Friday, May 13, 2011

श्लोक ७२..

II श्रीराम समर्थ II

न वेचे कदा ग्रन्थिचे अर्थ काही |
मुखे नाम उच्चारितां कष्ट नाही ||
महाघोर संसार - शत्रु जिणावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७२||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate....श्लोक ७२..
[हिन्दी में]
न खर्चता है कुछ नाम लेने से तेरा |
उच्चारता कष्ट ना होता है फ़ेरा ||
संसार है शत्रु महाघोर होता |
प्रभात में कर राम चिंतन भ्राता ||७२||
अर्थ... श्रीराम दास जी कहते है कि हे मानव मन ! जो मनुष्य कभीभी किसी सद् ग्रन्थ का वाचन , मनन नही करता उसे जान लेने का प्रयत्न भी नही करता उसे श्रीराम का नाम लेने में अपनी गॉठ का कुछ भी पैसा खर्च नही होता है और न ही कष्ट होता है | महान पाप जो संसार का शत्रु है उसे श्रीराम का नामस्मरण करके जीता जा सकता है | अत: श्रीराम का नामोच्चार सतत करते रहना चाहिये | साथ ही प्रात: समय में सतत चिंतन करते रहना चाहिये |

suvarna lele said...

पहाटे ४|| ते ५ च्या दरम्यान उठून नाम घ्यायला बसण्याची ईच्छा होणे म्हणजे आपल्या जीवनात प्रभात झाली असे म्हणायला हवे
या श्लोकात श्रीसमर्थ नाम साधन कसे फुकटात होणारे साधन आहे ते सांगतात .यज्ञ ,याग ,व्रते ,तीर्थस्थानांना भेट देणे ,या सर्व गोष्टींना पैसे लागतात .यज्ञ याग करताना ब्राह्मणांना दक्षिना द्यावी लागते म्हणजे पैसे खर्च होतात .पण नाम हे साधन असे आहे की ते फक्त वाचेने उच्चार करावा लागतो ,तेही फुकट !
वेद म्हणत असताना उच्चार शुध्द व स्पष्ट असावे लागतात .पण नामाचे तसे नाही
नाम केव्हाही ,कसेही घेता येते .वाल्या कोळ्याने उलटे नाम घेतले पण तो तरून गेला .त्याने घेतलेले नाम इतके भक्तीभावाने ,प्रेमाने घेतले की त्याच्या अंगावर वारूळ तयार झाले तरी त्याला कळले नाही .
जेव्हा आपण आवडीने एखादे काम करतो तेव्हा आपल्याला त्यात कष्ट वाटत नाहीत .नाम जेव्हा आवडीने ,प्रेमाने घेतले जाते ,तेव्हा त्यात त्रास वाटत नाही नाम साधने साठी आपल्याला गोंदवलेकर महाराज ,तुकाराम महाराजाची आठवण येते .त्यांची नामसाधना इतकी होती की नामाचा गजर करून शिवरायांचे रक्षण केले .
नाम साधनेने महाघोर अशा शत्रूवरही मात करता येते .श्री समर्थ संसाराला महाघोर शत्रू म्हणतात कारण संसार काळजी ,चिंतांनी भरलेला आहे .एक काळजी संपली की दुसरी हजरच असते .चिंता न संपणा-या असतात .माणसाला संसारात त्रिविध ताप भोगावे लागतात ,त्याला जन्म मृत्यूचे चक्र सतत फिरावे लागते . पण नाम साधनेने हा संसार तरून जाता येतो .
म्हणूनच समर्थ म्हणतात ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा | पुढे वैखरी राम आधी वदावा ||