Friday, March 8, 2013

श्लोक १६४

II श्रीराम समर्थ II
 
मनें कल्पिला वीषयो सोडवावा।
मनें देव निर्गूण तो ओळखावा॥
मनें कल्पिता कल्पना ते सरावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥१६४॥


 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १६४ .......
मनें कल्पिता विषयो सोडवावा |
मनें देव निर्गुण तो वोळखावा ||
मनें कल्पितां कल्पना ते सरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६४||
हिन्दी में .......
हुई अंतर की , विषय वासना छोड दे रे |
हुआ तेरे अंतर में , निर्गुण परब्रह्म देख रे ||
मन की कल्पित कल्पना को त्याग रे |
सदा सज्ज नों की सन्गती में रह्रो रे || १६४||
अर्थ...श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! विचारों में आये हुए अशुध्द विचारों को त्यागनें का प्रयत्न करना चाहिये और भगवान के निर्गुण स्वरुप को पहचानने का प्रयास करना चाहिये | यदि मन में बुरी कल्पनायें आती है तो उन्हें छोडने का प्रयत्न करना चाहिये तथा सदैव सज्जन लोगों की संगति में रहना चाहिये | जिससे अपने जीवन का मार्ग सार्थक करने के लिये सहजता प्राप्त होगी |

suvarna lele said...

मन कल्पनाचे भांडार आहे .आपल्याला कल्पना ही करता येणार नाही इतक्या अनंत कल्पना आपल्या मनात एकां क्षणी येउन जातात .त्या कल्पनांमधून अनेक विषयांचा आपण विचार करत असतो .आपण त्या विषयांचा विचार करत च जगत असतो . असा एकही क्षण जागेपणी येत नाही की जो कल्पनाविरहित ,विचारांच्या विरहीत असतो .कल्पना जेव्हा विषयांच्या संदर्भात असतात तेव्हा त्या कल्पना द्वैत युक्त असतात त्या अशुध्द कल्पना मानल्या जातात .जेव्हा कल्पना ब्रह्माचा विचार करणा-या असतात तेव्हा त्या अद्वैत युक्त असतात त्या शुध्द कल्पना मानल्या जातात .कोणताही विचार मनात न येणे ही निर्विकल्प अवस्था मानली जाते .मन नेहमी अशुध्द ,मायिक कल्पनेचे विलास भोगत असते .ते दूर करण्या साठी श्रवण ,मनन ,निदिध्यास या साधनांचा अभ्यास करावा लागतो .शुध्द कल्पनांनी ब्रह्माचा विचार होतो .पण शुध्द आणि अशुध्द दोन्ही कल्पना मनात येत नाहीत .तेव्हाच निर्विकल्प अवस्था तेव्हाच प्राप्त होते .त्यासाठी एकच उपाय समर्थ सांगतात की सज्जन संगती धरा .