Friday, September 13, 2013

श्लोक १९१

।। श्रीराम समर्थ ।।

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना॥
परब्रह्म तें मीपणे आकळेना।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना॥१९१॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १९१............
देहे बुध्दि चा निश्चयो ज्या ढळेना |
तया ज्ञान कल्पांत कळि कळेना ||
परब्रह्म ते मी पणे आकळेना |
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ||१९१||
हिन्दी...........
देह बुध्दि का निश्चय जो रहेना |
उसे ज्ञान कल्पांत कुछ भी सहेना ||
परब्रह्म वो भी किसी को सधेना |
मन शून्य अज्ञान है ना समाये ||१९१||
अर्थ........ श्रीसमर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! जो व्यक्ति अहंकारपूर्ण हो एवं अहंकार को छोडने को बोल्कुल भी तैयार ना हो , उसको ब्रह्म ज्ञान की प्राप्ति अंत काल तक नही होती | अहंकार के कारण उस निराकार परब्रह्म की पहचान नही होती | उसके मन का शून्यत्व अर्थात उसका अज्ञान जरा सा भी नष्ट नही होता | वह व्यक्ति अज्ञानता से बाहर आही नही पाता |

suvarna lele said...

कल्पनातीत ,वाचातीत अशा स्वस्वरुपाला ओळखण्यासाठी देहबुद्धी सुटायला हवी .देह म्हणजे अशी आत्मघातकी बुद्धी झाली तर त्याला आत्मज्ञान केव्हाच होणार नाही .जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत आपले काही शाश्वत असणारे स्वस्वरूप आहे अशी कल्पनाही येत नाही .त्या उलट माणूस विषय कल्पना करत राहतो आणि त्यातच सुख मानतो व घात करून घेतो .
मी पणाने पराब्रह्माकडे पाहू लागल्यास ते पहाणे शून्यात्वाकडे पाहणे ठरते .पर ब्रह्मा कडे अज्ञानाने म्हणजे घमेंडीने पाहू लागल्यास ज्ञानाची प्राप्ती तर होणारच नाही .परब्र्ह्माकडे वेगळेपणाने पाहू लागले तर सर्व शून्यत्व म्हणजे अज्ञानच सापडते .