II श्रीराम समर्थ II
जय जय रघुवीर समर्थ !
म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे। |
अतर्कासि तर्की असा कोण आहे॥ |
जनीं मीपणे पाहता पाहवेना। |
तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥ डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण |
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
श्लोक १५६......
म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे |
अतर्कासी तर्की असा कोण आहे ||
जनी मी पणे पाहतां पाहवेना |
तया लक्षितां वेगळे राहवेना ||१५६||
हिन्दी में .....
कहे जानता जो मूर्ख वो देखे |
अतर्क से कौन तर्क करे रे ||
अहं भाव किसी का देखा न जाये |
उसे लक्षित करते ही मन भाये ||१५६||
अर्थ.....श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! कहा जाता है कि जानते हुए भी कि सामने वाला मूर्खता पूर्ण तर्क रहित बातें कर रहा है उससे तर्क संगत बात करना कौन पसंद करेगा ? जिस मानव में अहं भाव होता है तथा जो तर्क रहित बातें कहत या करता है ऐसे मूर्ख व्यक्ति को कौन लक्षित किये बगैर रह सकता है ? उसकी ओर सारा समाज ही उंगली उठाता है | अत: श्री समर्थ जी कहते है कि अपने ऊपर कोई उंगली उठाये ऐसा अपना वर्तन कभी ना हो |
जो सर्वाना सांगतो मला सर्व माहीत आहे तो लोकांमध्ये मूर्ख ठरतो .त्याप्रमाणे एखादा ज्ञानी म्हणू लागला की मी ब्रहम जाणतो तर तो मूर्ख ठरतो कारण ब्रहम जाणणारा .मी जाणतो म्हणायला शिल्लक वेगळा उरतच नाही ,देव पहाया गेलो देवची होऊनि ठेलो ‘अशी अवस्था होते .म्हणून मी जाणतो असे म्हणणारा मूर्ख होतो .कारण जेथे तर्कच पोचत नाही ,त्याला जाणणारा कोण असू शकतो ? त्या परब्रह्माला ,परमतत्वाला मी पणाने ,अहंकाराने ,मी जाणतो या अहंकाराने पाहता येत नाही .. दुसरी गोष्ट अशी की जीव हा वास्तविक परब्रह्मस्वरूपच आहे .तो वेगळा नाही मग मी जाणतो असे म्हणणे ही चुकीचेच होते
Post a Comment