Friday, May 7, 2010

श्लोक १९

II श्रीराम समर्थ II

 मना सर्वथा सत्य सांडू नको रे |
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ||
मना सत्य ते सत्य वाचें वदावे |
मना मिथ्य ते मिथ्य सोडोनी द्यावे ||१९||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

suvarna lele said...

मागील श्लोकात समर्थांनी फक्त राघवाची आशा धरायला सांगितली कारण राघव फक्त सत्य आहे .समर्थांनी दासबोधात सत्याची व्याख्या केली आहे ती अशी :सत्य म्हणजे स्वरूप जाण| १०-१० -५५ | सत्य म्हणजे कायम टिकणारे !.सत्य म्हणजे ब्रह्म ! जे नाशिवंत नाही .ह्या दृश्य सृष्टी होण्याआधी ही ते होते ,आता ही आहे ,सृष्टी नंतरही ते असणार आहे .म्हणून ते सत्य आहे ,परब्रह्म आहे म्हणून समर्थ म्हणतात,हे मना , सत्य सोडू नकोस ,त्या राघवाला विसरू नकोस .तिस-या चरणात समर्थ सत्य वाचे वदावे असे म्हणतात .सत्य वाचा म्हणजे काय ते बघायला हवे . सत्य म्हणजे सद्धर्माला अनुसरून बोलणे आणि तसे आचरण करणे ! म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात .दुस-या चरणात समर्थ मिथ्य मांडू नको असे म्हणतात .मिथ्या म्हणजे जी वस्तू कायम टिकणारी नाही ,जिच्या पासून तयार झाली त्यातच लीन होणारी ! घटाचे उदाहरण देता येईल .घट मातीचा बनतो ,मातीचा असतो ,घट फुटल्यावर मातीच राहते .तशी माया मिथ्या असते .माया म्हणजे परब्रह्मात निर्माण झालेले स्फुरण ! तीच सर्व कार्य घडवून आणते .दृश्य विश्व निर्माण करते, सांभाळते ,नाहीसे करते .तीच अज्ञानाचे आवरण जीवावर घालते ,त्यामुळे दृश्य विश्व अज्ञान्याला खरे वाटते .पण शेवटी ती त्या परब्रह्मात लीन होते.म्हणून माया मिथ्या असे समर्थ म्हणतात .म्हणून हे नाशिवंत न धरता सत्य अशा परब्रह्माची आस सोडू नये व मिथ्या अशा मायेची साथ सोडून द्यावी असा उपदेश समर्थ मनाला करतात .

AJIT said...

सत्य आणि असत्य हे जीवन प्रवासातील दोन रस्ते आहेत . ज्या मार्गाने आपण प्रवास करू त्या प्रमाणे आपणास फल मिळणार आहे. उद्देश समोर आसेल तर त्या प्रमाणे प्रवास होतो . काही रस्ते हे प्रारंभी खडतर वाटत पण तेच आपणास आपल्या उद्देशा पर्यंत घेउन जातात. काही मार्ग सुरवातीस सुलभ , बिनात्रासाचे वाटतात पण त्या पासून इछित साध्य सधता येत नाहि. म्हणुनच श्री समर्थानी आपणास एक उपदेश केला आहे की सत्याचा मार्ग स्वीकार करा . जेणे करून जीवनाचे स्वर्वोत्तम लक्ष प्राप्त होइल . सत्याचा मार्ग स्वीकारने व त्यावर सर्व काल टिकून रहाने सोप्पे काम नाहि. त्या साठी प्रचंड मानसिक सामर्थ्य गरजेचे आहे. जे साधानेतुन मिलते.सत्याचा त्याग करणे म्हणजे असत्याचा स्वीकार करणे होय. या साठी समर्थ सांगतात की तू सत्याचा त्याग करून असत्याचा स्वीकार करू नकोस व सत्याला सत्य आहे हे म्हणायला घाबरू नकोश
क्रमश ...................

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar).. श्रीरामदासजी कहते है कि हे मनुष्य ! अपने मन को समझाओ कि राह ही जीवन का सार है तथा झूठ का साथ कभी नही देना चाहिए क्योकि झूठ की राह पर चलने पर उससे बचने के लिए हर कदम पर झूठ का सहारा लेना पडता है| सदैव ही बोलते समय सत्यवाणी ही बोलना चाहिए और झूठ से सदैव दूर रहना चाहिए|

lochan kate said...

[हिन्दी मे]
अरे सर्वथा सत्य छुटे कभी ना|
अरे सर्वथा मिथ्य लुटे कभी ना||
सदा सर्वदा सत्य वाचा वदो रे|
सदा मिथ्य वो सर्व छोड सो रे||19||