Friday, January 4, 2013

श्लोक १५५

II श्रीराम समर्थ II

दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।
बरे पाहता गूज तेथेचि आहे॥
करी घेउ जाता कदा आढळेना।
जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १५५...
दिसेना जनी तेचि शोधूनि पाहे |
बरे पाहतां गूज तेथेचि आहे ||
करी घेऊं जाता कदा आडळेना |
जनी सर्व कोंदाटले ते कळेना ||१५५||
हिन्दी में ......
दिखता नही लोग ढूंढते है उसको |
देखो ध्यान से सार मिलता है उसको |
कभी लेकर जाते मिलता नही जो |
सब ओर अंधेरा है समझे ना उसको ||१५५||
अर्थ..... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! मनुष्य सर्वत्र ब्रह्म को ढूंढता रहता है परन्तु उसे ब्रह्म प्राप्त नही होता | क्योंकि सर्वत्र प्पाप रुपी अंधकार फ़ैला हुआ है वही दिखाई देता है |अत: जो दिखाई नही देता है उसे अपनें ज्ञान चक्षुओं के द्वारा ढूंढने का प्रयास करना चाहिये | सर्वत्र देखकर यही समझ में आता है कि जीवन का गुह्य [गूढता] अर्थात् परब्रह्म यही पर है |

suvarna lele said...

जे या चार्म चक्षुनी दिसत नाही ,जे ईंद्रीय गोचर नाही ते परमतत्व ,परब्रह्म मानव जन्माला येऊन शोधून काढायचे आहे .त्याकडे बरे पाहता म्हणजे नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर ते रहस्य वाटत होते ते तेथेच आहे असे समजते .म्हणजे म्हणजे या स्थूळ देहाचा शोध घेतला ,मी कोण ,देव कोण याचा शोध घेतला तर असे दिसते ते परमतत्व म्हणजे माझ्यातालेच चैतन्य आहे ,ते आपल्या हातात आपण घेऊन जाऊ शकत नाही .हातात धरून नेण्यासारखी ती गोष्ट नाही .कारण ते सर्वत्र व्यापून आहे .ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्यापून आहे त्याप्रमाणे ते परमतत्व सर्वत्र व्यापून आहे .म्हणूनच येथे कोंदाटले असा शब्द वापरला आहे .या सर्व जगाला त्या परम तत्वाचेच अधिष्ठान आहे .
परब्रह्माचा मागोवा कसा घ्यायचा याची दृष्टी संत सज्जन च देऊ शकतात .सद्गुरुंकून द्न्यांकारून घेणे हे सर्वात महत्वाचे .