Friday, November 8, 2013

श्लोक १९९

||श्रीराम समर्थ ||

अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे।
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे॥
अती गुढ ते दृश्य तत्काळ सोपे।
दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे॥१९९॥


जय जय रघुवीर समर्थ !
 

2 comments:

lochan kate said...

श्लोक १९९....
अती जीर्ण विस्तिर्ण ते रुप आहे |
तेथे तर्क संपर्क तो ही न साहे ||
अती गुढ ते द्रुष्य तत्काळ सोपे |
दुजे वीण ते खुण स्वामी प्रतापे ||१९९||
हिन्दी में ......
रहे जीर्ण विस्तीर्ण वो रुप होता |
वहॉ तर्क संपर्क कोई ना होता ||
रहे गुढ वो द्रुष्य तत्काल सीधा |
दुजे बीना वो बात स्वामी ज्ञाता ||१९९||
अर्थ...श्री समर्थ रामदास स्वामी जी कह्ते है कि हे मानव मन ! यह परमेश्वर का रुप अत्यंत जीर्ण शीर्ण विस्तीर्ण अवस्था में सर्वत्र पसरा हुआ रुप है अर्थात् गरीबों में यह रुप आपको देखने को मिल सकता है | अत: वहा पर तर्क करने के लिये यत्किंचित भी जगह नही बचती अर्थात् वह तर्क का विषय नहीं है |वह तो अत्यंत गूढ रहस्य है जो तत्काल पता चलना कठिन है | अत: किसी भी अन्य के बिना यानी अपने गुरु के बिना बताये प्राप्त नही हो सकता | अत: सतत अपने गुरु के स्मरण अपना जीवन व्यतीत करना चाहिये |

suvarna lele said...

या रघुनायकाचे रूप जीर्ण ,अति जीर्ण आहे, जुनाट आहे ,पुरातन आहे .सर्वांच्या आधी,व सर्व सृष्टी नाश पावल्यावरही असणारा असा हा जुनाट पुरुष आहे त्याचे स्वरूप इतके विस्तीर्ण आहे की त्याची कल्पनाही करता येत नाही ..ते इतके मोठे आहे ,सर्वत्र पसरलेले आहे की ज्याचा पार आणि अंत लागत नाही ..ते केव्हाडे असेल याचा तर्क ही करता येत नाही ,म्हणजेच ते अतर्क्य आहे .
त्यामुळेच ते गूढ आहे .असे असले तरी गुरुकृपेने ते सुलभ आहे .सहज साध्य आहे .हे गुह्य सहज साध्य होण्यासाठी सत्संग धरावा लागतो . सत्संगानेच विचार बदलतात ,चित्त शुध्द होऊ लागते ,सद्गुरू भेटीची तळमळ लागते .आणि एकदा सद्गुरू भेटले ,सद्गुरुवचनावर विश्वास ठेउन वागले तर सगळे सहज सोपे होते .