Friday, April 9, 2010

श्लोक १५

II श्रीराम समर्थ II

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

6 comments:

Gandhali said...

श्लोक १५
" मना ! ही मृत्युलोकीची वस्ती अशाश्वत आहे. जीवन्तपणी मात्र जो तो अहंभावाने मी मी करत असतो. आपण चिरंजीव आहोत असे समजून संसारात दंग होऊन राहतो पण काळाची उडी पडताच एकदम सर्व येथेच टाकून जावे लागते !"
सृष्टीचा प्रवाह काळाच्या स्वामित्व खाली अखंड वाहतो त्या वाहण्याची दिशा मृत्यूकडे- अनंताकडे असते एकदा अंतकाळ आला की मग मृत्यु असा विचार करीत नाही की हा क्रूर, हा दयाळू , हा राजा , हा गरीब, हा चोर,
उच्च -नीच कोणी असो.....सर्व दृश्य सजीवाला मृत्यु अटळ आहें . जो जन्मास येतो तो हमखास मृत्यु पावतो.
संसारात, मायेच्या मोहात जगताना अविद्येच्या प्रभावामुळे माणसाला रोजच्या जीवनात मृत्यूचे स्मरण रहात नाही
. मी हे केले, मी ते केले , मी ते करीन ... सतत " मी अन माझे " या नादात मनुष्य स्वत:ला चिरंजीवाच मानू लागतो पण आयुष्य क्षणाक्षणाने संपत असते अन जेंव्हा शेवटचा क्षण संपतो तोच देह सोडून जावे लागते .
जो जन्मास येतो तो हमखास मृत्यु पावतो. प्रत्यक्ष भगवंताचे अवतार सुद्धा जर अखेर या मार्गानेच गेले तर ईतर जीवांची काय कथा ? या जगाला मृत्युभूमी असे नावच आहे .
म्हणून विचारी माणसाने मृत्यूची जाणीव ठेवून आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे , अंती मनी श्रीराम आठवावे ...........

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥

श्रोतीं कोप न करावा| हा मृत्यलोक सकळांस ठावा |
उपजला प्राणी जाईल बरवा| मृत्यपंथें ||दास.३.९.४१||
येथें न मनावा किंत| हा मृत्यलोक विख्यात |
प्रगट जाणती समस्त| लहान थोर ||दास.३.९.४२||
तथापी किंत मानिजेल| तरी हा मृत्यलोक नव्हेल |
याकारणें नासेल| उपजला प्राणी ||दास.३.९.४३|
उपजे ते नाशे या न्यायाप्रमाणे जे जन्माला आले त्याचा नाश हा ठरलेलाच आहे......आपल्याला जे जग सत्य वाटते आहे त्या जगताला मृत्यूलोक असे म्हणतात....या मृत्यूलोकात कशाचीच शाश्वती देता येत नाही ....या अशाश्वत जगताची ही वस्तुस्थिती असताना देखील क्षणाक्षणानी मृत्यू समीप येत असताना देखील मनुष्यप्राणी मीपणाच्या आहारी जाउन जीवन जगतो ....या मीपणाचे स्वरुप मोठे विलक्षण असते ...तो सहजासहजी जात नाही ...त्याचे अनेक दु:ष्परीणाम भोगावे लागतात ....असे असताना देखील जीव मीपणा मध्येच सारे आयुष्य व्यतित करतो....मृत्यूचे भय दुस-याला या भ्रमात राहुन संसारात रमुन जातो....

जय जय रघुवीर समर्थ

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥

देह तोच मी अशा देह्बुद्धिमुळे माणसातील अहंता बळकट होते.....देहबुद्धिच्या आहारी गेल्यामुळेच मीपणाचा जन्म होतो....हा मीपणा शस्त्राने तुटत नाही, या मीपणाचे परिणाम अतिषय भयंकर असतात.... समर्थ म्हणतात
मीपणें वस्तु नाकळे| मीपणें भक्ति मावळे |
मीपणें शक्ति गळे| वैराग्याची ||दास.७.७.४६||
मीपणें प्रपंच न घडे| मीपणें परमार्थ बुडे |
मीपणें सकळही उडे| यश कीर्ति प्रताप ||दास.७.७.४७||
या मीपणामुळे मन अपोआपच बंधनात आडकते आणि या बंधनामुळे त्याला जे जडत्व प्राप्त होते त्यामुळे त्याचे बळ आपोआपच कमी होते...समर्थांनी देह्बुद्धि विषयी म्हटले आहे नाना धोके देहबुद्धिचे तर नाथ महाराज म्हणतात,
देहबुद्धि जयापाशी । पाप वसे त्या मानसी । दोष जाणा अहंकार । तेणे सत्य हा संसार ।।
समूळ अहंतेच्या नाशी । ब्रह्मप्राप्ती होय त्यासी । एकाजनार्दनी अहंकार । त्याग करावा सत्वर ॥
देह्बुद्धिने होणा-या परिणामाची जाणिव असुनही सामान्य जीव आपल्या अंतापर्यंत स्वत:चे मीपण जपत राहतो....या अहंकारा पोटी अनेक गोष्टी गमावतो आणि आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर आल्यानंतर आपल्या वागण्याचा त्याला पश्चाताप होतो...ज्यासाठी आयुष्यभर धडपड केली ते काहीच प्राप्त झाले नाही याचे दुख: करत राहतो...सर्व काही मिळूनही शेवटी आपले हात रिकामेच ही जाणिव त्याला दुख:दायक होते

जय जय रघुवीर समर्थ

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar) .. श्रीरामदासजी कहते है कि हे मन ! जीवन का सबसे बडा सत्य म्रुत्यू भुमि ही है| फ़िर भी लोग "मै" का पाठ पढते रहते है| सभी लोग अपने आपको अमर समझते है परन्तु देखते ही देखते सब कुछ चौपट हो जाता है| इसलिये हे मनुष्य ! सत्य को समझकर अहंकार को छोडकर जीवन पथ की ओर निश्चिंत होकर चलो| क्योकि कोई नही जानता कि कब अंत काल होना है? अत: अचानक ही सब कुछ नष्ट हो जायेगा|.

suvarna lele said...

हे मना ,हा मृत्युलोक आहे .येथे जे जे काही आकाराला येते त्याचा नाश ठरलेला आहे .सर्व गोष्टी नाशिवंत आहेत .आत्ता आहेत पण दुस-या क्षणाला काय होईल सांगता येत नाही .ही सृष्टी परिवर्तनशील आहे .सागरातील पाण्याची वाफ होऊन त्यापासून पाउस पडतो .ते पावसाचे पाणी नद्यांमधून वाहते .नद्यांचे पाणी समुद्राला जाउन मिळते .त्यामुळे ही सृष्टी सत्य आहे असे वाटते .पण त्यामध्ये होत असलेले परिवर्तन आपल्या लक्षात येत नाही .तसेच या मानव देहाचे आहे .येथे माणूस मृत्युमुखी पडला की दुसरा जीव जन्माला येतो .असे हे सृष्टीचे चक्र अव्याहत चालू असते .जसा दिवस उगवतो ,मावळतो ,पुन्हा काही काळाने उगवतो .त्यामुळे ही सृष्टी सत्य वाटते .तसेच आपणही चिरंजीव आहोत असे आपल्याला वाटते .आपण अनेक वर्षांनंतरची स्वप्ने रंगवत असतो पण आपल्याला माहीत नसते की आपले पुढच्या क्षणाला काय होणार आहे .आपल्यातला मी आपल्याला घट्ट धरून ठेवतो .आपण आपला नश्वर देह म्हणजे मी अशी अहंता धरतो .मी मी अशी अहंता आपल्याला सर्वत्र नाचवत असतो .मी ,माझे घर ,माझा व्यवसाय ,माझी बायको मुले माझी जमीन ,या मध्ये आपली आसक्ती गुंतवून ठेवतो .भौतिक गोष्टींमध्ये ,ज्या नाशिवंत असतात त्यात आपले मन गुंतून राहते .अंतकाळी सुध्दा नाम आपल्या तोंडी येत नाही .येथेच आपल्या पुनर्जन्माची तयारी करून ठेवलेली असते .
हे वेड्या मना ,अरे तुला हे समजलं का की तुलाही हे जग सोडून एक दिवस जायचे आहे .केव्हा ते माहित नसले तरी जायचे नक्की आहे .मग तू आताच नाम घ्यायला सुरुवात का करत नाहीस ?

lochan kate said...

[हिन्दी मे]
हे मन जान सत्य ये म्रुत्यु भूमि|
जीते बोलते सारे जीव देखो मी-मी||
चिरंजीव अपने को मानते है ये सब|
अकस्मात छोडकर जाते है वो तब||१५||