II श्रीराम समर्थ II
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे|
अकस्मात् तोही पुढे जात आहे ||
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते|
म्हणोनी जनी मागुता जन्म घेते || १६ ||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, April 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
॥श्रीराम॥
मृत्यू हा असा आहे की तो कधी झडप घालेल सांगता येत नाही समर्थ म्हणतात
नाहीं देह्याचा भरंवसा| केव्हां सरेल वयसा | प्रसंग पडेल कैसा| कोण जाणे ||दास.१९.६.२५||
याकारणें सावधान असावें| जितुकें होईल तितुकें करावें | भगवत्कीर्तीनें करावें| भूमंडळ ||दास.१९.६.२६||
त्याचे स्मरण ठेवून प्रत्येकाने आपले जीवन उत्तम पद्धतीने व्यतित करावे......दुस-याच्या मृत्यूने क्षणभरासाठी स्मशान वॆराग्य येते त्याच्या मृत्यूने तो शोकाकूल होतो.....परंतु आपण देखील या रांगेत उभे आहोत याचे त्याल विस्मरण होते.....पुन्हा काही दिवसांनी त्याला आपल्या पाठीमागे काळ लागला आहे याचे विस्मरण होते....पुन्हा तो या दृष्य जगतातील मायाजालात अडकतो....
माऊली म्हणतात,अगा मर हा बोलु न साहती| आणि मेलिया तरी रडती| परि असतें जात न गणिती| गहिंसपणें ||ज्ञाने.९.५१३||
दर्दूर सापें गिळिजतु आहे उभा| कीं तो मासिया वेंटाळी जिभा| तैसें प्राणिये कवणा लोभा| वाढविती तृष्णा ||ज्ञाने.९.५१४||
विषय लोभामध्ये आपले जीवन व्यतित करतो...माणसाचा विषय लोभ इतका प्रखर असतो की तो काही केल्या कमी होत नाही उलट वाढतच जातो....आणि हा लोभच त्याच्या अस्थिर जीवनाल कारणीभूत ठरतो....
जय जय रघुवीर समर्थ
श्लोक १६
हे मना! जीवनाचा अंत अटळ आहे एक मरतो मग दुसरा त्याच्यासाठी शोक करतो!
त्याचे आयुष्य पण त्याच्या मागोमाग पुढे जात असते आणि नंतर त्याचा ही अंत होणार असतो!
मायेच्या प्रभावतील लोभामुळे, अतृप्तीवाटते, वासना वाढते अन त्या वासनेमुळे तो जीव पुन्हा जन्माला येतो ...
समर्थ मनाला सतत हेच बजावत आहेत की बाबा रे वासनेचा गुलाम बनू नकोस .हा मी अन हे माझे या मोहात तू अडकलास की जन्म- मरणाच्या याता - यातीत जीव पडलाच !
तुकाराम महाराज म्हणतात " जन्म घेणे लगे वासनेच्या संगे|
मोह-माया आली की अतृप्ती आली! आणि त्यामुळे वासना बळावते ...ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जेह्वा वासानावर, षडरीपूंवर विजय प्राप्त होतो, जे काही करतो ते ईश्वरचरणी अर्पण करतो म्हणजेच निष्काम कर्मयोग जेव्हा समजतो तेंव्हाच जन्म मरण चक्रातून सुटका होते.
भगवदगीतेत सांगितल्याप्रमाणे
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन | मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते || ८-१६||
एकदा वासना सुटली, विवेकाने आचरण सुरू झाले की जन्म मरणाच्या चक्राचा अंत होतो.आणि हे ज्ञानामुळेच होते.
समर्थ म्हणतात,
ज्ञाने ची चुकती जन्म ! ज्ञानेची सुटका घडे !
ज्ञानेची पाविजे मुख्य !निर्गुणा परमेश्वरा !!"
आणि मग ज्ञान प्राप्तीनंतर " मरण म्हणजे मुक्ती चा आनंद उत्सव !
संत तुकाराम म्हणतात "मरण माझे मारून गेले |मरण हाती सुटली काया ||
जय जय रघुवीर समर्थ !
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे | धान्य दळताना जसे जात्यातले दाणे रडतात ,सुपातले हसतात .तसे कोणी जीवलगाचा मृत्यू झाला तर आपल्याला वाईट वाटते ,पण आपण ही गोष्ट विसरतो की आपणही काही अमर नाही ,आपल्याला ही त्याच मार्गाने जायचे आहे .आपल्या प्रत्येक वाढदिवशी आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण मृत्युच्या दिशेने वाटचाल करत आहोत .येणारा प्रत्येक क्षण सद्वर्तन करून,परोपकार करून ,चांगले वागून घालवायला हवा . दुर्लभ नरदेहाचे सार्थक करून घेण्यासाठी भगवंताशी अनुसंधान बांधायला हवे .त्यातच या नरदेहाचे हित आहे .प्रत्येकाला मृत्यू आहे हे निश्चित आहे . मृत्यूचा घाला केव्हा पडेल ते सांगता येत नाही .येणा-या क्षणाची शाश्वती नाही .परमेश्वराला ही ते चुकले नाही ,म्हणजे परमेश्वरालाही त्याचे सगुण रूपाचा त्याग करावा लागला .माणसाची अमरत्व घेऊन आल्यासारखी जी वागणूक असते ती त्याने सोडून द्यायला हवी .त्यासाठी माणसाने लोभ सोडायला हवा .लोभ असतो पैशाचा ,
मुलाबालांचा ,संसाराचा,भौतिक संपत्तीचा !आणि हे सर्व मिळाले नाही तर त्याला क्षोभ उत्पन्न होतो .त्यातून वासना उत्पन्न होते आणि वासनेने पुन्हा जन्म ! वासनांपासून मुक्त होण्यासाठी खरं तर आपल्या धर्मात वानप्रस्थाश्रम सांगितला आहे .संसारातले चित्त काढून परमेश्वराकडे लावायचं त्याचा निदिध्यास धरायचा .तरच जन्म मरणाच्या चक्रातून आपली सुटका होईल .
As stated by Lochan Kate ( Gwaliar)...
श्रीरामदासजी कहते है कि हे मनुष्य ! ध्यान रहे कि जो व्यक्ति मरता है उसके मरने के उपरान्त दूसरे शोक करते है परन्तु यही सत्य है कि जो शोक करता है उसका भी आगे चलकर अचानक [मौत कभी भी बताकर नही आती] अन्तकाल होना ही है ,अर्थात् उसे भी एक न एक दिन मरना ही है | फ़िर भी लोगो का जीवन में लोभ बढता ही रहता है और मन में लोभ का उद्वेग बढता ही रहता है | अधीक जीवन जीने की चाह बनी रहती है| यही लोभ मनुष्य के नाश का कारण होताहै|.
[हिन्दी मे]
मरा एक जो रे दुजा शोक करता|
अकस्मात वो भी आगे है जाता||
पुरता कभी ना क्षोभ लोभ उसको|
तभी बार-बार है जन्मता जो वो||१६||
Post a Comment