Friday, September 6, 2013

श्लोक १९०


।। श्रीराम समर्थ ।।

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।
पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥
तया निर्विकल्पासि कल्पित जावे।
परि संग सोडुनि सुखे रहावे॥१९०॥
 
जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १९०.....
नव्हे कार्यकर्ता नव्हे स्रुष्टि भर्ता |
परेहुन पर्ता न लिंपे विवर्ता ||
तया निर्विकल्पासि कल्पित जावे |
परी संग सोडूनि सुखी रहावे ||१९०||
हिन्दी में ........
नही कार्यकर्ता नही स्रुष्टि भरता |
परे से मोह के जीव में लिपटता ||
उस निर्विकल्प को कल्पन में उतारे |
सदा दु:संग से हो दूर सुख से रहो रे ||१९०||
अर्थ........ श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! तू ना ही स्रुष्टि का पालन हारा है ना ही कर्ता है | तू तो केवल मोहमाया में लपेटने वाला एक प्राणी है | अत: उस निर्विकल्प को कल्पना में उतारने का प्रयास करना चाहिये और दु:संग का त्याग करके सुख सेजीवन का मर्ग सुलभ कर लेना चाहिये |
Like?
Quote

suvarna lele said...

निर्गुण देव कसा आहे ते सांगताना समर्थ म्हणतात –तो कार्यकर्ता नाही म्हणजे त्याने सृष्टी नाही .ब्र्ह्मदेवाप्रमाने तो सृष्टीकर्ता नाही ,विष्णू प्रमाणे कार्यकर्ता नाही ,,त्याच्या सत्तेने सारे कार्य चालत असले तरी तो स्वत:काहीही करत नाही .त्याने निर्माण केलेली माया सर्व कार्य उरकते .
तो परेहून पर्ता आहे वाणीचे मूळ स्थान जी परावाणी ती सुध्दा त्याचे वर्णन करू शकत नाही .परावाणी च्या तो पलीकडे आहे .तो वाचातीत आहे .तो विवर्ता ला लिंपत नाही .विवर्त म्हणजे माया ,भ्रम .भ्रम ,माया या देवाला स्पर्श करू शकत नाही .माया कल्पनेने निर्माण झालेली आहे या निर्गुणाला मायेचा स्पर्शही होत नाही .
निर्गुणाला कल्पित जावे असे समर्थ सांगतात .पण निर्गुणाची कल्पनाही अशक्य असते कारण आपली देहंता असते .अहंतेने त्या स्वरूपाची आपण नीट कल्पना करू शकत नाही .कल्पना कोणती करायची ? निर्विकल्प असे स्वरूप आपल्यात भरून आहे .अशी कल्पना करून आपला अहंभाव सोडायला समर्थ सांगतात .