Friday, March 22, 2013

श्लोक १६६

II श्रीराम समर्थ II 

 अहंकार विस्तारला या देहाचा।
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥
बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १६६....
अहंकार विस्तारला या देहाचा |
स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा ||
बळे भ्रांति हे जन्म चिंता हरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||
हिन्दी में....
अहंकार से भरी है यह काया |
पुत्र , पिता बन्धु की है माया ||
भ्रान्ति भ्रम की चिंता को हरो |
सदा संगती सज्जनों की धरो ||१६६||
अर्थ.... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! मोह माया के कारण इस शरीर का अहंकार बढता ही जाता है | अत: स्त्री , पुत्र , मित्र , सभी अपनों का मोह कम नही होता | इन लोगों की चिंता करके भ्रम रुपी अहंकार का अंत करना चाहिये अर्थात् मोह माया के भ्रम से दूर होकर सदैव सज्जन लोगों की संगति का प्रयास करना चाहिये | जिससे अपना जीवन सार्थक करने का मर्ग सुलभ हो जाता है |

suvarna lele said...

अहंकाराचे मूळ स्वरूप शुध्द आहे कारण ते परब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण पावले आहे ‘अहं ब्रह्मास्मि ‘हे मूळ स्फुरण ! ते शुध्द च आहे .पण जीवदशेमधील स्फुरण अहं देहोस्मी असते त्यामुळे ते अशुध्द ,शबल होते .या अहं देहोस्मी मध्ये हा अहं भाव अंत:करणाच्या तंत्राने वागू लागतो .तेव्हा तो चित्त चतुष्टयातील अहंकार बनतो .देहाशी इतका एकरूप होतो की भोगायला लागणारी सुख दु:ख त्यालाच भोगावी लागतात असे त्याला वाटू लागते .त्याच्या मूळ स्वरूपाचे त्याला विस्मरण होते .व जे दिसेल ते मी असे त्याला वाटू लागते .
संकल्प विकल्प करणारे मन म्हणजे मी ,विषय चिंतन करणारा मीच असे वाटते .म्हणजे तो चित्त होतू .कोणताही निश्चय करणारा तो मीच असे वाटते म्हणजे तो त्यावेळेस बुद्धी होतो .अहंकार जास् जसा वाढत जातो तेव्हा स्त्री ,पुत्र ,मित्र ते माझेच असे त्याला वाटू लागते .तो सर्व स्थावरावर आपला मालकी हक्क सांगू लागतो .
म्हणून समर्थ सांगतात की मी माझेपण साने हा भ्रम आहे .त्या भ्रमानेच जन्म मृत्यू चक्र मागे लागते .हे सर्व मी माझेपण करताना माणसाच्या लक्षात येत नाही की ज्या गोष्टी मी आणि माझ्या म्हणतो आहे त्या मृत्यू नंतर आपल्या बरोबर नेता येणार नाहीत ,आपले अनेक जन्म झाले ,अनेक माय बाप झाले ,पुत्र ,कन्या झाले .ते कोणीही बरोबर आले नाहीत .पण हे सर्व समजण्यासाठी समर्थ सांगतात की सत्संगती हवी .तरच ते कळेल .