II श्रीराम समर्थ II
वसे मेरुमांदार हे सृष्टीलीला |
शशी सूर्य तारांगणे मेघमाला ||
चिरंजीव केले जगी दास दोन्ही |
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी|| ३३||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, August 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
As stated by Lochan Kate ( Gwaliar)....
जब तक रहे स्रुष्टि पर्वत की लिला|
शशी सुर्य तारांगणो की मेघमाला||
चिरंजीव जिसने किये है दास दोनो |
उपेक्षा न करते कभी राम भक्तो को||३३||
श्री समर्थ रामदास जी कहते है कि मांदार पर्वत पर श्री राम चन्द्र जी वास करते थे| यह स्रुष्टि की लीला कितनी अपरम्पार है| जहॉ पर चन्द्र तथा सूर्य एवं तारागण एवं मेघमालाओ से प्रफ़ुल्लित वातावरण था| यहां श्रीराम चन्द्रजी ने दोनो भक्त श्री दास मारुति अर्थात् हनुमान जी तथा विभीषण दोनो को वहा अमर किया था| ऐसे श्रीराम चन्द्र जी अपने भक्त का सदैव सम्मान करते है| उसकी उपेक्षा कभी नही करते||
जोपर्यंत पृथ्वीवर सूर्य चंद्र दिसत आहेत ,मेरू मंदार हे पर्वत राज आहेत ,तोपर्यंत हनुमान वा बिभीषण हे दोन चिरंजीव राहणार आहेत .या दोघांना श्रीरामांनी चिरंजीव होण्याचा वर दिला होता .जोपर्यंत ग्रह नक्षत्रे आहेत पाउस पाडणारे मेघ आहेत तोपर्यंत हे दोघेजण चिरंजीव राहणार आहेत .तोपर्यंत त्यांची कीर्ती या जगात राहणार आहे .बिभीषण आणि मारुतीने श्रीरामांची सेवा केली .बिभीषण प्रत्यक्ष त्याच्या भावाविरुध्द म्हणजे रावणा विरुध्द लढायला रामाला येउन मिळाला .मारुतीने सीतेचा शोध घेतला .श्रीरामांना सर्व प्रकारे मदत केली .म्हणूनच श्रीरामांनी त्यांना चिरंजीव पद बहाल केले .चिर याचा अर्थ कल्पनेच्या पलीकडे जास्त काळ टिकणारा ! आजही हे दोघे आहेत व निस्सीम भक्तांना दर्शन देतात असा विश्वास आहे .
श्लोक ३३
हे मना , या प्रभू रामाच्या सामर्थ्याचे वर्णन किती करू , जो वर पृथ्वीतलावर मेरुमंदार हे पर्वतराज स्थिरपणे टिकून आहेत आणि जो वर आकाशात चंद्र,सूर्य,ग्रह,नक्षत्रे आणि जलवर्षाव करण्यार्या मेघांचा समुदाय अस्तित्वात आहे म्हणजे एकूण या सृष्टीचे व्यापार होत आहेत तो पर्यंत श्रीमारुती व बिभीषण असतील असे चिरंजीव पद श्रीरामांनी आपल्या भक्तांना दिले आहे.
अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या बिभीषणाला श्रीराम म्हणतात ,
" म्हणे गा वीरा त्वां पुरीमाजी जावे I धृवाचे परी राज्य सुखे करावे I शशी सूर्य तारांगणे अंतराळी I असावे सुखी भोगिजे सर्वकाळी I "
असा सृष्टीचा सामान्य निसर्गक्रम बदलून आपल्या भक्तांवर अशी अलौकिक कृपा करणारा प्रभू रामचंद्र माझी कधीच उपेक्षा करणार नाही हा विश्वास प्रत्येकाने बाळगावा हाच समर्थांचा निर्देश आहे.
II जय जय रघुवीर समर्थ II
Post a Comment