Friday, March 11, 2011

श्लोक ६३...

II श्रीराम समर्थ II

धरी काम धेनु पुढे ताक मागे |
हरि बोध सांडूनी विवाद लागे ||
करी सार चिंतामणि कॉच खंडे|
तया मागता देत आहे उदंडे ||६३||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated By Lochan Kate ( Gwalior ).............

[हिन्दी मे..]
हाथो.में कामधेनु फ़िर मठा है मांगता |
हरि बोध छोड तु विवाद क्यो है करता ||
करो सार चिंतन कॉच के समान रे |
उसे देता भरके है भरपुर भगवन रे ||
अर्थ ....
श्री रामदास जी कहते है कि हे मानव मन ! श्रीराम की भक्ति एक कामधेनु के समान है | उसे छोडकर मनुष्य इधर-उधर की बातों मे सुख पाने के लिये भटकता रहता है | और हरि का नाम छोडकर व्यर्थ की बातों में विवादों में व्यस्त रहता है |अत: हे मनुष्य ! तत्व चिंतन करना एक साफ़ सुथरे पारदर्शी कॉच के समान है | अत: साफ़ मन से चिंतन करना चाहिये क्योंकि ऐसे चिंतक को ही परमेश्वर भरपुर सुख देता रहता है |

suvarna lele said...

हा श्लोक सिध्दासाठी आहे .या श्लोकात समर्थ वाद विवाद करू नको असा उपदेश करतात .सिद्ध स्थिरबुद्धी असतो .तरीही वादविवाद करणे म्हणजे घरी कामधेनु असताना दुस-याकडे ताक मागण्यासाठी हातात भांडे घेउन जाण्यासारखे आहे .सिद्ध पुरुष आत्मज्ञाना चा अनुभव घेणारा असतो .त्याचे सगळे संशय फिटलेले असतात .तो स्वरूपी होउन राहणारा असतो ..त्याला आत्मबोध झालेला असतो .तो आत्मसुख अनुभवत असतो .त्याची आनंदमय अवस्थेत राहण्याची आवड असते .तो ती अवस्था टिकवण्याचा प्रयत्न करत असतो ..मग समर्थ म्हणतात की अशी आनंदमय स्थिती टिकवून धरणे म्हणजे आनंदमय स्वरूप स्थिती टिकवून धरणे .मग असे असताना शोक उत्पन्न करणारा वाद का घालायचा ?
सिध्दावस्थेत वाद घालणे म्हणजे चिंतामणी ,जो सर्व चिंतांचे हरण करणारी चिंतामणी हातात असताना काचेचे तुकडे मागण्या सारखे आहेत . समर्थ म्हणतात की साधका .सिध्दा ,तू ज्ञान मार्ग सोडू नकोस ,साधना पासून दूर जाउ नकोस ,म्हणून वाद करू नकोस .