Friday, July 12, 2013

श्लोक १८२

II श्रीराम समर्थ II

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥
मुखे बोलिल्यासारिखे चालताहे।
मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥१८२॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

suvarna lele said...

ह्या श्लोकात आणखीन काही काही गुण सांगितले आहेत .सद्गुरू वाह्यात किंवा फटकळ बडबड करत नाही .नेमकेच बोलतात .वासना क्षय न झाल्यास मोक्ष मिळत नाही हे त्यांना माहीत असते .त्यामुळे बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे तो वागत असतो .असा माणूस साधनमार्ग न सोडता काय करावे ते नेमकेपणाने जो सांगतो तो सद्गुरू असतो .सद्गुरूला ओळखण्याच्या खुणा समर्थ सांगतात .चमत्कार आननी तत्वज्ञानाची भाषा जो वापरतो तो निरिच्छ व वैराग्य संपन्न आहे की नाही ते पाहून ,त्याचे वर्तन कसे आहे ते पाहून मग सद्गुरूला शरण जावे .





lochan kate said...

श्लोक १८२....
नव्हे वाऊगी चाहुटी काम पोटी |
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ||
मुखी बोलिल्या सारखे चालता हे |
मना सद् गुरु तोचि शोधुनि पाहे ||१८२||
हिन्दी में.....
नही बात बेगार , चुगली की बातें |
क्रियाबिना वाचालता व्यर्थ होवे ||
जैसा कहो वैसे चलकर दिखाओ |
अरे सद् गुरु हो जो ब्रह्म से मिलाओ||१८२||
अर्थ... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! व्यर्थ कार्य करना एवं वासना पूर्ण विचार रखना हमारे व्यक्तित्व के लिये अच्छी बात नही है | बिना कार्य करके दिखाये गये व्यर्थ की वाचालता करना गलत है | जो आप मुख से बोलो वही करके भी दिखाओ | हे मनुष्य ! ऐसा सद् गुरु ढूॅढना चाहिये जिससे परब्रह्म की प्राप्ति हो | जो हमें परब्रह्म से मिला दे |

Unknown said...

भगवंतांनी मनुष्याला निर्णयक्षम, तर्कशील बुद्धी दिली आहे, संवेदनशील मन दिले आहे, संस्कारांच्या धारणेसाठी चित्त दिले आहे. याशिवाय मन, बुद्धी, चित्ताच्या योग्य वापर व्हावा यासाठी आवश्यक असणा-या योग्य-अयोग्य, श्रेयस-प्रेयस यांच्याविषयीच्या प्रगल्भ जाणीवेसाठी संतांची, ग्रंथांची योजनाही करून ठेवली आहे.

केवळ संतसहवासातच आपली जाणीव प्रगल्भ होऊ शकते. ही जाणीव प्रगल्भ झाल्याशिवाय पिंड-ब्रह्मांडाचे असलेले ज्ञान केवळ शब्दपांडित्यच ठरते. ते केवळ बुद्धीवरील रुपेरी मुलाम्यासारखे असते. बुद्धीची विद्वत्ता, मनावरील आंदोलने हे केवळ या जन्मांचे सोबती. जन्मोनजन्मी सोबत असते ती केवळ जाणीव. या जाणीवेच्याच अनुरूप योग्य त्या संस्कारांनी युक्त मन, बुद्धी व चित्त व प्रारब्ध मनुष्याला प्राप्त होते. ज्याची जाणीव भगवत्मय होते, त्याला संस्कार आणि कुसंस्कार म्हणून वेगळं काही उरत नाही. उरते ती केवळ परमेश्वराची इच्छा ! हीच ख-या सद्गुरूची खूण आहे. त्याच्या प्रत्येक कर्मातून भगवंताच्या जाणिवेची म्हणजेच मांगल्याची, पावित्र्याची, 'श्री'ची जणू काही भक्तांवत मुक्त उधळणच होत असते. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेऊन चालावे.
अहो! सोनंच चालत घरी आले तरी तुम्ही सोनं विकत घ्यायला बाजारात जाल का? मग जे प्राप्तव्य ते संतच समोर उभे असताना दुसरी साधना काय करणार? हे सर्वांना उमगत नाही. ज्यांना उमजतं ते कल्याणस्वामी, उद्धवस्वामी, वेणास्वामी, आक्कास्वामी होतात, इतर मात्र माळ ओढत बसतात, रामदास स्वामींच्या नावाचा केवळ जप करतात, दासबोधातील एकच अध्याय आयुष्यभर वाचत राहतात, खरा देव अशांना दूरच राहतो. विहंगम मार्ग समोर असताना पिप्पिलीका मार्ग का अनुसरावा? अशाने देव जाणीवेतून अधिकच दूर जातो, नाही का?