Friday, May 18, 2012

श्लोक १२4

II श्रीराम समर्थ II


अहल्येसतीलागी आरण्यपंथे।
कुडावा पुढे देव बंदी तयांते॥
बळे सोडितां घाव घालीं निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥



डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १२३ .....
अहल्ये सति लागि आरण्य पंथे |
कुडावा पुढे देर बंदी तयां ते ||
बळे सोडिता घाव घाली निशाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |
हिन्दी में ..
अहिल्या के लिये आरण्य पंथ भोगा |
जिसे जेर बंदी से मुक्त कराया ||
सति मुक्ति पर नगाडे दुमदुमाये |
सदा अभिमान भक्त का देव करते ||१२३||
अर्थ...
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव ! सती अहिल्या के रक्षण के लिये जंगल के रास्ते भगवान गये थे और उसे जेर बंदी वास से मुक्त कराया था | उसका प्रगट होने पर नगाडे की आवाज के साथ जताया गया था | ऐसे भगवान श्री राम अपने भक्त का सदा अभिमान ही करते है | उसकी उपेक्षा कभी नही करते |

lochan kate said...

हा श्लोक १२३ वा आहे .......... क्रुपया भूल चूक कडे लक्ष द्यावे ही विनंती......|

suvarna lele said...

अहिल्येच्या हातून घडलेल्या दोषामुळे संतापलेल्या गौतमाने शाप दिला व एकां निर्जन अरण्यात अहिल्या शिळा होऊन पडली .श्रीरामांच्या पवित्र पदस्पर्शाने अहिल्या उद्धरून गेली .त्यासाठी श्रीरामांना अरण्यातून जावे लागले .
रावणाने उन्मत्त पणे देवांना बनवले त्यांना हलकी कामे करायला सांगितली .देवांचे जीवन लाजिरवाणे झाले ,दु:खमय झाले .भगवान रामचंद्रांनी आपल्या पराक्रमाने रावणाला जिंकून सर्व देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवले .
अशा प्रकारे श्रीराम म्हणजे परमेश्वर भक्ताची उपेक्षा करत नाही .त्याचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो .