II श्रीराम समर्थ ||
धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। |
तरा दुस्तरा त्या परा सागराते॥ |
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते। |
करा नीकरा त्या खरामत्सराते॥८०॥ |
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। |
तरा दुस्तरा त्या परा सागराते॥ |
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते। |
करा नीकरा त्या खरामत्सराते॥८०॥ |
2 comments:
श्लोक ८०....श्लोक ८०....
धरा श्री वरा त्या हरा अंतराते |
तरा दुस्तरा त्या पर सागराते ||
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते |
करा नीकरा त्या खरा मत्सराते || ८०||
हिन्दी में....
भजो श्री हरी को जो अंतर में है हर के |
तरो जीवन को उस परम सागर से ||
सदा भूल जाओ उस दुभर जीवन को |
करो दूर ठोकरों से वो मत्सर दंभ जो ||८० ||
अर्थ ..... श्रीराम दास जी कहते है कि हे मनव मन ! श्री शंकर जी के ह्रदय में बसने वाले श्रीराम चन्द्र जी का स्मरण करते रहना चाहिये तथा समुद्र जैसे प्रपंच [घर संसार] से अपने जीवन को सुधार लेना चाहिये | हे मनुष्य ! उस पापी पेट को भी भूल जाओ जिसके लिये दिनभर उहापोह में लगे रहते हो और साथ ही अपने मन की द्वेष की भावना नष्ट कर दो , तभी तुम्हारा जीवन सार्थक हो सकता है |
या श्लोकाचे वैशिष्ट्य असे की या श्लोकात ‘रा ‘ हे अक्षर १६ वेळा आलेले आहे त्यामुळे त्या श्लोकाची गेयता वाढली आहे .
धरा श्रीवरा ---श्री म्हणजे लक्ष्मी वर म्हणजे पती लक्ष्मी पती विष्णूला म्हणजेच श्रीरामा ला धरून ठेव हरा अंतराते ---श्रीरामाला धरून ठेवून अंत:करणाचा निरास कर .म्हणजे अंत:करण श्रीरामाला अर्पण कर ,त्यामुळे अंत:करण तुझे राहणार नाही .ते श्रीरामाचे होईल .श्रीरामाची ईच्छा तुझी ईच्छा होईल . तुझी ईच्छा वेगळी राहणार नाही .
दुसरा अर्थ असाही करता येईल की श्री शंकर ज्याचे नेहमी स्मरण करतात ,त्या लक्ष्मी पती विष्णूचे सतत स्मरण करून ,त्याला धरून ठेव .अशा वेळेस
‘तरा दुस्तरा त्या परा सागराते ‘ तरा –तरून जाणे ,दुस्तर कठीण ,तरून जाण्यास कठीण अशा भवसागर –संसार रूपी सागर .
श्रीरामांना अंत:करण अर्पण केलेस की तरून जाण्यास कठीण असा संसार रूपी सागर तू सहज पार करून जाशील कारण संसाररूपी सागर आटून जाईल ..संसार रूपी सागर आटेल याचा अर्थ संसार मिथ्या आहे हे कळेल ,त्याची प्रचीती येईल .मग बुद्धी वेगळी
राहणार नाही ती श्रीराम चरणी अर्पण होईल .बुद्धीचा निरास होईल .
सरा विसरा त्या भरा दुर्भराते ---दुर्भर म्हणजे कठीण .भरण्यास कठीण असे जे पोट ते भरा ,कारण पोट भरले नाही तर देह नाही , देहाशिवाय साधना होत नाही ..पण थोडा वेळ तरी पोटाला विसरा .थोडा वेळ तरी कृपा सिंधू ,करुणासागर श्रीरामाचे नाम घ्या ,त्याचे चिंतन करा .तरच पोटामुळे येणारा लोभ , लोभामुळे एखादी वस्तू मिळाली नाही तर येणारा क्रोध ,या सर्वांच्या पलीकडे तुम्ही जाल. म्हणजेच चित्तात
उमटणा-या उर्मीवर विजय मिळवाल म्हणजेच चित्ताचा निरास कराल.
करा नीकरा त्या खरा मत्सराते --- खर म्हणजे गाढव .गर्दभ रूपी मत्सर त्याच्याशी निकर कर म्हणजे मत्सराचा हट्टाने झगडून नाश कर .मत्सर निर्माण होतो मी पणा मुळे ! कारण मी पणा मुळे माझच खर ,माझ्याकडे सर्व असावं असं वाटत असते .एखादी गोष्ट दुस-या कडे आहे पण माझ्याकडे नाही असे होते तेव्हा दुस-या बद्दल मत्सर निर्माण होतो ,मत्सराते नीकरा म्हणजे मत्सराचा नाश कर .हट्टाने नाश कर म्हणजे तुझा अहंकार ही नाहीसा होईल .अहंकार नाहीसा झाला की देहबुद्धीचा निरास होईल आणि मग हे मना तू मोक्ष प्राप्तीचा हकदार होशील
थोडक्यात या श्लोकात समर्थ अंत:करण च्तुष्टयाचा निरास करायला या श्लोकात सांगतात
Post a Comment