Friday, May 10, 2013

श्लोक १७३

II श्रीराम समर्थ II 

 स्वरुपी उदेला अंहकार राहो ।
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ॥
दिशा पाहता ते निशा वाढताहे ।
विवेके विचारें विवंचोनि पाहे ॥१७३॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १७३....
स्वरुपी उदेला अहंकार राहो |
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ||
दिशा पाहतां ते निशां वाढता हे |
विवेके विचारे विवंचुनी पाहे ||१७२||
हिन्दी में .......
स्वरुपी अहंकार मन में भरा है |
वहॉ सारा व्योम ढका जा रहा है ||
दिशा देखो वो तो निशा बढती जाती |
विवेकी विचारों से सद् स्वरुपी होती ||१७३||
अर्थ.....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! मनुष्य को अहंकार के कारण सम्पूर्ण ज्ञान रुपी आकाश ढका हुआ दिखाई देता है | अत: सद् स्वरुप के लिये जाग जाओ क्योंकि दिशाओं को देखते - देखते रातें बढ रही है अर्थात् वक्त गुजरता जा रहा है | अत: अपनें विवेक से सोचकर सद्स्वरुप को देखनें का प्रयास करना चाहिये और अपने जीवन को सार्थक करनें का प्रयास करना चाहिये |

समर्थदास said...

अहंकार हा देवाने त्याच्याच प्राप्ती करता दिलेली साधक माया आहे. गुणांनुसार तो तुच्छ ठरतो वा शुभ ठरतो.
मनुष्यामध्ये जो अहंकार रूपी राहू आहे त्याने त्याचे सूर्यासमान किंबहूना सूर्याहूनही तेजस्वी असे स्वरूप सदैव केवळ एका दिवसासाठी नव्हे तर कायमचेच व्यापलेले असते. बद्धावस्थेत जो तुच्छ अहंकार असतो, तो देह-जीवाच्या तादात्म्यामुळे व्यक्तीकेंद्रित असतो, त्यामुळे त्याची सारी कर्मे या व्यक्तीकेंद्रित अहंकाराने लिप्त असतात. त्याचे पाहणे स्वकेंद्रित असते, बोलणे स्वकेंद्रित असते, सारी सारी कर्मे स्वकेंद्रित पर्यायाने दोषयुक्त असतात, षड्िरपूंनी बरबटलेली असतात, जी स्वत:लाच नाही तर इतरांच्याही नाशाला कारण ठरतात. हे विवेकाने विचार केले असता ध्यानी येते.
परंतु संतांच्या ठिकाणी हा शुभ अहंकार स्वस्वरूपाशी म्हणजे सर्वान्तरात्म्याशी ऐक्य पावलेला असल्याने त्यांनी केलेली सर्व कर्मे स्वत:लाच नाही तर इतरांनाही इहलोकी व परलोकी लाभदायकच ठरतात. ज्याप्रमाणे सूर्याला दिलेले तेज तो भगवंचाच्याच संकल्पाने सर्व जगाला देतो, पृथ्वीला दिलेले सत्त्व ती सर्व सजीवमात्रांना दान करते, तद्वत संतजनही त्यांना प्राप्त झालेले ज्ञान, स्वरूपाची ओळख इतरांना करून देतात, पर्यायाने ते ईश्वराचेच कार्य करतात. शीवभावे जीवसेवा करतात. हो, तेच ईश्वर असतात.

suvarna lele said...

आकाशासार्ख्या व्यापक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकार रुपी राहू उदयाला येतो आणि तो या व्योमाकार स्वरूपाला झाकतो. त्यामुळे सर्व दिशाना अज्ञान रुपी अंधकार पसरलेला दिसतो ..प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेला देहाहंकार परब्रह्माला व्यापतो .कारण देहबुद्धी दृढ झालेली असते .त्यामुळे मी देह आणि ज्या दृश्य विश्वात मी रहातो आहे ते दृश्य विश्व सत्य असे त्याला वाटते .या दृश्य विश्वापलीकडे काही परम सत्य असणारे ,निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप आहे याचा विचार काय कल्पनाही माणूस करू शकत नाही .देहापासून अलिप्त ,अमर असणारे आत्मस्वरूप आहे याचा विचारही माणूस करू शकत नाही .म्हणूनच त्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही .यावरचा उपाय समर्थ शेवटच्या चरणात सांगतात –विवेके विचारे विवंचुनी पाहे | विवेकाने म्हणजे आत्मानात्म विवेकाने ,ब्रह्मांडाचा सारासार विचार करून विवंचुनी म्हणजे साधक बाधक विचार करून आत्मसाक्षात्कार करवून घ्यावा .त्यासाठी मी कोण याचा शोध घेतला तर मी म्हणजे या देहात वास्तव्य करणारे चैतन्य आहे याची खात्री पटते आणि मग प्रत्येक प्राणीमात्रात तेच चैतन्य भरलेले आहे अशी खात्री पटते आणि मग आपल्याला जो त्रास होईल तोच त्रास दुस-याला होईल हे पटते आणि मग आपले वागणे बोलणे दुस-याच्या भावनांशी कदर करणारे होते .मग मी आणि इतर एकाच परब्रह्माचे अंश आहोत याची खात्री पटते ,देहबुद्धी नाहीशी होते .