Friday, September 3, 2010

श्लोक ३६

II श्रीराम समर्थ II

सदा सर्वदा देव सान्निध आहे |
कृपालुपणे अल्प धारीष्टय पाहे ||
सुखानंद आनंद कैवल्यदानी |
नुपेक्षी कदा  रामदासाभिमानी || ३६ ||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar ) ... [हिन्दीमे]
सदा सर्वदा देव सान्निध्य रहता|
क्रुपालुतासे अल्प धारिष्ट देखता||
सुखानंद आनंद -कैवल्यदानी|
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी||३६||
अर्थ......श्रीरामदास
जी के अनुसार ..... हे मनुष्यमन ! परमेश्वर सदैव हमारे सान्निध्य मे रहता
है| वह हमारे समीप रहकर भी क्रुपालुता से हमारे वैराग्यता का धैर्य देखता
रहता है| उसके अनुसार हम उसकी परीक्षा की कसौटी पर कितने खरे उतरते है? सुख
और आनंद देने वाला वही है | मोक्षदाता दानी भी वही है श्रीराम| उनकी भक्ति
से ही मोक्ष प्राप्त होता है| ऐसे श्रीराम जी अपने दास का सदैव अभिमान ही
करते है , उसकी उपेक्षा कदापि नही करते|...........

suvarna lele said...

देव सतत आपल्या जवळ असतो पण आपल्याला कळत नाही। एक गोष्ट आहे ।एक माणूस देवाला म्हणत असतो की देवा मी तुज़ी भक्ती करतो ।पण मी संकटात् असताना तु येत नाहीस ।मार्गा वर फक्त एकाची पावलं दिसतात ।तेव्हा देव हसून म्हणतो,'अरे वेडया, मी तुला तू संकटात् असताना तुला उचलून घेतलेले असते ।त्यामुळे तुला एकाचीच पावले दिसतात ।तात्पर्य काय देव सतत आपल्या बरोबर च असतो ।फक्त तो आपल्याला ओळखता येत नाही ।आपल्याला मी म्हणून जेथे हात लावतो तेथेच हृदयाच्या ठिकाणी देवच असतो ।ईतक्या जवळ असून देव ओळखता येत नाही ।आपण आपले त्याला बाहेर शोधतो ।तीर्थांच्या ठिकाणी ,देऊळामध्ये ,शोधतो ।पण मीळत नाही ।समर्थ म्हणतात :
जवळ असे पाहता न दिसे । सन्निधचि वसे रात्रंदिस । ज्याप्रमाणे मोठया वृक्षा चे बीजा मध्ये अंकूर असते त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या हृदयाच्या अवकाशात असतो ।पण आपल्या तो कळत नाही कारण असतो आपला अहंकार! मी देह ,मी कर्ता मी सर्वे सर्वा असा अहंकार असल्या मुळे देव आपल्याला शोधता येत नाही ।उपासना करताना सुध्दा मी उपासना करतो हा अहंकार नाहिसा व्हावा लागतो ।देव आपल्या उपासना करत असताना आपली भक्ती किती आहे ते निरखून पाहतो ,त्याच्या वरचा आपला विश्वास किति आहे त्याची परीक्षा घेतो । त्या परीक्षेत पास झालो की मग चिरन्तर आनन्द मीळतो ,सुख मीळते ।भगवन्ताची कृपा होते ।

Gandhali said...

श्लोक ३६
अनन्यता साधली की परमेश्वर आपले रक्षण करतो हा विश्वास जरी आला तरी उत्कट भक्ती साधन्यासाठी साधना करावी लागते. आणि साधनेसाठी हा देव आहे तरी कोठे हा प्रश्न साधकाला पडू शकतो त्याचे उत्तर समर्थ इथे देत आहेत. देव अखंड जवळ आहे . परमेश्वर सर्वव्यापक आहे आणि तो सदासर्वदा प्रत्येकाच्या जवळ आहेच.पण मनुष्य त्याला देहाबाहेरच शोधत रहातो. तो जवळ असून ही सापडत नाही.
" बहुकाळ गेला देवासी धुंडिता I देव पाहो जाता जवळीच II
तो जवळ आहेच तर मग संकटे का येतात ? मला दु:खे, यातना का होतात ? अशी दूसरी शंका भक्तास येउन तो विचलित होऊ नये म्हणून समर्थ तेही "अल्प धारिष्ट पाहे " मध्ये स्पष्ट करितात.
परमेश्वर प्राप्तीचा निरतिशय सुखाने भरलेला मोक्ष, केवळ आनंद हेच ज्याचे स्वरूप आहे असा हा कृपाप्रसाद भगवान भक्तांना देत असतो . फक्त हा बहुमोल ठेवा घेण्याची आणि संभाळून ठेवण्याची पात्रता त्यांच्यामध्ये आहे का नाही हे पाहण्यासाठी देव साधकाची परीक्षा पाहत असतो . आई चालायला शिकवितना, बाबा सायकल शिकवताना , सर पोहायला शिकवताना जसे अचानक सोडून देतात पण जवळ असतात , आपण पडतो , लागते, बुडतो, नाकातोंडात पाणी जाते , रडतो पण त्यातूनच शिकतो तसेच देव आपली सिद्धता करून घेत असतो.
" मातेचे हृदय कोमल I नोळखोनी भयभीत बाळ I
तेवी श्रीराम कृपाळ I भक्त परीक्षा आरंभी I
संकटा मागे संकट I येता धैर्य चोखट I
तरी भक्तासी दीर्घकाळ वाट I पहाणे न लगे I "
त्यामुळे साधकाने प्रत्येक आपत्ति हा एक नवा धडा आहे असे मानले पाहिजे . त्यामुले शरीराला कष्ट होतील पण मनाची प्रसन्नता आणि बुद्धीची विवेकशक्ति चढ़ती,वाढती राहिल हा विश्वास भक्तानी बाळगावा.पहिला नंबर येण्यासाठी जसे अथक परिश्रम घेतो तसेच हा परमआनंद मिळविण्यासाठी संकटे ,आपत्ती ,प्रतिकूलता यामध्ये विवेकाने वागावे. योग्य ते प्रयत्न न कंटळता न खचता करीत रहावे. संतुष्ट होउन देव नक्कीच कृपा करितो .
" जय जय रघुवीर समर्थ "

Suhas said...

आपाल्यावर येणारी संकटॆ , दु:ख - अपमान हे परमेश्वराचे एका अर्थाने आशीर्वादच आहेत.. अन्यथा तुम्ही त्याचे उगाच स्मरण कराल काय ? --- य़ोगी अरविंद
द्रौपदीने कृष्णाला युगायुगांची वेदना मगितली.. त्यायोगे परमात्म्याचे स्मरण राहील म्हणून! कारण अंतोगतत्व: तो दयाळू परमेश्वर सर्व दु:खातून सोडविणारच आहे ..
आई मुलाला चालायला शिकवताना मूल पडते .. धडपडते, त्याला लागल्यावर आई त्याला जवळ घेते ..त्याला कुरवाळते .. पण म्हणून पुन्हा त्याचा हात सोड्त नाही असे नाही.. कारण मुलाला चालता आलेच पाहीजे !
परमेश्वर हा देखील मातृस्वरुपच आहे .. तोच आपल्याला भवसागर पार करण्यास मदत करणार आहे ..आपले भोग संपवायला तोच मदत करतो आहे ! त्यासाठी तशी निष्ठा हवी!
प्रश्न आहे आपण ती ’लाईफ लाईन" वापरणार की अगोदरच बाद होणार ?

जय जय रघुवीर समर्थ !