Friday, September 20, 2013

श्लोक १९२

II श्रीराम समर्थ II

मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥
तया खुण ते हीन दृष्टांत पाहे।
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे॥१९२॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

परब्रह्माचे स्वरूप कोणालाही गोचर नाही .कशाचीही उपमा त्याला देता येत नाही कारण परब्रह्म स्वरूप कल्पनातीत आहे ,त्याची कोणाला कल्पना करता येणार नाही असे आहे .त्यामुळे कोणत्याही दृश्य पदार्थाची त्याला उपमा देता येणार नाही असे आहे . दृश्यातल्या वस्तूंची आपल्याला कल्पना करता येते ,पण वस्तू तशी नाही .ज्याप्रमाणे आकाशातला चंद्र फांदी च्या आधाराने दाखविता येतो ,त्याप्रमाणे परब्रह्म दाखवता येत नाही .स्वरूप स्पष्ट होण्यासाठी दिलेला कोणताही दृष्टांत योग्य होत नाही . असे ते एकमेवद्वितीय आहे .
संग आणि नी:संग या दोन्हीही कल्पना आहेत .परब्रह्म कल्पनातीत आहे .,निर्विकल्प आहे .त्यामुळे संग आणि नी:संग या दोन्ही कल्पना करता येत नाहीत .
lochan kate said...

श्लोक ....... १९२...
मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे |
दूजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे ||
तया खूण ते हीन द्रुष्टान्त पाहे |
तेथे संग नि:संग दोन्ही न साहे ||१९२||
हिन्दी में.....
अरे मन समझे ना उतरे ना रुप वो |
दूसरे बिना ध्यान सर्वोत्तम है वो ||
देखता उसे जो है हिनता से |
उसे संग , नि:संग कुछ भी ना साहे ||१९२||
अर्थ..... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन !जिसको सद् स्वरुप की पहचान नही है | उसे , सद् स्वरुप की तुलना किसी और से नही की जा सकती यह कैसे समझाये | ऐसे श्री राम को इंगीत करके हीनता से देखने वालों को संग और नि:संग दोनों ही प्राप्त नही होते है | वह अधम श्री राम को प्राप्त करने में असमर्थ ही रहेगा ||साथ ही उसका जीवन गर्त की ओर अग्रसर होगा |