Friday, September 17, 2010

श्लोक ३८

II श्रीराम समर्थ II

मना प्रार्थना तूजला एक आहे |
रघुराज थक्कित होउन पाहे ||
अवदन्या कदा हो यदर्थी न कीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ३८||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

Kalyan Swami said...

As Stated by Lochan Kate (Gwaliar )...... [हिन्दी मे]
हे मन प्रार्थना तुझको एक है रे|
रघुनाथ आश्चर्य चकित हो के देखे||
अवज्ञा कभी भी मन तु न कर रे|
हे मन सज्जन राघव के मन बस रे||३८||
अर्थ..... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन ! तुमसे एक प्रार्थना है कि तुम्हारा आचरण सदैव ऐसा हो जिसको देखकर श्री राम चन्द्र जी भी आश्चर्य चकित हो कर देखते रह जाये| हमाराऐसा व्य्वहार हो जिसमे किसी का अनादर ना हो | हे मनुष्य ! ऐसे सज्जन पुरुष बनकर जीवन जियो तथा श्रीराम स्वरुपी सदैव लीन होकर रहो,अर्थात् श्री राघव को अपने मन मे बसाओ और खुद भी राघव के मन मे समाओ|.........

suvarna lele said...

समर्थ मनाला प्रार्थना करतात की ,हे मना ,तू एक काम कर ,तू राघवाची अखंड भक्ती कर ।ईतकी भक्ती कर की रघुराज श्रीराम थक्क झाले पाहिजेत ।जशी श्रीरामांची भक्ती मारुतीने केली ,शबरी ने केली ,भरताने केली ! अशी भक्ती केलीस तर तुज्या भक्तीने श्रीराम थक्क होतील ,तुला श्रीराम प्रभू प्रत्यक्ष दर्शन देतील।त्यांच्या दर्शनाने तू शबरी सारखा गुंगुन जाशील ।मारुती सारखा सतत नाम घेत राहषील्। भक्ती कशी करावी असे विचारशील तर नवविधा भक्ती सांगितली आहे त्यापैकी म्हणजे श्रवन ,कीर्तन ,नामसमरन ,पादसेवन ,अर्चन वन्दन ,दास्य , सख्य ,आत्मनिवेदन यापैकी कोणतीही भक्ती केलीस तरी तुला भगवंताचे दर्शन घडेल ।तुज़े जीवन सार्थकी लागेल ।आणि मग तुला हवे ते होइल् ।फक्त भक्ती शुध्द आणि प्रेमपूर्वक कर ।म्हणून हे मना माज्या विनंतीचा तू अव्हेर करू नकोस ।रघुनाथाच्या ठिकाणी सतत अखंड प्रेम ठेव ।तू राघवाच्या ठिकाणी वस्ती कर ।म्हणजे एकटे असताना ,काम करताना ,रिकाम्या वेळात सतत श्रीरामांच्या चिंतनात रहा ।भक्तीत निरपेक्ष भाव असेल तरच तु राघवाच्या ठिकाणी वस्ती करशील ।

Dr.Madhavi Mahajan said...

"नुपेक्षी कदा राम दासाभिमानी" या १० श्लोकांमध्ये प्रभुरामचंद्र भक्ताची कधीच उपेक्षा करीत नाहीत हे निरनिराळे दाखले देउन समर्थ स्पष्ट करतात. आता मनाचे माध्यम करुन उपासना कशी करावी या विषयी समर्थ मार्गदर्शन करीत आहेत. "मना सज्जना राघवी वस्ति कीजे."..मानवी मन असे आहे त्याला ज्याचा छंद लावावा तो त्याचा आवडीचा विषय होतो. त्याला उत्तम विचाराचा छंद लावला तर त्याचे मन विक्षिप्त विचारांकडे वळतच नाही. उत्तम आचार विचारातुन घडलेले मन आपला मित्रच बनते. संत म्हणतात "माझा मना लागो छंद नित्य गोविंद " भगवद चिंतनाचा स्मरणाचा छंद मनाला लावणे हे जीवाचे काम आहे. समर्थ याठिकाणी सांगतात बा मना अशी भक्ती कर की साक्षात भगवंताने देखील थक्क होऊन जावे. हनुमंतांची रामराया वरील भक्ती ज्यामुळे ते रामरायाचा लाडका भक्त बनले. रामरायाला थक्क करणारी रामरायावर असलेली शबरीची भक्ती.. गोपींची असलेली श्रीकृष्णा वरची भक्ती.. या सर्व भक्तांवर भगवंताची अपार कृपा होती. या सर्व भक्तांनी भगवंताच्या भेटीचा घेतलेला ध्यास, भगवंता प्रती असणारी त्याची निष्ठा ..सर्व कर्म करताना भगवंताचे स्मरण ..या स्मरणात देखील माझे कोणतेच कर्म भगवंताला आनंद देणारे त्याला सुखकारक अशीच भावना...
दृष्य जगात जगताना आपल्या माणसांवर आपण उत्कट प्रेम करतो त्याच्या आवडी निवडी जपतो ती व्यक्ती समोर नसली तरी त्याचे सतत स्मरण मनामध्ये असते..तसेच उत्कट प्रेम रघुनाथावर करावयास समर्थ मनाला सांगत आहेत..त्यामध्ये सातत्य असावे..इतके की केवळ नामजपा पुरतेच त्याचे स्मरण पुजापाठा पुरतेच त्याचे स्मरण असे न होता भगवंताचे स्मरण त्याचे नाम ही माझी सहज प्रवृत्ती बनावी ...
!! जय जय रघुवीर समर्थ !!

Gandhali said...

हे मना ! तुला मी विनंती करतो की राघवाची अखंडभक्ती कर श्रीरामचे दिव्यगुण स्मरून रामरूप पहा,तुला परामाश्चर्य वाटेल.तुझ्या उत्कट प्रेमाने तो रघुराज ही थक्क होऊन जाईल.माझ्या या प्रार्थनेची तू हेळणा करू नकोस.बा मना ! अखंड राघव स्वरूपी राहा.
रामाची भक्ती केल्याने मुक्ती मिळेल सर्व भर तो वाहील ,तुटे संसार चिंता हे सर्व सांगितले पण ही भक्ती कशी असावी हे समर्थ इथे सांगतात.भक्ती अशी कर की तो रघुराज ही थक्क होईल .तुझ्या निष्ठेबद्दल अपरंपार कौतुक श्रीरामचंद्रांच्या हृदयात दाटून आले पाहिजे.देवालाच भक्ताची ओढ लागली पाहिजे अशी भक्ती हनुमंताने श्रीरामाची केली,गोपींनी श्रीकृष्णाची केली.अशी भक्ती निस्सीम प्रेमाने घडू शकते.मनाला मनपणाच राहिला नाही,ते परमेश्वरचरणी लीन झाले की देहभाव नाहीसा होतो.इतके रंगून,गुंगून जावे की प्रपंचाचाही विसर पडावा .अशी भक्ती शुद्ध प्रेममय असावी.
" एक अंतरी निश्चळ I जे निहाळिता केवळ I विसरले सकळ I संसार जात I (ज्ञा.२-१७२) "
हे मना , माझ्या या विनंतीचा अनादर करू नको ही भक्ती एकदम साधणार नाही . परमार्थाविषयी,रामदर्शनाविषयी या साधनांसाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांविषयी अनादर,आळस,कंटाळा, टाकणे टाकल्यासारखे,थातुरमातुर काहीतरी करणे ,सातत्य नसणे अशी अवज्ञा करू नको. आज आहे उद्या नाही असे करू नको . सतत रामरूपी ,रामस्मरणी मनाला ठेव .देह देहाची कर्तव्ये पार पाडेल तो त्या साठीच आहे पण मन स्थितप्रज्ञ ,शांत बनले पाहिजे. प्रापंचिक विषयांसाठी मनाचे यंत्र बंद राहिले पाहिजे. मनाच्या निष्काम प्रेमाचा ओघ सतत राघवाचे ठिकाणी असू दे.त्याचा मुक्काम सतत रामचंद्रांचे जवळ ठेव तोच एक सर्व हा अनुभव घेणे म्हणजेच राघवी वस्ती ....