Friday, July 20, 2012

श्लोक १३१

II श्रीराम समर्थ II
 

भजाया जनीं पाहतां राम एकू।
करी बाण एकू मुखी शब्द एकू॥
क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू।
धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १३१.....
भजाया जनी पाहतां राम एकू |
करी बाण एकू मुखी शब्द एकू ||
क्रिया पाहतां उध्दरे सर्व लोकू |
धरा जानकी नायका चा विवेकू ||१३१||
हिन्दी में ...
भजो राम नाम वही तुम एक |
करो बात मुख से वही राम एक ||
क्रिया देखते ही करते उध्दार तेरा |
रहे जानकी नायक यही बना मेरा ||
अर्थ..... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! भक्ति करने के लिये एक है श्रीराम को भजो | बात भी एक राम की ही करो , अर्थात अपने जीवन में राम ही सर्वस्व रहे | गलत कार्य करते हुए देखकर सारे लोग बुराई करते रहते है | इसलिये अपनें विवेक पूर्ण विचारों से श्री राघव के नाम का नामस्मरण करते हुए भक्ति के मार्ग पर चलना चाहिये | यही तुम्हारे हित में होगा |

suvarna lele said...

समर्थ म्हणतात की या जगात भजन करण्यास एकच दैवत आहे ते म्हणजे श्रीराम ! श्रीराम एकबाणी,एकवचनी ,आहेत .
एकबाणी म्हणजे जेथे बाण मारणार तेथे एकदा मारलेला बाण लागणारच .त्यासाठी पून्हा दुसरा बाण कधीच लागणार नाही एकवाणी म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी नेमके तेच बोलणार .नेमके तेच करणार .मुखी शब्द येकु म्हणजे तोंडातून उच्चारला गेलेला शब्द खरा करणारा ,तो एकवाणी . शब्द न पालटणारा !
श्रीरामचंद्रांच्या सर्व क्रिया लोकांच्या उध्दारासाठी च होत्या .विश्वामित्रांच्या यज्ञाच्या संरक्षण करण्यापासून सीतात्यागापर्यंत सर्व घटना श्रीरामांच्या उदात्तपणा दाखवतात .म्हणून समर्थ म्हणतात की जानकीनायकाचा विवेक धरा ..जानकीनायकाचा रामचंद्रांचा आश्रय घ्या ,त्याचेच भजन करा ,स्मरण करा ,चिंतन करा .सीतेच्या विरहाने शोकाकूल झालेले श्रीराम ,वालीचा वध करणारे श्रीराम ,सुवर्ण मृगाच्या मागे गेलेले श्रीराम ई प्रसंग श्रीरामचंद्रांच्या थोरवीचे पैलू दाखवणारे च आहेत .हे सर्व समजून घेतले पाहिजेत त्यासाठी समर्थ विव्वेक हा शब्द वापरतात .