Friday, May 3, 2013

श्लोक १७२

II श्रीराम समर्थ II 

स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥
मुळी कल्पना दो रूपे तेचि जाली ।
विवेके तरी सस्वरुपी मिळाली ॥१७२॥  



जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १७२........

स्फ़ुरे विषयी कल्पना ते अविद्या |
स्फ़ुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ||
मु;ळी कल्पना दो रुपे तेचि जाली |
विवेके तरी सस्वरुपी मिळाली ||१७२||
हिन्दी में.....
स्फ़ुरण विषयों का कल्पना से अविद्या |
स्फ़ुरण ब्रह्म रे जान माया सुविद्या ||
मुल कल्पना दो स्वरुप में हो जाती |
विवेक स्वरुप से वहीं पा वो जाती ||१७२||
अर्थ....
श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! आत्म विषयक ज्ञान के कारण कल्पना में भी विषयों का स्मरण होता है | उस निर्गुण परब्रह्म को पहचानने के लिये माया को छोड आत्मविषयक ज्ञान का होना अत्यंत आवश्यक है | मूल स्वरुप की कल्पना के सदैव दो स्वरुप हो जाते है परन्तु स्वविवेक के कारण अथवा सद्विचार के कारण अंत में वह मिलकर सद्स्वरुप में मिल जाते है |

समर्थदास said...

मुळात कल्पना एकच पण ती विषयी मनुष्याच्या ठिकाणी विषयांच्या अनुषंगाने असते, तेथे ती अविद्याच प्रकाशीत करते.
पण संतांच्या किंवा साधकांच्या ठिकाणी तीच कल्पना माया-ब्रह्माचे आकलन करून देते, तीला तेथे आधार सुविद्येचा असतो. अशा प्रकारे विवेकाची कास धरून आपणच कल्पनेला सुविद्येचे अधिष्ठान मिळवून देऊन तिला स्वस्वरूपात विलीन करून टाकावे.
मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माया नासे ।
मायेकरितां लाभ असे । परमार्थस्वरुपाचा ।। 2:30

suvarna lele said...

कल्पनेची दोन रूपे आहेत जी कल्पना विषयांचे स्फुरण देते ती अविद्या असते ,तर जी कल्पना ब्रह्माचे स्फुरण देते ती सुविद्या असते .म्हणजे विद्येची दोन रूपे समर्थांनी या श्लोकात सांगितली आहेत सुविद्या आणि अविद्या .अविद्या स्वस्वरुपावर पांघरून घालते .त्यामुळे माणसाला आपण कोण ,आपले स्वरूप काय ते कळत नाही .ते च अज्ञान असते .आपला देह म्हणजे मी आहोत असे विपरीत ज्ञान झाल्यामुळे आपण सुखस्वरूप असणारे ब्रह्मस्वरूप आहोत याचा विसर पडतो .मी देह वाटणे हीच अविद्या .
सुविद्येचे दोन प्रकार आहेत १ व्यतिरेक बोध २ अन्वय बोध व्यतिरेक बोधात जड वस्तूंचा निरास मी म्हणजे चैतन्य आहे असे जाणणे .अन्वय बोधात सर्व काही ब्रह्मरूपच आहे असे मानणे .मूळच्या एकां कल्पनेचे दोन रूपे आहेत ,१ शुध्द कल्पना २ अशुध्द कल्पना हरिसंकल्प ही शुध्द कल्पना त्याउलट इतर कोणतीही कल्पना ही अशुध्द कल्पना आहे अशुध्द कल्पना दूर होण्यासाठी मन केवळ परमेश्वर चिंतनाकडे लावून देहाने प्रापंचिक कर्मे करावी आणि देहबुद्धीतून सुटका करवून घ्यावी असे समर्थ सांगतात .