II श्रीराम समर्थ II
अति मूढ त्या द्रुढ बुधि असेना |
अति काम त्या राम चित्ती वसेना ||
अति लोभ त्य क्षोभ होईल जणा |
अति विषयी सर्वदा दैन्य वाणा ||६४||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
अति मूढ त्या द्रुढ बुधि असेना |
अति काम त्या राम चित्ती वसेना ||
अति लोभ त्य क्षोभ होईल जणा |
अति विषयी सर्वदा दैन्य वाणा ||६४||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
As stated by Lochan Kate ( Gwaliar).... अति मूढ है जो उसे बुध्दि कैसी|
अति वासना से रम्म बसते न चित्ती||
अति लोभ करने से क्षोभ होता |
अति विषयो से सर्वदा दीन होता ||६४||
अर्थ...श्री राम दास जी कहते है कि हे मनुष्य मन ! अत्यंत मूर्ख व्यक्ति की बुध्दि कभी भी स्थिर नही रहती है जिसका मन विभिन्न विषयों में आसक्त रहता है जिसके मन मे अत्यंत लोभ हो , उसे सिर्फ़ दु:ख ही प्राप्त होताहै और जो अत्यंत विषय लोलुप होता है वह सदैव सबके सामने दीन बना रहता है |अत: हे मनुष्य ! स्थिरता पूर्वक आसक्ति हीन वर्तन करते हुए जीवन के कार्य करना चाहिये |
हा श्लोक बध्दावस्था दाखवणारा आहे .या श्लोकात प्रत्येक चरणाची सुरुवात अति या शब्दाने केला आहे .बध्द अति मूढ असतो ,त्याच्या जवळ अति काम असतो .तो अतिशय लोभी असतो .तो सर्व विषयांच्या बाबतीत दैन्यवाणा असतो .
बध्दाजवळ मूर्खपणाची सगळी लक्षणे असतात .अति मूर्खाची व्याख्या करताना समर्थ म्हणतात : परम मूर्खामाजी मूर्ख | जो संसारी मानी सूख || तो संसारात सूख मानत असल्यामुळे ,त्याच्या जवळ तमोगुणाचे प्राबल्य असते .त्यामुळे तो स्थिर बुद्धीचा नसतो . त्याची बुद्धी नुसती स्थिर नसते असे नाही तर त्याची बुद्धी विपरीत असते .म्हणजे धर्माला ती अधर्म समजते . सहाजिकच बुद्धीला स्थिरता नसते ,निश्चितपणा नसतो .
बुद्धीचा निश्चितपणा तेव्हाच येतो जेव्हा बुद्धीची खात्री पटते की एक ईश्वरच आहे की जो सर्वत्र आहे .तोच सगळ्या गोष्टींचे नियंत्रण करतो आहे .हा विचार फक्त पारमार्थिक बुध्दितच दिसतो .अशी बुद्धी ब्ध्दात दिसत नाही .कारण दु:खाला कारणीभूत असणा-या या नश्वर संसाराला बध्द खरा मानतो .या खं-या भासणा-या संसारात मला हे हवे ,मला ते हवे ,अशा वासना सतत निर्माण होत राहतात .वासना कामनेमध्ये रूपांतरित होतात .माणूस कामासक्त होतो .कामना पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचे पर्यावसान क्रोधात होते .मग षडरिपू च मागे लागतात .ज्याला कामाने जिंकले आहे त्याला राम कसा आठवणार ? कारण जेथे काम असतो तेथे राम नसतो .
Post a Comment