Friday, March 15, 2013

श्लोक १६५

II श्रीराम समर्थ II 


देहादीक प्रपंच हा चिंतियेला।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥
हरीचिंतने मुक्तिकांता करावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥



 जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक१६५.......
देहादीक प्रपंच हा चिंतियेला |
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ||
ह्री चिन्तने मुक्ति कांता वरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६५||
हिन्दी में.....
देह और प्रपंच चिंता को है बना |
पर अंतर का लोभ नही छोडा ||
हरी चिन्तन से मुक्तीकांता पा ले |
सदा संगती सज्जनों की तु धर ले ||१६५||
अर्थ....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! प्रपंच में आनें वाली कठिनाईयों से देह को चिंता लगी रहती है परन्तु फ़िर भी मनुष्य के अंतरमन में लालच बना रहता है | इसलिये यह सब छोडकर उसी हरी का चिंतन करके मुक्ति रुपी कन्या का वरण करना चाहिये तथा सदैव सज्जन लोगों की संगति में रहना चाहिये तथा अपने जीवन को सार्थक करना चाहिये |

suvarna lele said...

देह आणि त्या संबंधाने येणारे सर्व विषय त्यालाच प्रपंच म्हणतात .देह त्रिविध तापाने पोळतो ,कधी सुख कधी दु:ख या हिंदोळ्यावर झुलतो पण तरीही देहाची आसक्ती कमी होत नाही .आसक्तीमुळे जन्म मरणाची यातायात सुरु रहाते .देह आणि देहाला प्राप्त होणारी सुख दु:खे नश्वर आहेत ,नाशिवंत आहेत तरीही माणसाला त्याचीच आसक्ती असते .
त्यावर उपाय समर्थ सांगतात –‘हरीचिंतने मुक्तिकांता वरावी ‘भगवत गीतेत भगवंतांनी एक उपाय सांगितला आहे .ते म्हणतात ‘मन्मना भव ,मत्भक्तो मयाजी मां नमस्कुरु || भ गी ९-३४ ||
माझे अनुसंधान धर .प्रापंचिक कल्पना जाळून टाक .माझ्या भावनेने भरून जा .तर तू मात्स्वरूप होशील .असे केलेस तर तुझ्या गळ्यात मुक्ती रुपी कांता माळ घालेल .तू मुक्त होशील .
हे सर्व सज्जन संगतीनेच शक्य होईल .म्हणून सज्जनांची संगत धर .



समर्थदास said...

देहाच्या ठिकाणचा अहं भाव, प्रपंचावरिल ममत्वाच्या, लोभाच्या, हव्यासाच्या रूपात विस्तारतो. सामान्य मनुष्य देवाची भक्ती देखील प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून करतो. थोड्या-थोडक्या ज्या विवंचना प्रारब्धाने प्राप्त झाल्या आहेत, त्या देखील सोसून घेता येत नाही त्याला. त्यासाठी तो देवाला साकडे घालतो. असा मनुष्य जो देवाला स्वार्थासाठी हाक मारतो, तो सदा सर्वकाळ स्वत:च्या स्वार्थाचाच विचार करतो हे निश्चित. हेच विचार जेव्हा भगवत् मय होतात, तेव्हाच मनुष्य योगारूढ होऊन मुक्तीरूपी कन्या वरतो.
पण त्यासाठी गरज आहे कुसंगाचा त्याग करण्याची व सत्संगात रमण्याची.
मग ज्याप्रमाणे शिवाजीच्या योगाने सबंध महाराष्ट्रामध्ये क्षात्रतेज प्रज्वलित झाले, त्याप्रमाणे सत्संगतीत राहणारा मनुष्यदेखील भगवत् परायण होऊन पावन होऊन जातो.