Friday, July 9, 2010

श्लोक २८

II श्रीराम समर्थ II

दीनानाथ हा राम कोदंडधारी|
 पुढे देखतां काळ पोटी थरारी ||
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||२८||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

5 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar)...
श्लोक २८........
पद्य---- अनाथो के तुम हो धनुर्धारी राम|
देखे जो समीप तो, म्रुत्यु भी जाये कांप||
हे मन ! मान ले, यह वचन सत्य रे|
उपेक्षा न करे राम,किसी की कभी रे||
अर्थ-- श्रीरामचन्द्रजी कहते है कि हे मनुष्य ! धनुर्धारी रामचन्द्र जी दीन लोगों के अर्थात् गरीबों के नाथ है| उन्हे सामने पाकर काल भी थरथराने लगता है| यह बात अटल सत्य है| अत: ऐसे श्रीरामचन्द्रजी अपने दास पर सदैव अभिमान ही करते है, उसकी उपेक्षा नही करते| इसलिये श्रीराम की शरण में रहना ही जीवन को सार्थक करना है|.

suvarna lele said...

देव भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही असे समर्थांनी मागील श्लोकात सांगितले .या श्लोकात समर्थ श्रीरामांचे वर्णन करतात .श्रीराम कोदंडधारी धनुर्धारी आहेत .दीनांचे कैवारी आहेत . दीन दुबळ्यां चे रक्षण करण्यासाठी त्यांचे धनुष्य नेहमीच सज्ज असते .दीन याचा अर्थ गरीब ,भित्रा
नाही .तर ही पारमार्थिक दीनता आहे .म्हणजे सर्व कर्ता करविता ,रक्षण कर्ता तोच आहे अशी ज्याची भावना असते तो दीन !जो श्रीरामांशी अनन्य आहे ,ज्याने आपला अहंकार टाकून दिला आहे ,जो श्रीरामांच्या चरणी लीन झाला आहे ,तो दीन !दीन भक्तांच्या रक्षणा साठी श्रीराम धावून जातात .
त्याच्या समोर काळ जरी आला तरी त्याला भीती वाटते .कारण श्रीरामांचे शौर्य च इतके आहे की काळ म्हणजे यमराजही त्याला घाबरतात.म्हणून हे मना ,एक लक्षात घे ,एक गोष्ट सत्य मान ,की श्रीराम दीनांचे नाथ आहेत .ते आपल्या भक्ताला कधीच बाजूला सारत
नाहीत .कोणीही अंत:करणा पासून हाक मारली तर ते त्याच्या मदतीला जातात .

Prof. Limaye said...

श्लोक २८
दिनांचा म्हणजे संसारातील तापत्रयाग्नीने पोललेले यांचा नाथ म्हणजे राम हा धन्युष्य धारण केलेला म्हणजे सदा सज्ज, कारण काळ केंव्हा घाला घालेल काही सांगता येत नहीं पण असा काळ धन्युष्यधारी रामाला पाहून थरथर कापतो .या श्लोकापासून पुढील १० श्लोकांचा शेवटचा चरण नुपेक्षी कदा राम दासाभिमानी असे घेतले तर प्रभु रामचंद्र हे आपल्या दासाचे शरनागताचे अभिमानी आहेत असा अर्थ होइल व रामदासभिमानी असे वाचले तर रामदास प्रभु रामचन्द्रांबद्दल अभिमानी आहेत असे म्हणता येइल .मनोबोधातिल ११६ ते १२५ या श्लोकातील शेवटचे चरण नुपेक्षिकादा देव भक्ताभिमानी असा आहे .आपण लक्षक पूर्वक मनाचे श्लोक म्हणले नाहीत तर आपली उडी २८ व्य श्लोकावरून ११६ वर जाइल किंवा ११६ वरुन एकदम २८ व्या श्लोकावर येइल ,माझे ही असे बरेच वेळा झाले ,फक्त ३० वा श्लोक किंवा १२६ वा श्लोक आला की आपली चुक लक्षात येते .तुम्ही किती मनापासून मनाचे श्लोक म्हणता याची परिक्षाच समर्थ घेतात की काय ? असे वाटते.

Gandhali said...

श्लोक २८
मागील श्लोकापासून पुढे १० श्लोकांपर्यंत भक्तवत्सल रामाचे , त्याच्या सामर्थ्याचे वर्णन आहे.अनेकविध उपमांनी समर्थांनी राघवाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे आणि हा श्रीराम दासाचा ,भक्तांचा अभिमानी आहे आणि त्याची कधीच उपेक्षा करीत नाही.हा विश्वास दृढ व्हावा म्हणून १० श्लोकाच्या शेवटी 'नुपेक्षी कदा रामदासाभिमानी' हेच पुन्हा पुन्हा सांगितले आहे.यातून समर्थ भक्तांना,साधकांना,जणांना आधार देत आहेत.प्रत्येकाला आपल्याला कोणाचातरी आधार आहे त्या बळावर मोठे धैर्य वाटत असते.तो कुणी ही असो त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.सर्व आधाराचा मुख्य आधार शेवटी परमेश्वरच आहे हे सांगण्याचे कार्य सेव संत करतात.ईश्वरच आपला वाली तोच आपला नाथ तोच करता आणि करविता असा विश्वास,श्रद्धा,पूर्ण निष्ठा ठेवावी.
असा हा श्रीराम कसा आहे तर दीनानाथ म्हणजे दीनांचा स्वामी,कैवारी आहे.दीनदुबळ्यांचा तो नाथ आहे.समर्थ स्वतःच ही उल्लेख दीन म्हणून करतात.परमेश्वराच्या सामर्थ्यावर पूर्ण निष्ठा असणारे,आपला अहंकारभाव ज्याने परमेश्वराचे आधीन केला आहे, जो निर्व्याज प्रेमाने देवाला दयेचा पाझर फोडतो तो दीन भक्त.समर्थ येथे आपल्याला सुचवीत आहेत असा दीनभक्त बन म्हणजे अनन्यभक्त बन.त्यांचा स्वानुभव आहे.करुणाष्टकात रामाचे उपकार मानताना ते म्हणतात.
" दीनानाथ हे ब्रीद त्वां साच केले I म्हणे दास भक्तांसी रे उद्धरिले I "
अन या दीनांचा नाथ आहे कसा तर तो कोदंडधारी, म्हणजे धन्युष्य सज्ज करून भक्त रक्षणासाठी उभा आहे.नुसते हातात शस्त्र नाही तर श्रीरामांचे शस्त्रकौशल्य ही असामान्य आहे.त्यांचा धाक इतका विलक्षण आहे की त्यांना समोर पाहताच ज्याला त्रिभुवन घाबरते असा कळीकाळ ही भयाने थरथर कापतो.रामाचे सामर्थ्य अलौकिक आहे .सामर्थ्यशाली वत्सल हृदय राम भक्तांची कधीही उपेक्षा करणार नाही.आणि मना इथे कोठेही अतिशयोक्ती नाही.म्हणून हे वाक्य तुम्ही नेमस्त म्हणजे अपवाद रहित सत्य मानावे.
" देव सोयरा दीनांचा त्यांचा भारवाहे माथा I करी योगक्षेम चिंता II "

suvarna lele said...

श्रीराम दीनानाथ म्हणजे दीनांचे नाथ आहेत .दीन म्हणजे दुबळे ,गरीब ,लाचार नव्हेत तर दीन म्हणजे उत्तम भक्त ,जे परमेश्वराशी अनन्य आहेत ,परमेश्वर चरणी लीन आहेत ,मी काही करत नाही ,परमेश्वर माझ्याकडून करवून घेत आहे असे मानणारे !अनन्यता कशी असते तर भक्त मानतो की परमेश्वरच माझी माता ,माझा पिता ,माझा भाऊ ,माझी बहीण ,माझं सर्व काही तोच आहे .अशा दीन अनन्य भक्तांचे श्रीराम नाथ आहेत .ते कोदंडधारी आहेत .त्यांचा अक्षय असणारा बाणांचा भाता या भक्तांचे रक्षण करण्यास सज्ज आहे .त्यांच्या समोर काळ म्हणजे यम ,जो सर्व जीवांना घाबरवतो तो ही थरथर कापतो .अशा भक्ताची उपेक्षा ,त्यांच्या दासांचा अभिमानी असणारे श्रीराम कधीच करत नाहीत .हे वचन हे मना तू सत्य मान .नेमस्त म्हणजे अपवाद रहित सत्य मान .कारण :
देव भक्तांचा कैवारी |देव पतितांसी तारी |देव होय साहाकारी |अनाथांचा ||४-८-२६||
देव अनाथांचा कैपक्षी |नाना संकटांपासून रक्षी |धावानिला अंतरसाक्षी |गजेंद्राकारणे||