Friday, November 12, 2010

श्लोक ४६

II श्रीराम समर्थ II

मना जे घडी राघवे वीण गेली|
जनी आपुली ते तुवां हानि केली||
रघुनायका वीण तो शीण आहे|
जनी दक्ष तो लक्ष लावुनी पाहे||श्रीराम||४६||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar )....
अरे मन जो क्षण रम बिन बीता|
समझ तुने अपनी हानि कर लेता||
रघु राम के बिन वो है थका जो|
तभी राम मे मन रमाते तुम जाओ||श्रीराम||४६||
अर्थ... श्री रामदासजी कहते है कि हे मनुष्य मन ! जो क्षण श्रीराम की भक्ति के बिना जाये वो व्यर्थ है| वह क्षण तुमने अपना व्यर्थ गंवा दिया समझो | जो व्यक्ति इस संसार मे दक्षता पूर्वक ध्यान देकर चलता है उसका जीवन श्रीराम की भक्ति किये बिना अर्थात् श्रीराम का नाम लिये बिना व्यर्थ है, सिर्फ़ एक थकान है | इसलिये हे मानव ! दक्षता पूर्वक अपने को राम के नाम से जोडता जा और समय का सदुपयोग करता जा|.............

Ravindra G.Phadke. said...

Comment on Shloka 46
In this shloka Sri.Samartha is bringing to our attention, a very important issue.
We do not know whem the death will take us away. And therefore it is very clear that a person who is "Sadeva" will not waste even a single moment in his life. SrI. Samartha says in Dasabodha as follows.
Aika Sadevapanache Lakshana|
Rikama jau nedi yek kshana"||

As we have seen earler our welfare lies in the living for Sri.Rama. What we do is to be done as a puja for him. We are supposed to work here in this world. Not a moment should be wasted. And further we also should continuously remember HIM,
Any work done, every moment spent without rememberiing Him is our loss only.
Therfore one who is watchful , is always "Sadeva". He remembers lord SriRama at every moment.

This is the way we should live in this worldin order to reach our goal of Self realization.

suvarna lele said...

जे क्षण श्रीरामांच्या चिंतना वाचून ,अनुसंधाना वाचून गेले ते क्षण फुकट गेले असे समर्थ या श्लोकात सांगतात .आपण म्हणतो रामभजना वाचून गेलेला काळ मी प्रापंचिक कर्तव्यात घालवला ,मग तो वेळ फुकट कसा जाईल ? आपण प्रापंचिक कर्तव्य पार पाडतो त्यावेळेस मिळणारे सुख क्षणिक असते .कायम टिकणारे नसते .पण संत सज्जन म्हणतात ,की प्रापंचिक सुख मिळवताना आपण हानी करून घेतो ,कारण आपल्याकडे विवेक नसतो .या नश्वर जीवनात माणूस बराच काळ झोपेत ,मौज मजा करण्यात घालवतो .पोटासाठी कष्ट करण्यात घालवतो .मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय परब्रह्माची प्राप्ती जी केवळ नरदेहातच होउ शकते ,ते ध्येय त्याच्या लक्षात ही नसते .मिळालेले आयुष्य तो वाया घालवतो ,जे रामनाम घ्यायला हवे ते तो घेत नाही .त्या उलट संत साधू सज्जन अपूर्व अशा नरदेहाची किंमत जाणतात .परमेश्वर चिंतनात ,अनुसंधानात घालवतो,आत्म स्वरूपाची प्राप्ती करवून घेतो .साधकांच्या जीवनात राघुनायाकाच्या चिंतनात तो आपले जीवन सार्थक करतो .कारण त्यांना माहित असते की रघुनायकाच्या चिंतना शिवाय सारे जीवन व्यर्थ आहे सारे काही शीण आहे .प्रपंचाचा गाडा ओढताना अनेक संकटे ,आपत्ती यांना आपल्याला तोंड द्यावे लागते .त्रिविध तापांनी माणूस पोळला जातो .क्षणिक वाटणारे सुख दुखा:त कधी परिवर्तीत होते ते आपल्याला कळत सुध्दा नाही .पण त्याच वेळेस रघुनायाकाचे चिंतन केले ,स्मरण केले तर लक्षात येते की कर्ता करविता राम आहे .तोच सुख देणारा आणि दुख देणारा आहे .त्यामुळे देह अहंता जाते .मीपणाची भावना नाहीशी होते .सुखदुखाच्यापार माणूस जातो .म्हणून समर्थ म्हणतात दक्ष हो ,आणि अलक्ष असणारे परब्रह्मा प्राप्त करून घे .

Gandhali said...

श्लोक ४६
हे मना ! रामचिंतनापासून जी घटका ,जो काळ गेला तो तू व्यर्थ दवडून आपलाच घात केलास असे समज.रामाला सोडून केलेले कार्य तुझे कितीही आवडते,विषयसुखाचे ,इंद्रियसुखाचे मनाला आनंद देणारे वाटले तरी त्याचा अंत शेवटी दु:खच असते .ज्यातून अखंड समाधानाची प्राप्ती होणार नाही अशी कामे करून तू उगाच जीवाला शिणवतोस व वेळ ही वाया घालवतोस.या नरदेहाचे ध्येय ते अखंड समाधान मिळवणे हेच आहे म्हणून या मायासंसारात राहताना दक्ष ,सावध रहा.येथे फक्त व्यवहारातला सावधपणा सांगितला नाही.ज्याचा विवेक जागृत आहे तो व्यवहारात जागृत असतोच पण दक्ष म्हणजे या संसारातल्या क्षणिक सुखदु:खाच्या मायापाशात तू अडकू नकोस.देह आहे त्यामुळे येणारी कर्तव्य कर्मे करणे आलेच पण त्यात मनाने गुंतू नकोस .हे मना, तू या सुखांच्या जाळ्यात पटकन गुरफटून जातोस म्हणून सतत सावध रहा.आणि असे दक्ष असणाऱ्याचे अखंड अनुसंधान रामचरणाकडेच असते.
" अलक्ष्यास लावी लक्ष्य I म्हणोनी साधू परम दक्ष I
वोढू जाणती कैपक्ष I परमार्थाचा II (दा.८.९.५२)
या मनाला सदैव शुद्ध परमार्थाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे याचे भान असते.
"स्वरूपी सावधपण I तेची ज्ञानाचे लक्षण II (पंचसमासी)