Friday, January 8, 2010

श्लोक २

II श्रीराम समर्थ II
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
जय जय रघुवीर समर्थ !

5 comments:

Dr.Madhavi Mahajan said...

// श्री राम //
शरीराच्या माध्यमातून घडणार्या क्रियेबाबत मार्गदर्शन करताना समर्थ म्हणतात
जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे
समर्थांच्या या श्लोकाचे नीट अवलोकन केले तर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या म्हणजे नेटका प्रपंच करायला सांगताना समर्थ जगावर प्रेम करायला शिकवतात . पण परमार्थामध्ये मात्र समर्थ ,
स्वये सर्वदा प्रीती रामी धरावी
सुखाची स्वये सांडी जीवी करावी
ही भूमिका स्पष्ट करतात तसेच जेव्हा व्यावहारिक कर्माला दिशा देण्याचा प्रयत्न समर्थांनी केला तेव्हा त्यांनी सदा सर्वदा या शब्दाचा वापर केला आणि सात्त्विक मनाला मात्र सतत भक्तिमार्गाने चालण्याचा संदेश दिला .......
जय जय रघुवीर समर्थ !

//श्री राम//

समर्थांनी या
श्लोकात निंद्य आहे ते सोडून देण्यास सांगितलेले आहे आणि वंदनीय गोष्टींचा स्वीकार करायला सांगितले आहे जे निंद्य आहे ते पाप आहे आणि जे वंद्य आहे ते पुण्य आहे . यातील पुण्यकर्मे भक्तिमार्गात जीवाला सहाय्यक होतात .आणि निंद्य कर्मे देहभावाकडे खेचतात म्हणून भक्तिमार्ग आचरताना निंद्य गोष्टींचा त्याग आवश्यक आहे याची जाणीव समर्थ करून देतात.

जय जय रघुवीर समर्थ !

Kalyan Swami said...

//श्री राम //
श्री गणेश आणि शारदा मातेला वंदन करून श्री समर्थ मनाला त्याचे ध्येय काय आहे याची जाणीव करून देतात.
जो जीव जन्माला आला त्याचे अंतिम ध्येय ईश्वरप्राप्ती हे आहे, आणि जर ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्तिमार्ग हा उत्तम मार्ग आहे.
सज्जन मनाला जसे वळवावे तसे ते वळते, हे जाणून समर्थ त्याला सुरुवातीपासूनच हरीभजनाचा मार्ग दाखवत आहेत.चंचल मनाला समर्थ जाणीवपूर्वक सज्जन म्हणतात..
कारण मन मुळात सत्त्व गुणांपासून निर्माण झाले आहे आणि देह रजोगुणापासून बनला आहे. सत्त्व गुणापासून उत्पन्न झालेल्या मनाला समर्थ सज्जन म्हणत आहेत. रजोगुणापासून निर्माण झालेल्या देहाला सज्जन म्हणत नाहीत.
जन्माला आलेल्या क्षणापासून विकार उत्पन्न व्हायला लागतात. विकार उत्पन्न करणारा रजोगुण सात्त्विक नाही त्यामुळे मनामध्ये अनेक तरंग उमटतात, कोणाबद्दल राग निर्माण होतो तर कोणाबद्दल द्वेष निर्माण होतो. तर कधी कोणाबद्दल प्रेम उचंबळून येते. पण बुद्धि ताब्यात आल्यावर मात्र ते पुन्हा शांत होते. हे जाणूनच समर्थांनी मनाला भक्तीपंथेची जावे हा उपदेश केला आहे .
पण देहाच्या माध्यमातून घडणार्या क्रियांबाबत मार्गदर्शन करताना समर्थ भक्तिपंथ सांगत नाहीत ..... .

जय जय रघुवीर समर्थ !

suvarna lele said...

या श्लोकात समर्थ मनाला सज्जन म्हणतात .जस लहान मुलाला चुचकारून ,समजावून सांगाव लागत तसे समर्थांनी मनाला समजावून सांगितले आहे की हे मना तू सज्जन आहेस ,चांगला आहेस .तू तुझं हित करून घेण्यासाठी भक्तीमार्गाने जा ,ज्यामुळे तुला श्रीहरी सहज
पावेल .पण भक्तीमार्ग म्हणजे कोणता ?श्रवण,कीर्तन ,नामस्मरण ,पादसेवन ,अर्चन ,वंदन ,दास्य ,सख्य ,आत्मनिवेदन ! या नवविधा भक्ती पैकी कोणतीही भक्ती केलीस तरी तुला श्रीहरी सहज पावेल .या नवविधा भक्तीचे वर्णन करणारा एक अभंग समर्थांनी केला आहे तो असा :
श्रवण म्हणजे ऐकत जावे |
बरे विवरावे ग्रंथांतरी .||१ ||
ग्रंथांतरी कळे ते मुखे बोलावे |
कीर्तन जाणावे याचे नांव ||२||
नांव घ्यावे साचे सर्वदा देवाचे |
तिसरे भक्तीचे लक्षण हे ||३||
लक्षण चौथीचे ते ऐसे जाणावे |
पाऊल सेवावे सद्गुरूचे ||४||
गुरुदेव पूजा तेचि ते अर्चन |
सहावे वंदन नमस्कार ||५||
नमस्कार कीजे सर्व दास्यभावे|
भक्तीचे जाणावे लक्षण हे ||६ ||
लक्षण हे सख्य आठवे भक्तीचे |
सांगावे जीवींचे देवापाशी ||७||
देवापाशी होता उरेना मीपण |
आत्मनिवेदन रामदासी ||८||
हे मना अशा नवविधा भक्तीच्या पंथाने तू जा ,आणि राघवाला मिळव .पण हे करताना लक्षात ठेव की जगातील निंद्य तू टाकून दे .आणि सर्व वंद्य भावाने कर .पण निंद्य म्हणजे काय व वंद्य म्हणजे काय याचा विचार केला तर निंद्य व वंद्य व्यक्ती सापेक्ष असतात .एखादी गोष्ट एकाला चांगली वाटेल तर दुस-याला ती वाईट वाटेल ,म्हणून जे थोर आहेत त्यांच्या मार्गाने जावे .त्यांना ज्या गोष्टी वंद्य वाटतात त्या कराव्या .

Kalyan Swami said...

As stated Lochan Kate( Gwaliar)..
श्रीराम दासजी कहते है कि हे मनुष्य मन ! नम्रतापूर्वक सज्जन लोगों की तरह भक्ति के मारग पर चलते रहना चाहिए , जिसमें तुम्हारा कल्याण है| सज्जनता के व्यवहार से ही तुम श्रीहरि को स्वाभाविक रुप से पा सकने मे समर्थ हो सकोगे| हे मानव ! जो कार्य मानव्समाज मे निंदा लायक या लज्जा जनक है उसे छोडने का प्रयास करना चाहिए| जो वंदन करने योग्य कार्य है उसे सदैव करते रहना चहिए| जिसके कारण तुम श्रीहरि के निकट अपने को स्वाभाविक रुप से पा सकोगे|

lochan kate said...

श्लोक [२].....
हे मन सज्जन, मार्ग भक्ति पर जाना|
तभी श्री हरि को सहज में है पाना||
जनी नींद्य है जो, उसे छोड दे रे|
जनी वंद्य है जो उसे क्र तु ले रे||श्रीराम||२||