Friday, December 6, 2013

श्लोक २०३


||श्रीराम समर्थ ||

मना सर्वही संग सोडूनि द्यावा।
अती आदरे सज्जनाचा धरावा॥
जयाचेनि संगे महादुःख भंगे।
जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक २०३....
मना सर्व ही संग सोडुनि द्यावा |
अती आदरे सज्जनाचा धरावा ||
जयाचेनि संगे महादु:ख भंगे |
जनी साधने वीण सन्मार्ग लागे ||२०३||
हिन्दी में.....
अरे मन सारे संग तू छोड दे ना |
बडे आदर से सज्जन संग ले ना ||
जिस संग से रे महा दु:ख जाते |
उसी सन्मार्ग पर तु ही चला जा रे ||२०३||
अर्थ....... श्री समर्थ राम दास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! इस देह प्रपंच का संग छोड देना चाहिये | सदैव अत्यंत आदर के साथ सज्जन व्यक्तियो के साथ व्यवहार करना चाहिये | क्योंकि सज्जन लोगों की संगति से बडे बडे दु:ख भी दूर हो जाते है | हे मानव ! साधना [अभ्यास] के बिना सन्मार्ग की प्राप्ति नहीं होती है | अत: सन्मार्ग के लिये सतत संत , सज्जनों की संगति मे रहना चाहिये |

suvarna lele said...

हे मना ,सर्व संग सोड .संग कशाचा ? संग देहाचा ,देहाच्या अनुषंगाने येणा-या माझ्या घरादाराचा ,व्यवसायाचा ,कुटुंबाचा ,लोभ ,मोह ,माया ,मत्सर ,क्रोध या सर्वांचा संग सोड असे समर्थ म्हणतात .या संगाने माणूस अनेक प्रकारची दुख: भोगतो .त्यातून तो स्वत:ला सोडवू शकत नाही म्हणून हे मना संग सोड .संग कोणाचा धरायचा –सज्जनांचा सज्जन संगतीने संसाराचे महादू:ख दूर होते .कारण संत सज्जन हे आनंदाचे निधान असतात .संत आनंदाचे स्थळ ,केवळ सुख संतोषाचे मूळ असतात .संत विश्रांतीची विश्रांती | संत तृप्तीची निजतृप्ती | नांतरी भक्तीची फलश्रुती | ते हे संत || १-५-१६ ||
म्हणूनच समर्थ संत संग धरायला सांगतात .संत सहवासात आपोआपच साधाना घडते . मग वेगळी साधना करावी लागत नाही .सन्मार्ग सापडतो .राघवाचा पंथ सापडतो .