Friday, May 20, 2011

श्लोक ७३

II श्रीराम समर्थ II

देहे दण्डणेचे महा दु:ख आहे |
महादु:ख ते नाम घेता न राहे ||
सदाशीव चिंतीतसे देव देवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७३||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ७३..
श्लोक ७३..
देहे दण्डणेचे महा दु:ख आहे |
महादु:ख ते नाम घेता न राहे ||
सदाशीव चिंतीतसे देव देवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७३||
[हिन्दी में]
देह दण्ड का दु:ख होता है भारी |
नामस्मरण मे समाता है सुख न्यारी ||
सदाशीव चिंतन करे राम का है |
प्रभात में कर नाम तु राम का रे ||७३||
अर्थ ....श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! शरीर में होने वाली बिमारियॉ मनुष्य के लिये महान दण्ड है जो दु:ख देती है | वह महान दु:ख राम का नामस्मरण करने से कम हो जाता है या हमें उस दु:ख को सहने की शक्ति मिलती है | श्री शंकर जी भी जो देवों के देव है श्रीराम का चिंतन करते रहते है | अत: हे मानव ! प्रात: के समय में ऐसे श्रीराम का चिंतन सतत करते ही रहना चाहिये |

suvarna lele said...

ईश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत .त्यात पंचाग्नी साधन ,उपासतापास ,हठयोग ,वायू भक्षण अशी कष्टाची साधने आहेत अशी साधने जेव्हा सातत्याने केली जातात तेव्हा ते तप होते. असे तप म्हणजे आपल्या आत्मानुभावाच्या विकासासाठी शरीराची झीज केली जाते तेव्हा ते तप होते .तप साधना करताना देहाला दु:ख दिले जाते ,कष्ट दिले जातात
असे कष्ट ,दु;ख न देणारे साधे सोपे साधन समर्थ सांगतात –नामसाधन ! नामसाधन करत असताना सुख होते ,आत्मानुभव येतो ,जीवाला ब्रह्मानंद प्राप्त होतो ,महादू:खाचे निवारण होते ,म्हणजेच दु:खाची निवृत्ती होते ,परम सुखाची प्राप्ती होते .जन्म मरणाची पुनरावृत्ती थांबते ,असे हे नाम श्रेष्ठ आहे
या नामाचे महात्म् देवांचे देव महादेव ही जाणतात .ते श्रीरामांच्या जप साधनेतच असतात .समुद्र मंथनात निघालेले हलाहल विष त्यांनी प्राशन केल्यावर कोणत्याही उपायांनी घशाचा दाह थांबला नाही ,तेव्हा श्रीराम नामाने त्यांचा दाह शांत झाला .राम नाम दु;खहारक आहे .
नाम साधने मध्ये गुंगून जाणे ही आपल्या जीवनातली प्रभात आहे .