Sunday, July 21, 2013

श्लोक १८३

II श्रीराम समर्थ II

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥
प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे।
तयाचेनि योगे समाधान बाणे॥१८३॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

या श्लोकात सद्गुरूची होकारात्मक लक्षणे समर्थ सांगत आहेत .सद्गुरू भक्त असतो .जो अभक्त नाही तो भक्त .जो परमेश्वरापासून विभक्त नसतो तो भक्त असतो .सतत परमेश्वर चिंतनात मग्न असणारा ,ज्या घटना आयुष्यात घडतात त्या परमेश्वराच्या ईच्छेने घडतात असे मानणारा असतो .सर्वत्र , परमेश्वर पाहणारा असतो
सद्गुरू ज्ञानी असतो .ज्ञान म्हणजे आत्मज्ञान .मी कोण ,देव कोण याचे ज्ञान असणारा असतो .
सद्गुरू विवेकी असतो विवेक तीन प्रकाराचा .नित्यानित्य विवेक ,सारासार विवेक ,शाश्वत अशाश्वत विवेक .नित्य काय अनित्य काय हे सांगणारा विवेक म्हणजे नित्यानित्य विवेक .परब्रह्म ,थोरला देव नित्य आहे .या सृष्टीपूर्वी होता ,आताही आहे ,सृष्टीचा नाश झाल्यावरही आहे .दृश्य विश्व अनित्य आहे ,पंचभूतिक ,नाश पावणारे आहे .अनित्य आहे .हे सर्व जो जाणतो तो नित्यानित्य विवेक साधतो .
या विश्वात एक परब्रह्म हेच सार आहे बाकी सर्व सगुण ,जे नाश पावणारे आहे ते असार आहे असा निश्चय ज्याचा होतो तो सारासार विवेक साधतो
परमात्मा परब्रह्म एक शाश्वत आहे ,बाकी सारे अशाश्वत आहे असे जो जाणतो तो शाश्वत अशाश्वत विवेक साधतो .सद्गुरू ह्या तीनही विवेकांनी युक्त असतात .सद्गुरू विरागी असतात .वैराग्यशील असतात .म्हणजे त्यांचे हवेनको पण संपलेले असते .संपत्ती ,भौतिक सुखसोयींचा त्यांचा हव्यास संपलेला असतो .
सद्गुरू कृपाळू असतात मनस्वी असतात .मन स्वाधीन ठेवणारे असतात .क्षमावंत असतात .दुस-याला सुखी पाहण्यातच त्याला सुख मिळते .स्वभावत:च दयाळू ,कृपाळू असतात .त्यामुळेच लोककल्याण साधतात .व्युत्पन्न असतात .विद्वान असतात .वेदशास्त्र संपन्न असतात .जितेंद्रिय असतात .ईंद्रीयांवर नियंत्रण ठेवणारा असतो .संदेह रहित ज्ञान असते .स्वरूपस्थितीमुळे समाधानी असतो .












lochan kate said...

श्लोक १८३....
जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी |
क्रुपाळु मनस्वी क्षमावंत योगी ||
प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे |
तयाचेनि योगे समाधान बाणे ||१८३||
हिन्दी....
जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी |
क्रुपालु मनस्वी क्षमावंत योगि ||
प्रभु दक्ष व्युत्पन्न चतुरता जो जाने |
उन्ही सज्जनों से समाधान होवे ||१८३||
अर्थ... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! जो भक्त ज्ञानी , विवेकी , वैराग्यशील , क्रुपालु , उदार मन का अर्थात् मन को काबु में रखने वाला , क्षमाशील , प्रभु की भक्ति के प्रति दक्ष रहने वाला , चतुर्य जानने वाला हो ऐसे व्यक्ति की संगति के योग से समाधान प्राप्त होता है |अत: मनुष्य को सदैव ऐसे सज्जन लोगों की संगति मे विचरण करना चहिये | जिससे अपने जीवन को सार्थ करना आसान हो जाता है |