Friday, September 10, 2010

श्लोक ३७

II श्रीराम समर्थ II

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ||
हरिभाक्तिचा घाव गाजे निशाणी|
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी || ३७ ||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !
जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar ).....
[हिन्दी मे]
सदा चक्रवाक बना मार्तण्ड जैसा |
दौडा है आता संकट में स्वामी वैसा|
हरी भक्तो का गीत गरजता है डंका|
उपेक्षा न करता राम सखा है भक्त का||३७||
अर्थ... श्रीरामदास जी कहते है कि हे मानव मन ! जिस प्रकार से चक्रवात के समय सामने सूर्य आ जाता है|वैसे ही संकट के समय मे साथ देने वाले स्वामी श्रीराम जी है| ऐसे स्वामी की अच्छाईयो की गूंन्ज नगारो पर हरि भक्ति के रुप मे गुंजती रहती है| ऐसे श्रीराम सदैव अपने भक्तो का अभिमान ही करते है, उसकी उपेक्षा कभी भी नही करते|..........

suvarna lele said...

चक्रवाक पक्षी जोडीने म्हणजे नर आणि मादी असे राहतात .ते एकमेकांचा विरह सहन करू शकत नाही .अंधार पडला की त्यांना दिसत नाही .ते रात्रभर विरहाने व्याकुळ होतात .दु:खी होतात .पण मार्तंड म्हणजे सूर्य जसा पहाट झाली की उगवतो आणि चक्रवाक पक्षाच्या मदतीला धावून येतो ,म्हणजे सूर्य उगवला की त्यांना दिसू लागते ,त्यांचा विरह संपतो ,तसा भक्त संकटात असला की देव त्यांच्या रक्षणासाठी धावून येतो .भक्त निष्काम असतो ,त्याला प्रापंचिक वासना नसते .पण भक्त जेव्हा अपरिहार्य संकटात असतो तेव्हा तो देवाचा धावा करतो.जसा तुकाराम महाराजांनी शिवरायांना वाचविण्यासाठी केला होता तेव्हा परमेश्वराला धावून यावच लागते .चक्रवाकाचे उदाहरण दिले आहे जीव आणि शिव यांच्या संदर्भात ! जेव्हा सद्गुरूंची देवकृपा होते तेव्हा ,ज्ञानाची प्राप्ती होते .जीव आणि शिवाचे ऐक्य होते .,परमानंद होतो .भक्ताच्या भक्तीचे हेच रहस्य आहे .सद्गुरू कृपेची ,मोक्षाची तळमळ लागणा-यां भक्ताच्या हाकेला परमेश्वर धावून येतो .श्रीराम देव भक्तांची संकटे दूर करतो,त्यांची चिंता दूर करतो ,त्यांना भयमुक्त करतो असा डंका संत वाजवतात .भक्तीचे निशाण फडकते .संकट आले तरी भक्तीने त्या संकटावर घाव घालता येतो .परमेश्वर भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतो .भक्ती शिवाय हा भवसागर पार पडण्यासाठी दुसरे साधन नाही हे सांगताना तुकोबा म्हणतात ; याविण नाही आणिक साधन | वाहतसे आण विठोबाची| |

Gandhali said...

श्लोक ३७
आधीच्या श्लोकात रामभक्ताची उपेक्षा करणार नाही,हे पुराणातील,व्यवहारातील वेगवेगळे दाखले देऊन समर्थांनी सांगितले आहे.देव आपल्या मनातील दृढभावामुळे , भक्तीमुळे आपल्यासाठी धावून येतो त्याचे स्थान आपल्या हृदयातच आहे तो मोक्षदाता आहे,तसाच तो संकटविमोचन आहे हे या श्लोकात कविसंकेत वापरून समर्थ आपणास पटवून देत आहेत !
चक्रवाक पक्षाचे जोडपे रात्रीच्यावेळी विरहाने वेडे होऊन पूर्ण रात्रभर व्याकुळतेने ओरडत राहते अन सूर्योदय झाल्यावर म्हणजे जणू त्यांच्या मदतीला सूर्यदेव धावून आल्यावर प्रकाश होतो ते एकमेकास भेटतात ,दु:ख संपते आणि आनंद होतो.तसेच संकटकाळी भक्ताने धावा करताच तो प्रभु धावत येतो.पुराणकथा,इतिहास आणि संतचरित्र यांमधून या प्रकारची अनेक उदाहरणे आहेत.द्रौपदी रक्षणासाठी धावणारा श्रीकृष्ण,प्रल्हादासाठी धावणारा प्रभु,संत सखू ,संत जनाबाई ,संत वेण्णास्वामी अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यात भक्ताने व्याकुळतेने हाक मारली तर हाकेसरशी तो धावून येतो.जसे या लौकिक , प्रापंचिक संकटकाळी देव धावून येतो तसेच पारमार्थिक दृष्टीने ही हे चक्रवाकाचे उदाहरण घेता येईल.चक्रवाकाचे जोडपे म्हणजे जीव आणि शिव.अज्ञानाच्या अंध:कारामुळे जीव आणि शिव वेगळे भासत असतात.उत्कट भक्तीमुळे ज्ञानसुर्य प्रकट होतो आणि त्यामुळे वेगळे वाटणारे जीव आणि शिवाचे ऐक्य होऊन परमानंद होतो .हेच भक्तीचे महात्म्य आहे आणि ते सर्व जगतात गर्जत आहे.
मनापासून ,संकोच न बाळगता ,भक्ती करणाऱ्या ,ती तशीच पुढे चालू ठेवणाऱ्या सर्व हरिभक्तानी , संतानी भक्तीचा महिमा गाजत ठेवला आहे.आपण ही उद्धरून जावे आणि इतरांनाही मार्गदर्शन लाभावे म्हणून डंका वाजवून भक्तीची निशाणी फडकवणाऱ्या संतांचे वारंवार हेच सांगणे आहे " बाबा रे,भक्ती कर, भगवंत तुझी हमी घेईल ...."
" मी अवाप्त सकळकाम I परी प्रेमळ I लागी सदा सकाम I देखता प्रेमळांचा भाव परम I मी आत्माराम उडी घाली I " (ना. भा. १४-१५७ )
" पै भक्ती एकी मी जाणे I तेथ साने थोर न म्हणे I आम्ही भावाचे पाहुणे I भलतेया II येर पत्र पुष्पफळ I " (ज्ञा ९-३९५-३९६)
" पडता जड भारी I दासो आठवावा हरी I मग तो होऊ नेदी सीण I आड घाली सुदर्शन I " (तुकाराम महाराज )
" हाके सरसी उडी I घालोनिया स्तंभ फोडी I ऐसी कृपावंत कोण I माझे विठाई वाचून ? II " (तुकाराम महाराज)
हे मना I भक्ताच्या संकटकाळी उडी घेणारा, भक्ताच्या प्रेमाचा भुकेला श्रीराम भक्ताची उपेक्षा कशी करेल ?