Friday, December 13, 2013

श्लोक २०४

||श्रीराम समर्थ ||

मना संग हा सर्वसंगास तोडी।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥
मना संग हा साधना शीघ्र सोडी।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक २०४.....
मना संग हा सर्व संगास तोडी |
मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी ||
मना संग हा साधका शीघ्र सोडी |
मना संग हा द्वैत नि:शेष मोडी ||२०४||
हिन्दी में ......
अरे मन राम संग विषयों को तोडता |
अरे मन राम संग मोक्ष को है जोडता ||
अरे मन राम संग शीघ्र जीव छोडे |
अरे मन राम संग द्वैत सारा तोडे || २०४||
अर्थ.... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! श्री राम का नामस्मरण सारी बुराईयों को दूर करता है | इस नाम स्मरण की संगति से तत्काल मोक्ष की प्राप्ति होती है | यह संग साधकों को भव सागर से तत्काल पार करवानें का साधन है | अत: हे मानव ! यह सत् संग द्वैत से हमें पूर्ण्रुप से छुडाता है | अत: परमेश्वर का नाम स्मरण और सत्संग हमारे लिये नितांत आवश्यक है | उसके द्वारा हमारे जीवन का सन्मार्ग शुरु होता है |

suvarna lele said...

हे मना हा संग सगळ्या संगांना सोडतो .सर्व आशा ,ममता ,मी पणा ,देहबुद्धी हे सगळे संग संत सज्जनांच्या संगतीमुळे सुटतात .ह्या गोष्टीचे संग सोडले की मोक्ष ताबडतोब मिळतो .मोक्ष म्हणाजे काय ते सांगताना समर्थ म्हणतात :
याची जन्मे येणेंचि काळे | संसारी होईजे निराळे | मोक्ष पाविजे निर्धारे | स्वरूपाकारे || ६-९-२९ || याच जन्मात आणि याच जमान्यात मनाने संसारातून बाजूला सरळे की स्वस्वरुपाशी एकाकार होता येते ,निश्चळ होता येते आणि मोक्षाची प्राप्ती होते ..मग हा संग साधकाला जलद बाह्य संगापासून सोडते .आणि साधक स्वस्वरुपाला जाऊन मिळतो .त्याच्यातले द्वैत संपून जाते .द्वैत शिल्लक रहात नाही आणि संपूर्ण स्वस्वरुपाशी एकरूपता येते .