Friday, October 14, 2011

श्लोक ९४

II श्रीराम समर्थ II 
 
तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां।
निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥
जपे आदरें पार्वती विश्वमाता।
म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥


जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

suvarna lele said...

सुरेंद्रचंद्र शेखरू |अखंड ध्यातसे हरू | जनासी सांगतो खुणा |श्रीराम राम हे म्हणा || सुरेंद्र ,चंद्रशेखर असे शंकर स्वत: रामनाम आदराने जपतात .कारण समुद्र्मंथनात बाहेर आलेल्या विषाचे जगकल्याणासाठी हलाहल विष प्राशन केले तेव्हा झालेला दाह इतका होता की कोणत्याही उपायांनी शांत होईना .शेवटी रामनामाचा उपाय लागू पडला .
भगवान शंकरांना जेव्हा क्रोध येतो तेव्हा त्यांच्या तृतीय नेत्रात तीनही लोक जाळून टाकण्याची शक्ती असते .दक्षप्रजापतीची कन्या उमेचा दक्षाने जाणून बुजून अपमान केला .श्रीशंकराना इतका क्रोध आला की तीनही लोक जाळून भस्म होतील .पण तसे झाले नाही . तेव्हा आपल्या संहार करण्याच्या शक्तीपेक्षा सांभाळ करणारी शक्ती मोठी आहे हे त्यांच्या लक्षात आले ,आणि श्रीरामांचे नाम ते घेउ लागले .त्यांचा संताप कमी होऊन त्यांना शांती लाभली .हा नामाचा प्रताप पाहून जगन्माता पार्वती आदरपूर्वक नाम जपू लागली .

Dr.Madhavi Mahajan said...

संतापले तर तिन्ही लोकांना जाळून टाकण्याचे सामर्थ्य असलेले भगवान शंकर देखील रामनामाच्या प्रभावाने शांत झाले. तसेच विश्वाची जननी जगदंबा पार्वती देखील ते नाम आदराने जपते. भगवान शंकर नामाचे महत्व समजून घेऊन नाम घेतात. नामा बद्दल आलेल्या श्लोकांमध्ये एक आदर्श तपस्वी म्हणून समर्थ भगवान शंकराचे अनेकदा स्मरण करतात. करिता तापसांची कडसणी । कवण जवळी ठेविजे शूलपाणी ॥ असे ज्ञानदेवांनी देखील म्हटले आहे. नामाचा महिमा भगवान शंकरांनी जाणला तसाच संत महंतांनी देखील जाणला. म्हणून आपण त्या नामाचा आनंद घ्यावा आणि समाधान प्राप्त करुन घ्यावे यासाठी संत आपल्य़ाला नामाचे महत्व सतत पटवून देतात. श्रीब्रह्मचॆतन्य महाराजांनी नामाचे महत्व वारंवार समजावून सांगितले आहे..ते म्हणतात परमात्मा दयाळू फ़ार । आपले हिताचे करील हा ठेवावा र्निधार ॥ मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास । न सोडावा आता धीर । सदा घ्या भगवंताचे नाम । जेणे कृपा करील रघुनंदन ॥ राम कृपाळू दीनांचा नाथ । तो सर्व कांही पाहात ॥ आपले प्रारब्धाने आलेले कर्म । ते त्यास न विसरता करावे अर्पण ॥ सुखाने घ्या नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥ हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥
॥जय जय रघुवीर समर्थ॥

lochan kate said...

श्लोक ९४...श्लोक ९४...
तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां |
निवाला हरु तो मुखे नाम घेतां ||
जपे आदरे पार्वती विश्वात्मा |
म्हणोनि म्हणा तेचि हे नांम आतां ||९४||
हिम्न्दी में.......
तीनो लोक जला सके ऐसा है कोप |
राम नाम लेने से ही हरता है कोप ||
पार्वती भी सतत् करती है राम नाम |
इसिलिये लेते रहो सतत् ये नाम ||९४||
अर्थ....
श्रीराम दास जी कहते है कि हे मानव मन ! जब शंकर भगवान का कोप होता है तब तीनों लोकों को जला देने की क्षमता उनमें होती है | वाणी से हरि नाम लेते रहने से वह सदैव ही शांत रहते है | जगज्जननी पार्वती भी आदर से नाम का जाप करती रहती है | इसलिये हे मन ! तुम्हे भी यह राम नाम सतत् लेते रहना चाहिये |