Friday, September 24, 2010

श्लोक ३९

II श्रीराम समर्थ II

जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे |
जयाचेनी योगें समाधान बाणे ||
तयालागी हे सर्व चांचल्य दीजे |
मना सज्जना राघवे वस्ति कीजे || ३९ ||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !


जय जय रघुवीर समर्थ !

6 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate (Gwaliar )......

वदे शास्त्र पुराण जिसे है वर्णता|
जिसके दर्शन से समाधान मिलता||
उसके लिये ये चंचलता दी जो|
हे मन ! सज्जन राघव मन बस जो||
अर्थ.... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव ! जिसका वेद शास्त्र पुराणो मे भी वर्णन है जो योग कर्मादि मे, समाधि मे लीन हो उसके इस कार्य से समाधान प्राप्त होता है, उसे यह सारी चंचलता दे दो | हे मनुष्य ! ऐसे सज्जन पुरुष बनकर श्रीराम स्वरुप मे लीन होकर रहना चाहिये|........

suvarna lele said...

वेद ,शास्त्रे ,पुराणे या सर्वांनी राघवाचे स्वरूप वर्णन केले आहे।जो एकाग्र चित्ताने राघवाचे नित्य चिंतन करतो त्याला समाधी सुख लाभते ।समाधी म्हणजे काय असा विचार केला तर असे लक्षात् येते की मन जेव्हा संदेह रहित होते ,व आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावते तेव्हा समाधी चा लाभ होतो ।सामर्थ् दासबोधात म्हणतात :दृढ करूनिया बुध्दी । आधी घ्यावी आप शुध्दी । तेणे लागे समाधी । अकस्मात ।।६ -१०-१२ । । जेव्हा बुध्दीचा दृढ निश्चय होतो ,व मी कोण ह्याचा शोध आपण घेतो तेव्हा आपण माया निर्मित आहोत असे समजते ।देह बुध्दीतला मी बाजूला सारला की शुध्द आत्म्स्वरूप उरते व तेच समाधानाचे स्थान असते ।तीच समाधी ची अवस्था !ही अवस्था येण्यासाठी सतत राघवाच्या ठिकाणी वस्ती करायला हवी ।त्यासाठी सामर्थ् सांगतात की तुज़्या मनात जे चाञ्चल्य आहे ते ,कायिक मानसिक ,वाचिक सर्व राघवाला अर्पण कर ।कायेने ,म्हणजे वाणीने सतत राघवाचे नाम घे ,मनाने राघवाचे चिंतन कर ,कायेने सतत राघवाचिच सेवा कर ।सतत राघवच तुज़्यापुढे असू दे ।तर च तू समाधी अवस्था प्राप्त करून घेशील ।

Dr.Madhavi Mahajan said...

II श्रीराम समर्थ II
ऋगवेदादि चारी वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे ज्याचा वर्णनाने भारावलेली आहेत त्या भगवंताच्या ठिकाणी मनाला एकरुप होण्यास समर्थ सांगतात... हे एकच ठिकाण असे की ज्याठिकाणी विसावले असता मनाला समाधान प्राप्त होते...ज्याच्या सहवासामध्ये शांतीचा अनुभव येतो त्याभगवद स्वरुपाला तुझे चंचलपण अर्पण कर...ज्या वासनांमध्ये मन सतत रमलेले असते, सतत ज्याचा उपभोग घेउन देखील मन सतत अतृप्त असते...मनाची चंचलवृत्ती अनेक विषयामध्ये आसक्त करत असते... यातुनच मग अनेक विकारांमध्ये मन आनंद शोधत रहाते...पण ते अशा ठिकाणी आनंद शोधते ज्याठिकाणी समाधान प्राप्त होत नाही ...मग सर्व काही प्राप्त होऊन देखील मन सतत असमाधनीच रहाते...त्या चंचल मनाला समर्थ भगवद चिंतनात रमावयास सांगतात...अस्थिर झालेली तुझी वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न कर....असा प्रयत्न केला तर इतत्र धावणारे मन आपोआपच शांत होईल..वृत्ती शांत होण्यासाठी अखंड राघव स्वरुपी राहा...

!! जय जय रघुवीर समर्थ !!

Suhas said...

जगातील यच्चयावत सर्व भाषातील आणि देशातील सहित्यात वेदांचे स्थान अत्युच्च आहे .. वेद अपौरुषेय असून प्राचीन आहेत. आधुनिक भौतिकी आणि खगोलशास्त्रांनी सिद्ध केलेले सारे सिद्धांत वेदात प्रमाणित केलेले आहेत.. अगदी "बिग-बेंग थिअरी" सुद्धा!
समर्थ सांगताहेत अश्या वेदांनी ज्याचे वर्णन केले आहे, वेदांनी स्पष्ट ग्वाही दिली आहे की... त्याचाकडे तुझे चांचल्य दे .. तुझा अस्थिरपणा त्याला दे .. तेथेच खरे समाधान आहे ! त्याचा भरवसा धर.
स्वभाविक पणे समर्थांना इथे दाशरथी राम अपेक्षीत नसून " आत्माराम अपेक्षीत असावा.. त्या आत्मारामाच्या ठिकाणी मन स्थिर कर ..

जय जय रघुवीर समर्थ !

suvarna lele said...

श्रीराम प्रभूंचे वर्णन असंख्य गुणांनी भरलेल्या दिव्य गुणांनी युक्त आहे .तरीही श्रीरामचंद्र माणूस आहेत ही वाल्मिकींची रामायण लिहिताना भावनां आहे .दाशरथी राम गुणवान आहेत ,पराक्रमी आहेत ,मर्यादाशील आहेत ,धर्मज्ञ ,कृतज्ञ आहेत ,प्रचंड पौरुष असणारे आहेत .पण त्यांनी धर्माचा ,सद्गुणाचा ,त्याग केला नाही .ते सत्यवाक्य होते ,म्हणजे खरे बोलणारे होते .आत्मविश्वास असणारे होते ,क्रोध न येणारे होते ,अत्यंत शक्तीशाली ,पण जितक्रोध होते .बुध्दिमान ,चतुर सुंदर आहेत ,देह मन बुद्धीवर संयम आहे .
समर्थांचा राम आपण सगुण व निर्गुण या दोन्ही प्रकारात कळवून घ्यावा लागतो .सगुण आणि निर्गुण या दोन्हीची श्री समर्थांनी दासबोधात १६-९-१३ या ओवीत केले आहे .चंचल पणे विकारले |
सगुण ऐसे बोलिले | येर ते निर्गुण उरले |गुणातीत | | १६-९-१३ | |
परब्रह्म स्वरूपाला अहं ब्रह्मास्मी असे स्फुरण झाले ,निर्गुणी मायेने चंचलता येते तेव्हा त्याला सगुणत्व येते .ते चंचल म्हणजेच माया ,तोच अंतरात्मा ,आत्माराम ,किंवा समर्थांचा राम ,तोच अवतारी देव ! तोच जीवात्मा ,तोच आत्माराम आणि तोच दाशरथी राम !
हाच आत्माराम ह्या सृष्टीतील ,विश्वातील सर्व घटना घडवून आणतो ,तो या सृष्टीतील प्रत्येक सजीवात ,निर्जीवात आहे .ह्या आत्मारामाचा अंश प्रत्येक प्राणीमात्रात आहे .तोच त्या प्राणिमात्राला सर्व गोष्टी करण्याची ताकद देतो,त्याच्या कडून करवून घेतो .या अखंड चैतन्याला भक्त भगवंत म्हणतात आणि ज्ञानी ब्रह्म म्हणतात .सर्व सजीवांच्या देहात तो असतो पण आपल्याला तो भेटत नाही .कारण तो आपल्याला अगम्य असतो ,आपल्यातल्या मी पणाने ! श्री समर्थांनी राम ,राघव ,रघूनायक अशी सगुण रूपाची नावे दिली आहेत .आत्माराम कळण्यासाठी शरीर धारी भक्ताला शरीरधारी आत्मारामाचे पूजन करावे लागते .सगुण रूपाचे भजन करताना भक्ताचे भान हारपले .श्रीरामांशी अनन्य होता येते .म्हणजेच आत्मारामाशी अनन्य होता येते .

Gandhali said...

श्लोक ३९
अरे मना ! माझ्या विनंतीचा अनादर न करता राम स्वरुपात रममाण होऊन रहा ते कसे व त्या मुळे काय प्राप्त होते हे या श्लोकात सांगितले आहे .रामचंद्र हा देवांच्या मुक्ततेसाठी घेतलेला परमेश्वराचाच अवतार आहे आणि त्या परमेश्वराच्या गुणवर्णनाने ऋगवेदातील चारही वेद ,व्याकरणादी सहाशास्त्रे ,अठरापुराणे, उपपुराणे सर्व भारावलेली आहेत.या रामचंद्र रुपी परमेश्वराशी योग साधला असता समाधान मिळते, समाधान टिकून राहते.आपण समाधानरूप होऊन राहतो.समाधान ही अंत:करणात अनुभवला येणारी एक विलक्षण अवस्था आहे.योगाचे फळ म्हणून सांगितलेली समाधी आणि समाधान हे दोन्ही शब्द मुळात एकाच अर्थाचे.मन संदेह रहित होऊन जेंव्हा आत्मास्वरुपाशी तादात्म्य पावते, स्थिरता ,तृप्तता अनुभवते म्हणजे समाधी.
'जेथे शमली मनाची आधी I ते जाणावी परमसमाधी II "
म्हणून हे मना तू राघवाच्या ठिकाणी स्थिर राहा असे समर्थ वरवर सांगतात , यात अडचण कोणती येते तर मनाचा चंचलपणा .आत्ता हे तर नंतर ते असे मनात सतत चालू असते म्हणून सर्व संत सांगतात ते साधन.अन सर्वात सोपे साधन 'जप' .मनातल्या कल्पना माकडासारख्या इकडून तिकडे उड्या मारत असतात.त्यांना नित्यनेमाने वळण लावावे लागते.ही चंचलता येते ती काम,क्रोधादी विकारांमुळे.हे विकारच परमेश्वरार्पण करून टाकावे.
देह आहे तो त्याची कर्मे करीत रहावेच लागेल पण मनानी त्या कर्मांमध्ये अडकू नकोस .
आपला भाव आणि आपण करतो ती कर्मे रामाला अर्पण केली तर आपोआप मनाची चंचलता नष्ट होऊन काया वाचा माने रामच राम म्हणजेच "राघवी वस्ती " ही स्थिती येईल .हे एकदम होणार नाही पण दृढ विश्वास ठेऊन सतत नाम घेत राहा ....