II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
मना सर्वदा सज्जनाचेनि योगें। |
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥ |
क्रियेवीण वाचाळता ते निवारी। |
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥ |
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
श्लोक १०८...
मना सर्वदा सज्जनाचेनि योगे |
क्रिया पालटे भक्ति भावार्थ लागे |
क्रिये वीण वाचाळता ते निवारी |
तुटे वाद संवाद तो हितकारी ||१०८||
हिन्दी में ...
मन हो सदा सज्जन संगति से |
क्रिया होती भक्ति भावार्थ लग के | |
क्रिया बिन वाचालता है विकारी |
छुटे वाद संवाद वो हितकारी ||१०८||
अर्थ......
श्री राम दास जी कहते है कि हे मानव ! सदैव सज्जन लोगों की संगति के योग से कर्म की गति बदल जाती है और मनुष्य में भक्ति की भावना जाग्रुत होती है |कोई भी कार्य किये बिना ही वाचालता करना मूर्खता है | वाचाल प्रव्रुत्ति को छोडकर कर्म की प्रव्रुत्ति होना चाहिये | जिसके कारण किसी भी प्रकार का वाद विवाद हो तो समाप्त हो जाता है एवं स्थिति सामन्य हो जाती है और अपने हित मे सब हो जाता है |
मागील श्लोकात समर्थांनी दुष्ट संगती टाळून संत संगती धरायला सांगितले आहे .संत संगतीने क्रिया पालटे ,भक्तिभावार्थ लागे असे समर्थ म्हणतात .संत संगतीने क्रिया पालटे म्हणजे संत संगतीच्या आधी असणारा मी आणि संत संगतीनंतरचा मी यात फरक पडतो .भावहीन ,भक्तिहीन ,माणूस बदलतो .तो भक्तिमार्गाकडे लागतो .परमेश्वरावर विश्वास नसणारा माणूस ,परमेश्वरावर विश्वास ठेउ लागतो त्यांचा मी पणा नाहीसा होतो ,मी कर्ता ही भावना नाहीशी होते ,व राम कर्ता ह्यावर विश्वास बसतो
साधू सानाग्तीत श्रवण केल्यामुळे भक्ती ,ज्ञान ,वैराग्य ,स्वधर्म ,साधन यासंबंधी बोध होतो .आचार विचारात योग्य बदल होतो ,श्रवण याचा अर्थ नुसते ऐकणे नाही तर संत मुखातून जे ऐकले आहे त्याप्रमाणे आपला आचार विचार बदलणे .तसे ते आपल्या कृतीत आणणे .
या श्लोकात आणखीन एक गोष्ट समर्थ सांगतात की वाद न करता संवाद साधायला समर्थ येथे सांगत आहेत .इथे समर्थ साधू बरोबर वाद करू नका असे समर्थ सांगतात .साधू कडे जाताना गंमत म्हणून जाउन साधूला काहीतरी प्रश्न विचारायाचे आणि साधुशी वाद घालायचा असे करू नये असे समर्थ सांगतात साधूकडे जाताना आदरबुद्धी ने जाउन सत्संग करून परिप्रश्नेन सेवया या भक्तीच्या प्रकारानुसार प्रश्न विचारून आपले संशय नाहीसे करून घ्यायला समर्थ सांगतात .तेव्हाच संवाद होतो ,व तोच सुखाचा होतो .
Post a Comment