II श्रीराम समर्थ II
समर्थाचिया सेवक वक्र पाहे|
असा सर्व भूमंडली कोण आहे |
जयाचि लीला वर्णिती लोक तिन्ही |
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी || ३० ||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, July 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्वभूमंडली कोण आहे ? या चरणातच इतका जोश आहे की आपली खात्रीच पटते की समर्थ म्हणजे श्रीराम आपल्या कडे कोणाला वाकड्या नजरेने पाहूच देणार नाहीत ..समर्थ रामदास स्वामी श्रीरामांना समर्थ म्हणतात .समर्थ याचा अर्थ जो उत्तम गुणांनी संपन्न आहे ,पराक्रमी आहे ,बलाढ्य आहे ,दीनांचे ,दुबल्यांचे ,भक्तांचे रक्षन करणारा आहे .प्रभू श्रीरामांचे चरित्र असेच संपन्न ,आदर्श ,आचरणात आणण्यासारखे ,दुष्टांचा संहार ,दिनांचा उध्दार करणारे आहे .अशा समर्थांच्या सेवकाकडे म्हणजे प्रभू रामांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहणारा या जगात कोण आहे ?
श्रीरामांचे चरित्र ज्यात आहे ते शतकोटी रामायण श्री शंकरांनी तीनही लोकात म्हणजे देव ,दानव आणि मानवात वाटून दिले .त्यामुळे देव ,दानव आणि मानव तिघेही श्रीरामांचे गुणगायन करतात .ते श्रीराम आपल्या दासाची उपेक्षा करत नाहीत .श्रीरामांचा दास कसा असतो ते श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात.
भव्य रूप अति सुंदर दीक्षा |रामनाम स्मरणे करी भिक्षा |वृती होईल उदासीन जेव्हा |रामदास म्हणे तेव्हा ||
As stated by Lochan Kate ( Gwaliar ) ...
श्लोक ३०....
समर्थ सेवक भक्त को टेढा जो देखे|
ऐसा सारे भू मंडल पर कौन है रे||
जिसकी लिलायें तिन्हों लोक में फ़ैले|
उसकी[भक्त की] उपेक्षा ना करते राम है रे||
अर्थ== श्रीराम दास जी कहते है कि हे मानव ! श्रीराम चन्द्रजी प्रत्येक कार्य के लिये समर्थ है| ऐसे श्रीराम के भक्त की ओर कोई तिरछी द्रुष्टि डाले, ऐसा संभव ही नही है,अर्थात् ऐसा आज तक कोई पैदा नही हुआ जो राम भक्त का बूरा कर सके| ऐसे श्रीराम जिनके कार्य कलापों का वर्णन तीनो लोकों में होता है एवं सब ओर जो वंदनीय है ऐसे धनुर्धारी राम,अपने भक्त का सदैव अभिमान ही करते है| उसकी उपेक्षा कदापि नही करते| अत: सदैव उनकी शरण में रहना चाहिये|.
श्लोक ३०
समर्थांच्या सेवकाकडे,शिष्याकडे वाकडा डोळा करून पाहण्याची कोणाला हिम्मत आहे? असा खड़ा सवाल समर्थ करतात.या मध्ये समर्थांचा आत्मविश्वास पूर्णाथाने दिसून येतो.साऱ्या भूमंडळी एवढेच नव्हे तर त्रिखंडात समर्थांच्या शिष्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याची कोणाची हिंमत नाही असा दिलासा ही समर्थ आपल्या शिष्याना देतात.
या संबंधाने एक गोष्ट आठवते.एक गावात एक अतिशय रागीट व समर्थांचा द्वेष करणारा माणूस रहात होता. त्याला वाचासिद्धी प्राप्त झाली होती.एकदा समर्थ फिरत फिरत त्या गावी आले.नेहमी प्रमाणे त्यांचे शिष्य गावात भिक्षा मागायला गेले.गोपाळ नामक शिष्य त्या गृहस्थांच्या घरासमोर उभा राहीला व त्याने वरील श्लोक खड्या सुरात म्हटला , झाले त्या गृहस्थाचा संताप एवढा वाढला की त्याने तावातावाने बाहेर येउन त्या शिष्याला म्हटले की आज रात्री तू मरणार.गावातल्या लोकानी गोपाळला सांगितले की आता तुझे काही खरे नाही तू आज रात्री मरणार हे नक्की.
गोपाळ बिचारा खुप घाबरला तसाच पळत समर्थांकडे गेला व त्याना सर्व हकीकत सांगितली, समर्थ काही बोलले नाहीत फक्त हसले. रात्री समर्थ एका घोंगडीवर झोपले व गोपाळला पाय चेपायला सांगितले.थोड्या वेळाने यमदूत आले पण ते थोड़े लांब उभे राहीले गोपाळला म्हणाले की तू घोंगडीवरुन बाहेर ये आम्ही तुला न्यायला आलो आहोत.गोपाळ कसला घोंगडी सोडतोय.शेवटी सकाळ झाली.यमदूत निघून गेले,समर्थ उठले व गोपाळला म्हणाले की तू आज परत त्याच गृहस्थाकडे जाउन भिक्षा माग.तो म्हणाला जातो पण तेवढी घोंगडी मला दया.तेथे जाउन त्याने परत तोच श्लोक म्हटला तसे ते गृहस्थ बाहेर आले आपले भविष्यवाणी खोटी ठरविणाऱ्या समर्थांचे शिष्यत्व पत्करले.
ज्यांची किर्ती त्रिखंडात गाजत आहे असे प्रभुरामचंद्रांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिम्मत आहे ? या श्लोकात हीच गम्मत आहे.समर्थ म्हणजे समर्थ रामदासस्वामी व समर्थ म्हणजे प्रभु रामचन्द्र ,यामुळे असे वाटते की समर्थ रामदास व प्रभु रामचन्द्र एकच आहेत असे तर रामदास स्वामीना सुचवायचे नसेल ना ?
धन्य ते शिष्य ज्याना समर्थांसारखा समर्थ गुरु मिळाला.
श्लोक ३०
" हे मना ! माझा हा राम परमसमर्थ आहे.रामाच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहिलं असा त्रिभुवनात कोण आहे ? रामाची लीला त्रैलोक्यातले देव,मानव,दानव गाऊन राहिले आहेत."
हा श्लोक म्हणजे एकदम खड्या स्वरात प्रभावीपणे , प्रचंड आत्मविश्वासाने भक्ताला दिलेले आश्वासन आहे.
" You are in Safe Hands " असा हा assuarance आहे.
त्रिभुवनात ज्याचा दरारा आहे अशा प्रभूरामाचे दास्यत्व स्वीकारणाऱ्या भक्तांना कोणाचीच भीती नाही कारण ज्याचे दास तो प्रभूश्रीराम जगाचा मालक आहे.
" आत्माराम सकळा पाळी I आवघे त्रैलोक्य सांभाळी I तया एकेविण धुळी होय सर्वत्रांची I "
हे मना प्रामाणिकपणे सर्व वासनांचा त्याग करून ,त्यांना ताब्यात ठेऊन , मी भक्त आहे असाही दंभ मनात येऊ न देता अनन्य भावे रामाची भक्ती कर मग या जगाच्या पाठीवर तुला कसलेच भय नाही
Post a Comment