II श्रीराम समर्थ II
मनी मानव व्यर्थ चिंता वाहते |
अकस्मात् होणार होऊंन जाते ||
घड़े भोगणे सर्वही कर्मयोगे |
मतिमंद ते खेद मानी वियोगे ||१७||
डॉक्टर वाटवे यांचे या श्लोकावरिल सुश्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, April 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
माणूस व्यर्थ चिंता करत असतो ,उद्या काय घडेल याची ! उद्या घडेल ते अशुभ घडेल अशी त्याला भीती वाटत असते .कारण त्याचे अज्ञान ! त्याला वाटत असते जे काही होते आहे ते मी करतो आहे .पण प्रत्यक्षात ते घडवत असतो तो परमेश्वर ! आपल्या हातात फक्त प्रयत्न असतात .एखादा अपघात ,एखादे आजारपण येते ते अकस्मात .ते घडते ती सुध्दा परमेश्वराची ईच्छाच ! जे आपल्याला भोगावे लागते ते आपल्या कर्मामुळे च !केलेल्या कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात .काही कर्माची फळे कालांतराने भोगावी लागतात .तेव्हा आपल्याला वाटते की असे आपल्याच बाबतीत का ?मी असा काय केले होते की आज माझ्यावर हा प्रसंग आला ! एखाद्या जिवलग व्यक्तीचा मृत्यू झाला की शोक होतो .तो ही अज्ञानाने च! त्यासाठी समर्थ मतीमंद असा शब्द वापरतात .
॥श्रीराम॥
समर्थांनी मनाच्या श्लोकांच्या फ़लश्रृतीमध्ये(२०५) सांगितले आहे मनाची शते ऎकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती । मनाच्या श्लोकांचे हे प्रयोजन आहे.... या श्लोकांच्या श्रवणाने मतीमंद देखील साधनेस योग्य होतील हा समर्थांचा विश्वास आहे....आणि हे मतीमंद कोण तर त्याचा उल्लेख समर्थ या श्लोकात करतात...मतीमंद जे खेद मनी वियोगे.....वियोगाचे दु:ख करणा-यांसाठी समर्थांनी मतीमंद हा शद्ब योजला आहे ...एखाद्या गोष्टी विषयीची आसक्तीच वियोगाच्या दु:खाला कारणीभूत ठरते....आसक्तीच्या आहारी गेलेल्या या मतीमंद जीवांसाठी समर्थांनी मनाच्या श्लोकामधुन मार्गदर्शन केले आहे....सर्व विषयांची चिंता करणे हा मानवी स्वभाव आहे...समर्थ या चिंतासाठी योग्य शद्ब योजतात "व्यर्थ चिंता" .....अनेक प्रकारचा चिंता करुन खुप काळजी करुन देखील जे होणार आहे ते होतेच....समर्थ म्हणतात, जनीं संचितें पिंड निर्माण जाला । मनी तेंचि भोगावया जीव आला ।
शुभाशूभ होणार कांही कळेना । पुढे प्राप्त ब्रह्मादिकांही टळेना ।
जय जय रघुवीर समर्थ
श्लोक १७
"हे मना ! मानव अनेक गोष्टींची उगीचच काळजी करीत बसतो होणार्या गोष्टी व्हायच्या तशा होऊन जातात.पूर्वकर्मानूसार सर्व काही जीवाला भोगावे लागते.भोग काही सुटत नाही तरी सुद्धा अज्ञानाची झापड घातलेला मानव मात्र वियोगामुळे रडत राहतो."
आपण जन्माला येतो , कुठून आलो माहीत नाही. जन्मलो ,जगलो म्हणजे नेमके काय केले ? कशासाठी केल ? हे मिळावे ते मिळावे ढीग गोळा केले , पण पुढे काय? सार काही येथेच टाकून जावे लागणार!.हे असे चक्र चालू असताना मानव उगाचच चिंता करीत रहातो.
"जनी संचिते पिंड निर्माण झाला !मनी तेची भोगावया जीव आला !
शुभाशुभ होणार काही कळेना !पुढे प्राप्त ब्रम्हादिका ही कळेना !! ( करुणाष्टक )
'चिंता' मधला अनुस्वार काढला तर 'चिता' होते. चिता एकदाच जळते तर चिंता आयुष्यभर जाळत रहाते.ती नक्कीच चीतेपेक्षा दाहक असते.अन सतत चिंतेतच राहिलो तर समोर आहे , सहज होण्यासारखे जे कार्य आहे ते सुद्धा राहून जाते.आपल्या प्रयत्नांना चिंता कधीच सहायक बनू शकत नाही.चिंता करायची नाहे म्हणजे जे व्हायचे ते होऊदेत असे बेफिकीरीने वागणे नव्हे तर पुढे काय होईल याचा अंदाज करून त्यासाठी दक्षता घेणे , संकट किंवा तोटा टाळण्यासाठी प्रयत्न करणे अन यासाठी जी भावना किंवा विचार मनात येतो तो तारक आहे अन ती चिंता नव्हे.मानवाने हातपाय गाळून बसने समर्थांना मान्य नाही.
"संचिता सारिखे येती ! प्राणी हे भोग भोगती !!"
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे म्हणजे कर्म माणसाच्या स्वाधीन आहे पण भोग नाही.भूतकाळ हातातून गेला आहे पण उत्तम भविष्य घडविण्यासाठी वर्तमान आत्ता हातात आहे.त्याचा सदुपयोग केला पाहिजे, सत्कर्म केले पाहिजे.अन हे कर्म करून झाले की परिणाम आपल्या हातात नाही त्यामुळे तिथेच त्यावरची मालकी, ममत्व सोडावे म्हणजे मनासारिखे घडले नाही तर दु:ख होत नाही . मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला हे समाधान महत्वाचे!
अन हे वाईट वाटणे , वियोगाचे दु:ख होणे हे का होते ? कारण आपण मुळातच चुकतो प्रेम ,माया , जीव लावतो तो सगळा नश्वर गोष्टींवर;श्री नामदेव म्हणतात
" अरे मना शोक करिसी किती ! हे ताव वाया धनसंपत्ती !
आयुष्य भविष्य नाही तुझिये हाती ! हे अवघे जायजणे अंती !!"
सागरात दोन ओंडके वाहत वाहत जवळ येतात काही काल अगदी चिकटून रहातात ,एकत्र वाहतात नंतर एखाद्या लाटेमुळे दूर फेकले जातात तसेच कालप्रवाहात माणसे , घटना ,वस्तू जवळ येतात प्रिय वाटतात . काल जवळ आणतो हे खर तसाच तो दूर हि फेकतो हे ही खरच ना ? मग तेंव्हा दु:ख का ?
म्हणून हे मना नश्वराचे ममत्व सोड , विवेकाने सत्कर्म कर अन एका ईश्वरवाचून दुसर्या कशाचीही आशा बाळगू नकोस......
As stated by Lochan Kate ( Gwaliar) ..
श्रीरामदासजी कहते है कि हे मानव ! तु व्यर्थ की चिंता ढोता रहता है और अचानक ही जो होना होता है हो ही जाता है| हे मानव ! हम जो कुछ भोगते है इसमें भी कुछ हमारे द्वारा किये हुए कर्मो का फ़ल भोग होता है| मनुष्य अपनी मंद बुध्दि के कारण या कहा जा सकता है कि सोचने की शक्ति कम होने के कारण वियोग होने पर उसका दु:ख मनाता है| इसलिये जो विधी द्वारा लिखित है वही होता रहता है | अत: चिंता मुक्त रहकर मनुष्य को अच्छे कर्म करते रहना चाहिए|.
[हिन्दी मे]
अरे मन रे व्यर्थ, चिन्ता क्यो करते|
अचानक जो होना है होते ही रहते||
जो भोगना है वो कर्म योग से ही होता|
मतिमंद जो होता है वो खेद करता||१७||श्रीराम||
Post a Comment