II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
तुटे वाद संवाद तेथें करावा।
विवेके अहंभाव हा पालटावा॥
जनीं बोलण्यासारिखे आचरावें।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
जेथे वाद न होता शेवट समाधानात होईल तेथे संवाद करावा .जेव्हा दोन्ही बाजू गोष्टी समजून घेण्याच्या मन:स्थितीत असतात तेव्हाच संवाद होतो नाहीतर वादच होतो .जेव्हा दोघेही दुराग्रह सोडतात तेव्हा संवाद होतो .म्हणून समोरचा माणूस कसा आहे हे बघून संवाद साधायचा की नाही ते ठरवायचे .
म्हणून विवेकाने अहंभाव काढून टाकून विचार करावा .दुसरी महत्वाची गोष्ट ही की आपण जसे बोलतो तसे करतो का यावर बारकाईने लक्ष ठेवावे .तसे केले तरच भक्तिपंथाणे जाता येईल .भक्तिपंथाने गेले तरच क्रिया पालटता येते .माणूस दृश्य सृष्टीतून आनंद शोधायचा प्रयत्न करतो .आपल्या जवळ असलेल्या हृदयस्थ आत्मारामाला विसरतो पण या आत्मारामाला जो अनुभवतो त्याला आनंद प्राप्त होतो .शांती मिळते .भगवान आपलासा होतो .त्याच्या कृपेने आपला कार्यभाग साधतो .म्हणून समर्थ म्हणतात की भक्तिपंथेची जावे |
श्लोक ११५.....
तुटे वाद संवाद तेथे करावा |
विवेके अहंभाव हा पालटवा ||
जनी बोलण्या सारिखे आचरावे |
क्रिया पालटे भक्ति पंथे ची जावे ||११४||
हिन्दी में ....
छुटे वाद , संवाद वो ही तु करना |
विवेक से अहंभाव को तुम हरना ||
जैसा बोलो वैसा ही आचार होना |
क्रिया बदले ऐसे भक्ति राह चलना ||११५||
अर्थ.... श्री राम दास जी कहते है कि जिस स्थान पर वाद - विवाद न होता हो ऐसे स्थान पर बात करना या कहना चाहिये | अपने स्वविवेक के स्वारा अहंकार का अंत कर देना चाहिये एवं क्रिया करने के साथ - साथ ही भक्ति के मार्ग पर चलना चाहिये अर्थात् मनुष्य अपने कर्तव्य के प्रति निपुण रहे | अत: जैसा बोलो वैसा ही आचरण भी होना आवश्यक है |दुर्गुणों को छोडते हुए भक्ति के मार्ग पर चलते रहो |
Post a Comment