Friday, March 30, 2012

श्लोक ११६

II श्रीराम समर्थ II

बहू शापिता कष्टला अंबऋषी।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

यापुढील १० श्लोकात समर्थ देव भक्तांचे दु:ख कसे निवारण करतो ते सांगितले आहे .या श्लोकात सांगितलेल्या प्रमाणे अंबरीष राजाला वाचविण्यासाठी भगवंताने जन्म घेतला .अंबरीष हा एक पुण्यवान ,ज्ञानी ,धर्माने वागणारा ,विष्णूभक्त होता .तो एकादशीचे व्रत करत असे .तो त्या दिवशी कोणीही अतिथी आला तर त्याची अर्घ्य पाद्यपूजा करून सर्व काळ हरीचिंतनात राही .त्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी अंबरीष राजा कडे आले .दुर्वासांची पाद्य पूजा राजाने केली .स्नान आटोपून लवकर येण्याची विनंती दुर्वासांना केली ..दुर्वासांना यायला उशीर झाला म्हणून राजाने तीर्थ घेऊन पारणे सोडले ..ते पाहून दुर्वास राजावर रागावले .त्यांनी राजाला शाप दिला ‘तुला मोक्ष न मिळता नाना योनीत जन्मावे लागेल .शाप ऐकून राजाने भगवंताचे स्मरण केले .शाप वाणी पूर्ण होण्याआधी हृषीकेश प्रगट झाले .राजाने भक्तवत्सल विष्णूंच्या चारणांना घट्ट मिठी घातली ..दुर्वासांनी विष्णू ना शाप देण्याचे ठरवले .ते म्हणाले ‘साधूंचे रक्षण, दुष्टांचा नाश ,धर्मस्थापना यासाठी दहा वेळा अवतार घ्यावे .’’
उपमन्यू ,व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा .घरची अत्यंत गरीबी असल्यामुळे त्याची आई त्याला दूध म्हणून पाण्यात पीठ कालवून देत असे .एकदा तो खेळण्यासाठी दुसरी कडे गेला असता त्याला खरे दूध प्यायला मिळाले ..घरी आल्यावर त्याने आईजवळ दुधासाठी हट्ट केला .आईने त्याला सांगितले की तू पूर्व जन्मी ईश्वराची आराधना केली नाहीस म्हणून तुला आत्ता दूध मिळत नाही .हे ऐकून त्याने कडक तप केले शंकरांनी त्याला क्षीरसागर दिला .

lochan kate said...

श्लोक ११६....
बहू श्रापितां कष्टला अंबरुषी |
तयाचे स्वये श्री हरी जन्म सोशी ||
दिला क्षीर सिंधू तया ऊपमानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११६||
हिन्दी में....
बहु कष्ट हुए श्राप से अंबरिष को |
उसके लिये हरि ने धारा , जन्म को ||
दिया क्षीर सागर उस ऊपमन्यु को|
न उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी को || ११६||
अर्थ.... श्री रामदास जी कहते है कि हे मानव ! राजा अबरीष ने श्राप के कारण अत्यंत कष्ट सहन किये | उनके कारण भगवान ने जन्म लिया एवं उपमन्यु बालक के लिये खारे समुद्र के पानी के स्थान पर दूध का सागर प्रगट किया था |अत: परमेश्वर अपने भक्तों के प्रति सदा अभिमान का भाव रखते है |उनकी कभी भी उपेक्षा नही करते | सिर्फ़ भगवान पर विश्वास का होना आवश्यक है |