II श्रीराम समर्थ II
जय जय रघुवीर समर्थ !
मुखी राम त्या काम बाधुं शकेना। |
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना॥ |
हरीभक्त तो शक्त कामास भारी। |
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥८७॥ |
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
श्लोक ८७....
मुखी राम त्या काम बांधु शकेना |
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ||
हरी भक्त तो शक्त कामास मारी |
जगी धन्य तो मारुति ब्रह्मचारी ||८७||
हिन्दी में .......
मुख में राम जिसके काम बान्धे ना उसको |
गुण और इष्ट पुजा छुटे ना जिसको ||
हरी भक्त जो , नष्ट वासना होती उसकी |
जग में धन्य है वो मारुति ब्रह्मचारी ||८७||
अर्थ..... श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन ! जिसके मुख में राम नाम है उसको विषय वासना अपनी ओर आकर्षित नही कर सकती | उस प्राणि का अपने इष्ट की आराधना के प्रति धैर्य डगमगाता नही है | यह उसका गुण है |उस निश्चल हरि भक्त की शक्ति , कामवासना का अंत कर देती है | अत: संसार में ऐसा ब्रह्मचारी धन्य है जो कि हनुमान के समान वंदनीय माना गया है |
जो अखंड रामनाम घेतो त्याला कामाची बाधा होत नाही .अखंड रामनाम घेतो तो इतका सामर्थ्यवान होतो की मोहात अडकवणारा काम त्याच्यावर काहीही परिणाम करत नाही .याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामभक्त हनुमान आहे .
जो अखंड रामनामात रंगून जातो त्याला बलवान असणारा कामही त्याला जगातील मोहात अडकवू शकत नाही .लोक सन्यास घेतात तेव्हा ते लोकांपासून लांब रहात असतात .त्यामुळे ते ब्रह्मचारी राहू शकतात .मारुतीला सीतेचा शोध घेताना ,तारेचे सांत्वन करताना ,रावणाच्या अंत:पुरात प्रवेश करताना स्त्रीचा मोह निर्माण होण्याचे अनेक प्रसंग आले पण मारुतीच्या मनात कामाने कधीही स्थान निर्माण केले नाही .कारण प्रत्येक स्त्री माता या दृष्टीने तो पहात होता .
त्याचे ब्रह्मचर्य जितके सहज होते तसे त्याची भक्तीही सहज होती .त्याने रामाची दास्यभक्तिच केली .रामाचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला .रामसेवेत त्याने अचाट कृत्ये केली .लक्ष्मण बेशुध्द पडलेला असताना थोड्या वेळात द्रोणागिरी पर्वत उचलून आणला ,आणि संजीवनी औषधीने लक्ष्मण शुद्धीवर आला .त्यांचा अहंकार श्रीरामांमध्ये विलीन होऊन गेला होता त्यामुळे तो करत असलेली भक्ती सहजभक्ती होती .सर्वत्र श्रीरामच पहात होता .तो करून अकर्ता होता .कारण त्याने केलेले कर्म अभिमान रहित होते .म्हणूनच समर्थ म्हणतात : जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ||
Post a Comment