Friday, September 14, 2012

श्लोक १३९

II श्रीराम समर्थ II


पुढें पाहता सर्वही कोंदलेसें।
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥
अभावे कदा पुण्य गांठी पडेना।

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १३९...
पुढे पाहतां सर्वही कोंदलेसे |
अभाग्यास हे द्रुष्य पाषाण भासे ||
अभावे कदा पुण्य गाठी पडेना |
जुने ठेवणे मी पणे आकळेना ||
हिन्दी में....
१३९..
आगे तो सब कुछ है फ़ैला हुआ रे |
अभागी को ये द्रुष्य पाषाण लागे रे |
पुण्य के अभावि कुछ भी ना मिलता |
राख जो अहं भाव वो भी ना दिखता ||१३८||
अर्थ... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मनुष्य ! जीवन में प्रत्यक्ष रुप में सब कुछ विस्त्रुत है जो व्यक्ति अभागी होता है उसे आत्माधन पाषाण के समान लगता है | श्रध्दाहीन भावना से किए हुए कार्य द्वारा पुण्य प्राप्त नहीं होता अर्थात् कार्य करनें में निष्ठा होना आवश्यक है तथा कोई भी कार्य विवेक से सोच समझकर करना चाहिये | अहंकार का भाव रखकर जीवन व्यतीत नही करना चाहिये , क्योंकि अपनें पूर्व संचित का यह भोग होता है इसे ध्यान में रखना चाहिये | अहंकार रहित जीवन शांत एवं संतुष्ट होता है |

suvarna lele said...

आपले तत्वज्ञान सांगते की सर्व ब्रह्म आहे .जे जे दिसते ते ब्रह्माचेच दृश्य स्वरूप आहे .त्या ब्रह्मातच मी आहे .मी जे पाहू शकतो ,जे पाहू शकत नाही ,दृश्य प्राण्यांपासून ते सूक्ष्म कृमी कीटकांपर्यंत ते सर्व ब्रह्म आहे .आपली दृष्टी जाते त्या ग्रह ता-यां पासून जे आपल्या दृष्टी पलीकडे आहेत त्या सर्व ग्रह ताऱ्यां पर्यंत सर्वाना व्यापून असणारे ते ब्रह्मच आहे .पण ही दृष्टी आपल्या सारख्या सामान्यांना नसते .ते या सृष्टी कडे या ग्रह ता-यां कडे जसे दिसते तसे बघतात .त्यामुळे आपण या सर्वांना जड मानतो .पाषाण मानतो .
आपल्या आयुष्यात श्रद्धेला ,भावनांना बुद्धी इतकेच महत्व आहे .श्रद्धेने ,भावनेने आपण शास्त्र वचनांवर विश्वास ठेवतो .संतांवर ,त्यांनी सांगितलेल्या वचनांवर विश्वास ठेवतो .कोणतीही गोष्ट चांगली व्हावी असे वाटत असेल तर अंत:करणात भाव असावा लागतो .भाव असेल तर हिताचा मार्ग दिसतो .म्हणून समर्थ म्हणतात ‘अभावे कदा पुण्य गाठी पडेना | आपले अंत:करण यम नियम पाळून समतोल निर्णय घेऊ शकते .साधने करून अंत:करण निर्मळ होते .आणि मग मी ब्रह्म आहे याचा साक्षात्कार होतो .