Friday, August 6, 2010

श्लोक ३२

II श्रीराम समर्थ II

अहल्या शीले राघवें मुक्त केली|
पदी लागता दीव्य होउनि गेली ||
जया वर्णिता शीणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा रामदासभिमानी || ३२||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

 जय रघुवीर समर्थ !

3 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate (Gwaliar).............
श्लोक ३२.. पद स्पर्श करके चैतन्य लाया|
शिला से अहिल्या को मुक्त कराया||
जिसे वर्णते न थकती है वेद वाणी|
उपेक्षा ना करते कभी भक्ताभिमानी||
अर्थ === श्रीरामदासजी कहते है कि हे मनुष्य मन ! शापग्रस्त हुई शिला रुप प्राप्त सती अहिल्या को श्रीराम चन्द्रजी नें स्त्री रुप में लाकर मुक्त किया था| श्रीरामचन्द्रजी का पैर लगते ही अहिल्या दिव्यरुप में प्रगट हुई थी जिसका वर्णन वेदवाणी द्वारा अपूर्व पूर्वक किया गया है| ऐसे श्रीराम चन्द्रजी जिनके स्पर्श द्वारा एक शिला भी शाप मुक्त हो सकती है तो ऐसे प्रभु का क्या कहना? इसलिये हे मनव ऐसे प्रभु अपने भक्त की केवल रक्षा ही करते है ,उनकी उपेक्षा कदापि नही करते | इसलिये हे मानव तु ऐसे प्रभु की शरण मे रहकर अपने जीवन को सार्थक करने का प्रयास कर|...........

suvarna lele said...

श्रीराम जेव्हा विश्वामित्रां बरोबर सीता स्वयंवराला मिथिलेला चालले होते ,तेव्हा वाटेत त्यांना ओस पडलेला गौतम मुनींचा आश्रम दिसला .तो आश्रम कोणाचा अशी श्रीरामांनी चौकशी केली तेव्हा विश्वामित्रांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली .कोणालाही न दिसणारी अहिल्या रामप्रभूंना दिसली .कारण अहिल्या दगड झाली नव्हती .दगडा प्रमाणे जड होउन पडली होती .गौतम मुनींनी तिला शाप दिला होता की 'तू अन्न पाण्याशिवाय केवळ वायू भक्षण करून राहशील ,पण कोणाला दिसणार नाहीस. एक हजार वर्षे पडून राहशील .कोणालाही न दिसणारी अहिल्या श्रीराम प्रभूंना दिसली .वयाने वडील व एक ऋशीपत्नी म्हणून श्रीरामांनी तिच्या पाऊलांना स्पर्श केला .प्रत्यक्ष परमेश्वराच्या हस्त स्पर्शामुळे अहिल्या पावन झाली आणि तिला दिव्य देह प्राप्त झाला .ती शाप मुक्त झाली .
माणसाला पश्चात्ताप झाला तर प्रभू रामचंद्र शरणागतांचे वाली आहेत .त्यांनी अनेक जणांचा उध्दार केला .त्यांना पतितपावन म्हणूनच म्हणतात .अशा पतितपावन श्रीरामांचे वर्णन करण्यासाठी वेदांनाही शब्द अपुरे पडतात .श्रीराम भक्तांचे अभिमानी असल्यामुळे ते भक्तांची उपेक्षा करत नाहीत .

Gandhali said...

श्लोक ३२

हे मना , श्री समर्थ रामदास आपली माउली आहेत.माझ्या लेकरांचा उद्धार करण्यासाठीच माझा जन्म आहे या ध्येयांनी झपाटलेली माउली जसे बाळांसाठी जीवाचे रान करते,भल्यासाठी जसे नानाविध उपायांनी त्यांना समजाविते . त्याप्रमाणेच आपण या प्रभूरामाची भक्ती केली तर आपला उद्धार होईल हे सत्य जाणून आपण तसे करावे म्हणून न कंटाळता वेगवेगळे दाखले देऊन वेळप्रसंगी आपल्या मनाला आंजारून गोंजारून समर्थ आपल्या मनाला योग्य दिशा दाखवीत आहेत.
रामगुणवर्णनासाठी इथे ते अहिल्येच्या कथेचा दाखला देतात .संतापलेल्या गौतम ऋषींनी दिलेल्या शापामुळे अहिल्या शिळा होऊन पडली अन रामस्पर्शाने तिची मुक्ती झाली. रामचंद्र कृपेमुळे तिचा उद्धार झाला यात समर्थ श्रीरामाचे सामर्थ्य दिसतेच तसेच स्वतः चारित्र्यवान असणारे श्रीराम चुकलेल्यांचा ,हातून पातक घडलेल्यांचा तिरस्कार करीत नाहीत तर त्यांना जवळ करून त्यांना पातकातून सोडवतात,त्यांचा उद्धार करितात.असे रामचंद्र पतितपावन आहेत हा विश्वास या उदाहरणावरून वाढवावा.
" देव तो दयाळू मोठा I अन्याय क्षमणे बहु I
भक्तांचा स्वाभिमानी तो I बुद्धिदाता परोपरी II "
अशा या श्रीरामचंद्रांचे वर्णन करताना वेदांचे सामर्थ्य हे तोटके ठरते . वेद हे शेवटी ' नेती नेती' म्हणाले असा हा श्रीरामभक्तांची कधीच उपेक्षा करणार नाही.