II श्रीराम समर्थ II
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे|
बले भक्त रिपुशिरी काम्बि वाजे||
पुरी वाईली सर्व जेणे विमानी|
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी||२९||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, July 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
As stated by Lochan Kate ( Gwaliar)
श्लोक २९...................
भक्तों की रक्षा प्रभु की प्रतिज्ञा|
शत्रु का संहार है काम करना||
अवध वासियों को मुक्ति दिलाई|
उपेक्षा न करते किसी की रामजी||२९||
अर्थ==श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन ! श्रीराम चन्द्रजी ने जैसे ही अयोध्यापुरी में कदम रखे, धनुष्य की टंकार गुंजायमान हो उठी और सम्पूर्ण अयोध्यापुरी के लोग वहॉ पहूंच गये जहॉ पुष्पक विमान से श्रीराम चन्द्रजी उतरे थे| ऐसे श्रीराम चन्द्र जी अपने भक्तों पर सदैव अभिमान ही करते हैं, उनकी उपेक्षा कदापि नही करते| अत: सदैव श्रीराम की भक्ति मे लीन रहना चाहिये|.
श्लोक २९
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे .... ब्रीद म्हणजे काय बाणा,वसा,प्रतिज्ञा .. श्रीरामांची प्रतिज्ञा कशाची होती तर भक्त उद्धाराची , भक्त संरक्षणाची . हे रक्षण दोन प्रकारे एक जो कोणी भक्तांचा ,सज्जनांचा छळ करेल त्या दुर्जनांचा नाश करणे
" करी दुर्जनांचा संव्हार I भक्तजनासी आधार I
ऐसा हा तो चमत्कार I रोकडा चाले II "
आणि दुसरे कामक्रोधादी राक्षसांचे पारिपत्य करून भक्तांना आत्मज्ञान देऊन त्यांना संसारबंधनातून मुक्त करणे .
" ब्रीदावळी पदी वसे I विशेष दुसरा नसे I
विबुध बंध तोडिले I अनंत जीव सोडिले II "
हा दीनांचा कैवारी,अभिमानी श्रीराम भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही हे अपवादरहित सत्य आहे आणि मनाला एकादी गोष्ट समजून सांगायची म्हणजे उदाहरण दिले तर समजणे सोपे जाते.उदाहरणामुळे लक्षात राहते म्हणूनच भक्तीची सत्यता पटण्यासाठी ,श्रद्धा वाढविण्यासाठी,संशय नष्ट होण्यासाठी समर्थांनी रामायणाचे उदाहरण दिले आहे.रामायणात बालवयातच श्रीरामाने धनुष्याचा टणत्कार करून दुष्टांचा संहार करून जणांचे रक्षण केले आहे .लोक भयमुक्त केले आहेत.
आपल्या आईला प्रभू रामाचे वर्णन सांगताना समर्थ म्हणतात,
" रक्षी भक्त बिभीषण I मारी रावण कुंभकर्ण I
तोडी अमरांचे बंधन I ते ची भूत गे माये II "
स्वतःच्या सामर्थ्यातून प्रेममय, आनंदमय अशा अयोध्यानगरीतील सर्व जनतेचा त्यांनी उद्धार केला आहे.तेंव्हा अरे मना ! तुझ्या एकट्याची ते कसे उपेक्षा करतील ? हे सांगून समर्थ प्रभूरामावरचा , भक्तीवरचा आपला विश्वास दृढ करतात.
"लागो नेदी कष्ट आपुल्या दासासी I रामीरामदासी साहाकारी II"
श्रीरामांच्या पायात तोडर आहेत त्यांचा रुमझुम असा सुंदर ,मधुर आवाज येतो .तो आवाज सांगतो की हे मना ,तू माझा भक्त आहेस ना ?घाबरू नकोस .मी तुझ्या पाठीशी आहे .
हा आवाज म्हणजे श्रीरामांचे ब्रीद आहे .ब्रीद दोन प्रकाराचे आहे .एक आहे भक्तरक्षणाचे -दुष्टांचे पासून भक्तांचे रक्षण करणे .दुसरे हा भवसागर भक्तांना पार करून देणे .संसार सागरातील सर्व आशा ,मोह ,ममता यांच्या बेड्या तोडून टाकणे ,संसार बंधनातून भक्ताची सुटका करून ,मोक्ष प्राप्ती करून देणे .
अशा दोन्ही प्रकारे भक्त रक्षणाचे ब्रीद असलेल्या श्रीरामांच्या खांद्यावर असणारे धनुष्य असे आहे की त्याचा टणत्कार ऐकून त्यांचे शत्रू थरथर कापत .श्रीरामांना शरण गेलेल्या प्रत्येक भक्ताचे रक्षण श्रीरामांनी केले .भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपुने दिलेल्या त्रासातून सहीसलामत सुटका केली .त्याच्या साठी नृसिंह अवतार धारण केला .ध्रुवाला अढळपद दिले .
असे एकवचनी ,एकबाणी ,गुणवान ,शीलवान असणारे ,बलाढ्य असणा-या श्रीरामांनी रामराज्य केले .त्यांनी अयोध्यानागारी आनंदमय ,प्रेममय केली .एव्हडेच नाही तर सर्व अयोध्या नगरीचा उध्दार केला .म्हणून समर्थ म्हणतात :पुरी वाहिली सर्व जेणे विमानी !
श्लोक २९
भक्तांचे रक्षण करेन अशी राघवाची घोषणा आहे व् त्यासाठी त्याने हातामध्ये शास्त्र धारण केले आहे.भक्ताला त्रास देणारा हा रामाचा शत्रुच,त्यामुले अशा शत्रुबद्दल रामाला फार राग आहे. " नाथालाचे माथी हाणु काठी" असे तुकोबा म्हणतात.
माझ्यामते चरण तीन चा अर्थ थोडा वेगला लावावा लागेल मनोबोधावर पुस्तके लिहिलेल्यानी या चरणाचा अर्थ संपूर्ण अयोध्यानगरीतील लोक पुष्पकविमानाने मोक्षपदाला नेले असा लिहिला आहे.पुष्पक विमान तेंव्हा होते पण अयोध्यानगरीतील लोकाना घेउन जाईल एवढे विमान असणे शक्य नाही.आज सुद्धा जम्बो विमानाची क्षमता ५००प्रवाश्याना घेउन जाऊ शकेल एवढीच आहे.
मला स्वतः ला असे वाटते की प्रभुरामचंद्रानी सर्व नागरिकाना मोक्षाचा मार्ग दाखविला पण वाल्मीकी रामायणातही असा उल्लेख आढलत नाही.सर्व नागरिकाना मोक्षपादी नेले हे थोड़े अतिरंजीत वाटते फक्त या वरुन असे म्हणता येइल की या चरणातुन रामाचा मोठेपणा glorify केला असावा या वरून जाणवेल ती समर्थांची रामावरील भक्ति, प्रेम, आदर.
Post a Comment