Friday, May 31, 2013

श्लोक १७६

II श्रीराम समर्थ II

जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥
जगी देव धुंडाळिता आढळेना।
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥१७६॥


 जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

समर्थदास said...

भगवंत गीतेत म्हणतात,"अर्जुना, सर्व देवता माझ्याच अंशस्वरूप असून त्या माझ्याच गुणांच्या श्रेष्ठतम अवस्थेच्या प्रतीक म्हणून ऋषीमुनींनी निर्माण केल्या आहेत. उदा. गणपती ही देवता विवेकाची श्रेष्ठतम अवस्था दर्शवते, शंकर धर्मसंगत संहाराचे प्रतीक आहे, जो सज्जनांसाठी कल्याणप्रद ठरतो, विष्णू ही देवता स्वधर्मपालनाचे द्योतक आहे, लक्ष्मी ही भगवद्परायणतेतून प्राप्त संपन्नता दर्शवते इ. यांपैकी कोणत्याही सद्गुणाची उपासना ही माझीच उपासना ठरते. पण ती उपासना माझ्या प्राप्तीसाठी असेल तरच ती शुद्ध, फलातीत ठरते, अन्यथा माझ्या अधिष्ठानाशिवाय, माझ्या प्राप्तीच्या हेतूशिवाय केलेली उपासनादेखील निरर्थक ठरते आणि जन्म-मृत्यूस कारण ठरते".
अशा प्रकारे, केवळ मूर्ती म्हणून देवतांची पूजा न करता, त्या देवतांच्या गुणांचे मुख्य स्त्रोत असलेल्या श्रीभगवानांना ओळखून पूजा-अर्चादि विधी केल्यास आपण सर्व बंधनांतून मुक्त होऊ, असे समर्थांना येथे सूचित करावयाचे आहे.

suvarna lele said...

या जगात १२ आदित्य आणि ११ रुद्र आहेत . ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे १००० युगे असतात .ब्रह्मदेवाच्या एकां दिवसात १४ ईंद्र होतात .म्हणजे सर्व देवांना पुनरावृत्ती असते .ती घडविणारा सर्व देवांच्या पलीकडे शाश्वत देव कोणीतरी असला पाहिजे .देवांची पुनरावृत्ती होते ,त्यांचा अर्थ ते अशाश्वत आहेत .हे सर्व देव हे मायेच्या कक्षेत येतात .ही माया ओलांडल्या शिवाय खरा शाश्वत देव सापडणार नाही दृश्य जगाकडे प्पाहावे तर खरा देव सांपडत नाही आणि देहधारी व्यक्तींकडे पाहावे तर ब्रह्मनिष्ठ कोण ते कळत नाही .



atulpadhye said...

नाही. 1 ब्रम्ह युग म्हणजे 1000 वर्षे नाहीत युग है प्रत्येक जीवत्म्यच्या त्याच्या गुण कर्मा नुसार त्या काळी ज्या गुणाचा प्रभाव असेल (उन्नत). त्या प्रमाणे तो जीवात्मा त्या युगात आहे असे जाणावें