Friday, March 1, 2013

श्लोक १६३

II श्रीराम समर्थ II 

 
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।
देहातीत ते हीत सांडीत गेला॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥



जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १६३ ........
देहे बुध्दि चा निश्चयो द्रुढ जाला |
देहातीत ते हीत सांडीत गेला ||
देहे बुध्दि ते आत्म बुध्दि करावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६३ ||
हिन्दी में .....
देह बुध्दि का निश्चय द्रुढ होता |
देहबुध्दि से पर हीत छोड जाता ||
देह बुध्दि से आत्म बुध्दि करो रे |
सदा संगती सज्जनों की धरो रे ||१६३ ||
अर्थ.... श्री राम दास जी कहते है कि हे मानव ! जिस मनुष्य की शारिरीक बुध्दि का विचार जब द्रुढ निश्चय हो जाता है , तब देह त्यागनें पर अर्थात् अंतकाल पश्चात् भी दूसरों का हित करनें का कार्य करता रहता है | देह बुध्दि को आत्म बुध्दि में बदलनें का प्रयास करते रहना चाहिये अर्थात् अहं ब्रम्हास्मि में लीन होकर , सदैव सज्जन लोगों की संगति में रहनें का प्रयास करना चाहिये | जिससे अपने जीवन को सार्थक करने का ,मार्ग सहज हो जाता है |

suvarna lele said...

अहंतेमुळे देहबुद्धी दृढ होते .देह्बुध्दी म्हणजे मी माझेपण ,त्यातून येणारी माया ममता ,. हा देह म्हणजे मी मानले की माझ्या देहाविषयी मला प्रेम निर्माण होते .या देहाच्या सौख्यासाठी पाहिजे ते कष्ट करण्याची तयारी असते .या देहाशी संबंधित असणारे माझे घर ,माझी मुले ,माझी पत्नी /पती यांच्या विषयी ममत्व निर्माण होते .त्यांच्यात एखादी गोष्ट कमी पडली की ती गोष्ट मिळावी अशी कामना निर्माण होते ,ती पूर्ण झाली नाही की क्रोध येतो ,मग मत्सर अशी चढत्या क्रमाने षडरिपू आपल्यात येतात आणि मग जन्म मरणाच्या फे-यातून जीवाची सुटका होत नाही .मी देह या अज्ञानातून अहं आत्मा या ज्ञान दृष्टीचा विसर पडतो .
या ज्ञान दृष्टीचा विसर पडू नये म्हणून समर्थ एक उपाय सांगतात –देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी . देहबुद्धी ची आत्मबुद्धी करायची म्हणजे मी आत्मा आहे असा सूक्ष्म विचार करायचा .त्यासाठी अहंकार समूळ नष्ट व्हावा लागतो .अहंकार म्हणजे ‘मी पणा’ मी पणा सहजा सहजी नाहीसा होत नाही .त्यासाठी सत्संगतीच लागते .
सत्संगतीत सतत श्रवण घडते .त्या श्रवणातून कळते की देह देउळ आहे आणि आत्मा देव आहे .देहरूपी देवळात न रमता त्यात वास करणारे चैतन्य म्हणजे आत्मा खरा देव आहे हे जाणता येते .आत्माच आपल्या कडून सर्व गोष्टी करवून घेतो .असा निश्चय जेव्हा होतो तेव्हा देहबुद्धी जाउन आत्मबुद्धी होते .ही किमया सज्जन संगतीतच होते .