Friday, July 30, 2010

श्लोक ३१

II श्रीराम समर्थ II

महासंकटी सोडिले देंव जेणे|
प्रतापे बले आगले सर्वगुणे ||
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी |
नुपेक्षी कदा रामदासभिमानी || ३१|| 

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar ).....श्लोक [३१] जिसने बचाये असुर से अनिष्ट|
प्रताप गुण उसका है जग में श्रेष्ट||
जिसको स्मरे पारवती शूल पाणी|
उपेक्षा ना करे राम दासाभिमानी||३१||

अर्थ... श्रीराम दासजी कहते है कि हे मनुष्य मन ! महा संकट के समय सर्वगुण सम्पन्न तथा अपने श्रेष्ट प्रताप बल के द्वारा श्रीरामचन्द्र जी ने देवलोक को मुक्त कराया था जिन्हे देवी पार्वती तथा श्रीशंकरजी भी नमन् करते है | उसकी उपेक्षा कदापि नही करते |इसलिये हे मानव ! अपने मन को उस राम के चरणों में सम्र्पित कर्ने का प्रयास करो|.

suvarna lele said...

विधी विधीस धाकतो | सुरेंद्र बाग राखतो |
करावयासी निग्रहो | भूमंडलासी विग्रहो |
अखंड चाकरी करी | सदा वरूची भादरी |
सटी आरंधाली दली | गणेश गाढवे वळी |
बहू कठीण काळ हो ||
रावणाने देवांना असे कामाला लावले पण श्रीरामांनी देवांना आपल्या प्रतापाने , बलाने ,सोडवले .असा आगळ्या वेगळ्या गुणांचा श्रीराम आहे .
श्रीरामांचे अनेक गुण सांगता येतील .त्यांची कर्तव्य निष्ठा कठोर होती .कैकयीला राजा दशरथाने दिलेल्या वचना प्रमाणे पितृ आज्ञा शिरसावंद्य मानून १४ वर्षे वनवास भोगण्यासाठी आनंदाने तयार झाले .बंधुप्रेम ,एकपत्नीव्रत ,एकबाणी ,एकवचनी ,श्रीरामांचे चरित्र ,आजच्याही तरुण पिढीला आदर्श ठरणारे आहे .ते पुत्र ,बंधू ,स्नेही ,राजा ,पती या सर्वच दृष्टीने ते पुरुषोत्तम आहेत .म्हणूनच वैराग्याचा सम्राट असणारे तपस्वी शंकर वा त्यांची पत्नी हिमालयाची कन्या पार्वती हे दोघेही श्रीरामांचे स्मरण करतात .

Gandhali said...

श्लोक ३१
हे मन ! ज्या रामाने थोर संकटातून देवांना बंधमुक्त केले असा हा श्रीराम प्रताप,बळ सर्व गुणात सर्वांहून अत्यंत श्रेष्ठ आहे.पर्वतकन्या पार्वती व तिचा पती श्रीशंकर ज्या रामचे ध्यान निरंतर करीत असतात, असा हा प्रभुश्रीराम दासांची उपेक्षा करीत नाही.
जेंव्हा जेंव्हा देवांवर संकटे आली तेंव्हा अवतार धारण करून प्रभुने देवांचे रक्षण केले.रामावतारामध्ये रावणाने बंदी केलेल्या सर्व देवांची सुटका केली .रावणाने लंकेमध्ये देवांना बंदिवासात टाकले होते अन तिथे त्यांचे दिवस कसे कष्टात जात होते त्याचे वर्णन समर्थांनी केले आहे.
" समीर लोटितो खडे I वरुण घालितो सडे I
मयंक साऊली धरी I मलीन पावकु हरी II
विधी विधीस धाकतो I सुरेंद्र बाग राखतो I
सटी आरंधळी दळी I गणेश गाढवे वळी II
बहु कठीण काळ हो I समस्त पावले मोहो I
हिनादिनाचीया परी I सदा गळीत अंतरी II
अशी हीन स्थिती होऊन खाली मान घालून अश्रू ढाळीत देव बसले होते.असे लाजिरवाणे आणि दुखमय जीवन जगणाऱ्या देवांची मुक्तता करण्यासाठीच प्रभूश्रीरामांचा अवतार झाला.
" निमित्त मात्र ते सीता I विबुधपक्ष पुरता I "
ज्या भगवंताने देवांची सुटका केली तो आपल्या भक्तांची कशी उपेक्षा करेल ?
" देवराणा सर्व देवां सोडविता I लागील चिंता त्यासी तुझी II "
आगळा सर्व गुणे म्हणजे काय तर महापराक्रमी,प्रतापी,अत्यंत शौर्यशाली एवढेच श्रीरामाचे वर्णन नाही तर सद्गुणी ,बुद्धिमान,नीतिमान,धर्मज्ञ,कृतज्ञ,सत्यवादी, दृढवत,चारित्र्यसंपन्न , भूतदया असणारा,विद्वान,समर्थ ,संयमी ,उत्तम वक्ता, क्षमाशील, प्रजावत्सल ,तेजस्वी , दर्शन कोणालाही प्रिय होइल असा हा सर्व गुणांचा स्वामी. पुत्र, बंधू ,स्नेही,पती,राजा सर्वच नात्यांनी श्रीराम हे पुरषोत्तम होते.सर्वच उत्तम गुण श्रीरामांचे ठिकाणी एकवटलेले आहेत.असे गुण एकाच व्यक्ती मध्ये दिसणे दुर्मिळच म्हणून ' आगळा सर्व गुणे '
" बहुरूपी बहुगुणी बहुता काळांचा I हरिहर ब्रम्हादिक देव सकळांचा II "
समर्थ वारंवार ग्वाही देत आहे देवांना सोडविणारा माझा राम सामर्थ्यशाली आहेच तर तो देवांचाही देव आहे.पूर्ण वैराग्यशाली,तपस्वी भगवान शंकर आणि पार्वतीदेवी म्हणजे साक्षात ' शिव आणि शक्ती ' या परमात्मा रामाचे सतत ध्यान करीत असतात.
हे मना , असा हा प्रभू श्रीराम माझा स्वामी आहे आणि तो माझी कधीच उपेक्षा करणार नाही हा विश्वास तू दृढ धर !
II जय जय रघुवीर समर्थ II