II श्रीराम समर्थ II
मना राघवेवीण आशा नको रे |
मना मानवाची नको कीर्ती तूं रे ||
जया वर्णिती वेद-शास्त्रें पुराणे|
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे||१८||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !
जय जय रघुवीर समर्थ !
स्वागत/ निवेदन : श्रध्येय चैतन्य महाराजांचे ब्लॉग वर स्वागत आहे!!त्यांच्या अमृत शब्दांचा लाभ व्हावा अशी वाचकांची प्रार्थना आहे.
Friday, April 30, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
श्रीराम जयराम जय जय राम !
या श्लोकात समर्थ सांगतात की हे मना राघवाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची आशा धरू नकोस .विद्या ,धन सगे सोयरे ,शेजारीपाजारी ह्या कोणाचीही आशा धरू नकोस .कारण जन सुखाचे सोबती असतात .दिल्या घेतल्याचे असतात .अंतकाळी कोणीही नसतं! ज्या धनाच्या जोरावर आपण काहीही करू शकू असे आपल्याला वाटत असते ते धनही आपल्याला अंतकाळी येथेच सोडून जावे लागते .प्रत्येक जन येकलाच येतो व येकलाच जातो .फक्त आत्माराम राघव ,हृदयस्थ ईश्वर मात्र सतत आपल्या जवळ असतो .म्हणून काम असावा ईश्वर भजनी | क्रोध असावा ईंद्रीय दमनी| समर्थ त्यांचा अनुभव सांगतात -सेविला देव देवांचा | तेणे मी धन्य जाहलो |
आपण अनात्म वस्तूंवर प्रेम करतो .म्हणजे नाशिवंत वस्तू वर ! भौतिक संपत्ती ,जिवलग या सर्वांवर प्रेम करतो .पण या सर्व गोष्टी नाशिवंत असल्याने त्यांच्या विरहाचे दु :ख आपल्याला सहन करावे लागते. या सग्यासोय -यां पासून चिरंतर सुख मिळत नाही . या श्लोकात सांगत आहेत की शुध्द चिरंतर प्रेमस्वरूप फक्त परमात्मा आहे .तोच चिरंतर सुख देतो .म्हणून मानवी देहाची स्तुती करू नकोस .त्या मानवी देहाला खेळविणा-या राघवाची स्तुती कर .या राघवाचे वर्णन वेद ,शास्त्रे ,पुराने या सर्वांनी केले आहे .त्याच राघवाची स्तुती करणे सर्वात पुण्यकारक आहे .
As stated by Lochan Kate ( Gwaliar) ..
श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन ! श्रीरामचन्द्र जी के बिना किसी की भी आस नही करना चाहिए| राघव की भक्ति के अलावा मानव जीवन में सब कुछ व्यर्थ है| यदि मनुष्य कीर्ति प्राप्त करना चाहता है तो केवल श्रीरामचन्द्र जी की निस्वार्थ भक्ति करे|जो व्यक्ति वेद्शास्त्र पुराणों का पठन -पाठन तथा वर्णन करता है वह सभी लोगों में प्रशंसनीय माना जाता है| अत: कीर्ति पाने के लिये श्रीराम की भक्ति ही सबसे अच्छा साधन है|.
[हिन्दी मे]
राघव के बिन कोई आशा ना पालो|
नश्वर संसार को तुम तो भूल जाओ||
जिसे वर्णते है वेद शास्त्र पुराण|
उसे वर्णते सारे ही श्लाघ्य आन||१८||श्रीराम||
Post a Comment