Friday, March 9, 2012

श्लोक ११४

II श्रीराम समर्थ II

 
फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥११४॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ११४
फ़ुकावे मुखी बोलता काय वेचे |
दिसे दिस अभ्यंतरी गर्व सांचे ||
क्रिये विण वाचालता व्यर्थ आहे |
विचारे मना तुचि शोधुनि पाहे ||११४||
हिन्दी में ...
मुख से व्यर्थ बोलों से क्या पाये ?
दिनों दिन मन में अहंकार आये ||
क्रिया बिन वाचालता व्यर्थ होये |
सोच रे मन तु हि शोध के देखे ||११४||
अर्थ ... श्री समर्थ जी कहते है कि हे मानव मन ! बिना सोचे समझे कुछ भी कह देने [बकवास] से खर्च कुछ भी नही होता है परन्तु दिनों दिन मन में अहंकार की भावना पनपती जाती है | अत: हे मनुष्य ! तुम स्वयं यह सोचकर देखो कि किसी भी कार्य को बिना किये वाचालता करना व्यर्थ है | अत: मनुष्य को बातें करनें की अपेक्षा कार्य करके दिखाना चाहिये |

suvarna lele said...

तोंडाने आपण म्हणतो की ईश्वरच सर्व श्रेष्ठ आहे तो सर्वांत ज्ञानी आहे ,असे असले तरी मनात मात्र आपल्या मोठेपणा बद्दल गर्व बळावत जातो. मन एक चीन्तते आणि दाखवते दुसरेच .मुखाने अभिमान सोडावा असे म्हणते पण मनाने अभिमानाला दृढावते .म्हणजे नुसते बोलून उपयोग नाही त्याप्रमाणे क्रिया व्हायला पाहिजे .म्हणून समर्थ म्हणतात ‘ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे , म्हणजे जे तू तोंडाने बोलतोस तसे तू वागत नाहीस ..तसे करू नकोस .विचाराने काय करायचे याचा विचार करून ,निश्चयाने कृती कर .