासाठी मनाने विवेकाने विचार करून आपली वृत्ती बदलणे आवश्यक आहे ... ..समर्थ म्हणतात ..
विवेके क्रिया आपुली पालटावी / अति आदरे शुद्ध क्रिया धरावी //
विवेकाने विचार करून वाईट वासनांचा त्याग करून नीतीने वागण्याचा आग्रह समर्थ मनाला करतात ... मना धर्मता नीती सोडू नको हो/
दुर्बुद्धी आणि दुर्वासानांचा जोर कमी झाला म्हणजे आपोआपच अधर्मी वृत्ती कमी होऊन धर्म प्रवृत्ती वाढीस लागते .. यामुळे मन आणि बुद्द्धी स्थिर झाली कि मन 'सार' काय आणि 'आसार' काय याचा विचार करू शकेल......
जय जय रघुवीर समर्थ !

Dr.Madhavi Mahajan said...

// श्रीराम//
समर्थ या ठिकाणी मनाला दुष्ट वासनांपासून, पापबुद्धीपासून दूर राहण्याची सूचना करतात आणि नीतीने आचरण करून अंत:करणात मात्र 'सार' काय आणि 'आसार' काय हा विचार करून जगात वावरण्यास सांगतात.
भौतिक जगात जगताना नाशिवंत काय आणि शाश्वत काय हा विचार मनामध्ये सतत जागृत असणे आवश्यक आहे ..
नरदेह प्राप्त झालेल्या प्रत्येक जीवाला त्याचे सार्थक करून घेता येत नाही ..बहुतेक जीव दुर्दैवी जीवन जगतात.
देहाच्या मोहापायी त्याचेच कोडकौतुक करण्यात आयुष्य व्यतीत करतात आणि शेवटी तो देहच गमावून बसतात !
समर्थ म्हणतात ..
जाणत्याने ऐसे न करावे ! सार तेची शोधून घ्यावे !!
असार ते जाणून त्यागावे !वमक जसे !! दा. ११-४-२६!!
जय जय रघुवीर समर्थ !

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate( Gwaliar)..श्रीरामदासजी का कहना है कि हे मानव मन ! दुष्ट वासना तथा दूर्भावना कभी भी काम नही आती है| अत: पाप की बुध्दि, दुष्टता से सदैव दूर रहना चाहिए| नीतिपूर्ण कार्य और धर्म अर्थात् अपने कर्तव्य के प्रति निष्ठा रखना चाहिए| उसे छोडकर चलने से मन कभी भी शांत एवं संतुष्ट नही रहता| अंतर मन के विचारो मे सदैव शाश्वतता का विचार रहे अर्थात् सदैव परोपकार की भावना होना चाहिए|

suvarna lele said...

वासनेच्या तीन अवस्था आहेत .१.आस :एखादी वस्तू हवीशी वाटणे ,२.हव्यास : ती वस्तू कायम आपल्या जवळ असावी असे वाटणे ,३.ती वस्तू मिळाल्या शिवाय काही न सुचणे ,वासना शुध्द असू शकते तशी मलीनही असू शकते .शुद्ध वासनेत मला परमेश्वर हवा अशी वासना असू शकते ,तर मलीन वासनेत कोणताही विषय जो मिळाला नाही तर काम क्रोध निर्माण होईल अशी वासना असू शकते .मलीन वासना दुखाला कारणीभूत होते तीच वासना भगवंताकडे वळली तर भगवंताशिवाय काही नको अशी वृत्ती झाल्यामुळे कोणतीही दु:ख देणारी वासना शिल्लक उरत नाही .
मलीन वासनेने एखादी गोष्ट मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जावू शकतो .त्यातूनच पाप बुद्धी निर्माण होते .समर्थ सांगतात की पाप बुद्धी होऊ देऊ नकोस .त्यासाठी धर्माला धरून असलेला आचार किंवा नीती सोडू नकोस .नीती म्हणजे वागण्याची रीत किंवा आचार .स्वधर्मात अचल रहाणे म्हणजे नीती .त्यासाठी सारा सार विचार करावा लागतो .काय योग्य काय अयोग्य याचा विचार समर्थ करायला सांगतात .

lochan kate said...

श्लोक ४...
मन की वासना दुष्ट है जो काम ना आती|
मन सर्वथा दे छोड पाप की बुध्दि||
मन धर्मता निती छोडो कभी ना|
मन अंतर मे सार विचार हो जा||४||श्रीराम||