Friday, November 15, 2013

श्लोक २००

||श्रीराम समर्थ ||

कळे आकळे रुप ते ज्ञान होता।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे॥२००॥

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

देहाच्या चार अवस्था आहेत – जागृती ,स्वप्न ,सुषुप्ती ,तुर्या .पहिल्या तीन अवस्था अज्ञाना च्या असतात .तुर्या अवस्थेत ज्ञान आणि अज्ञान यांच्या मधली अवस्था असते . या अवस्थेत परब्रह्माचे आणि दृश्याचे दोन्हीचे ज्ञान असते .जणू काही उम्बार्ह्यावर ठेवलेला दिवाच ! जसे दोन खोल्यांमध्ये असलेल्या उंबरठ्यावर दिवा ठेवला तर दोन्ही खोल्यांमधले दिसते तशी ही तुर्या अवस्था असते .ती सर्वसाक्षी अवस्था आहे असे म्हटले जाते ..ती पहिल्या तीन अवस्थांची साक्षीदार असते
तुरीय अवस्थेच्या पुढे उन्मनी अवस्था असते .उन्मनी अवस्थेत आत्मसाक्षात्कार झालेला असतो .त्यावेळेस ज्ञान अज्ञान या कोणत्याच अवस्था राहत नाहीत ,आत्मसाक्षात्कार झाल्यावर मी माझे सर्वच संपते .आणि देव पहाया गेलो आणि देवची होऊनि ठेलो अशी अवस्था होते .परब्रहम स्वरूपात लीन व्हायला होते स्वरूप स्थितीला साधक पोहोचतो .



lochan kate said...

श्लोक २००.....
कळे आकळे रुप ते ज्ञान होता |
तेथे आटली सर्व साक्षी अवस्था ||
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे |
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ||२००||
हिन्दी में ....
सुझे ना सुझे रुप वो ज्ञान होता |
वहॉ अंत पाती सारी साक्षी अवस्था ||
मन के शब्द सारे कुंठीत होते |
वहीं रे वही राम सब है देखते ||२००||
अर्थ.....
श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मनुष्य मन !उस परम पिता पर्मेश्वर का स्वरुप हमे समझ में आने तक हमारा ज्ञान कुंठीत हो जाता है | वहा पर हमारी सारी शक्ति समाप्त होने लगती है | मन की उन्मत्तता सरे शब्द ही कुंठीत होने लगते है परन्तु वह श्री राम सर्वत्र द्रुष्टि रखे हुए है | उसकी क्रुपा हम पर सतत बरसती रहती है | इसलिये हमें सतत उस परमपिता परमेश्वर के ध्यान में लीन होना चाहिये | तब ही हमारा जीवन धन्य है |